नेहमीच्या पद्धतीने जी वाइन निर्माण होते, तिला स्टील वाइन म्हणजे शांत वाइन म्हणतात. तिच्यात मद्यनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण होऊन फळाचा स्वाद असलेली, शुद्ध स्वरूपातली फळाच्या जातीप्रमाणे आणि रंगाप्रमाणे तयार झालेली असते. वाइनचं रसायन पाहिलं तर त्यात रस-रंग, स्वादाबरोबर शुद्ध प्रकारचा इथिल अल्कोहोल निर्माण झालेला असतो. श्ॉम्पेनमध्ये या घटकांबरोबर कार्बन डाय ऑक्साइड वायूही असतो.
वाइनमध्ये यीस्ट हा जिवाणू त्याचं खाद्य असलेली साखर द्राक्षाच्या रसातनं पूर्णपणे गेल्यानं अशक्त होत नाहीसा होत असतो. त्यानंतर वाइन पूर्णपणे शांतावते. त्यानंतर जर त्या वाइनमध्ये परत साखर घातली आणि ताजं यीस्ट घातलं तर अशक्त झालेला यीस्ट परत कार्यरत होतो आणि किण्वन (फर्मेटेंशन) सुरू होतं. किण्वन प्रक्रियेत तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साइड वाइनच्या बाटलीत बंदिस्त केला जातो. कार्बन डायऑक्साइडसह बंदिस्त असलेली वाइन म्हणजेच श्ॉम्पेन होय. क्रिकेटची मॅच जिंकली की, त्याचं सेलिब्रेशन श्ॉम्पेनच्या बाटल्या उघडून केलं जातं. बाटलीतून फसफसत बाहेर पडणारी श्ॉम्पेन मात्र सर्वाच्या लक्षात राहते.
श्ॉम्पेनमध्ये प्रत्येक बाटलीची वेगळी सरबराई करावी लागते. शिवाय त्यासाठी मनुष्यबळ लागतं. डिसगॉìजग करणाऱ्या व्यक्तीवर बाटलीतल्या श्ॉम्पेनची गुणवत्ता अवलंबून असते. शिवाय ती बरेच दिवस ठेवावी लागत असल्याने गुंतवलेला पसा अडकून राहतो. या सर्वामुळे आणि ती काही ठरावीकच कंपन्या करत असल्यानं श्ॉम्पेनची किंमत बरीच जास्त असते.
शांत वाइनमध्ये ठरावीक प्रमाणात कार्बन डायऑक्साइड घातला की, श्ॉम्पेन तयार होते, हे लक्षात घेऊन वाइन बनवणाऱ्या वायनऱ्या व वाइनच्या थंड द्रवात कार्बन डायऑक्साइड मिसळून श्ॉम्पेनसारखी वाइन करायला लागल्या. यांना नसíगक पद्धतीनं तयार झालेली श्ॉम्पेन म्हणता येणं शक्य नव्हतं. अशा प्रकारच्या कार्बन डायऑक्साइड घातलेल्या वाइनला काबरेनेटेड वाइन किंवा स्पार्किलग वाइन म्हणतात. तिची किंमत श्ॉम्पेनपेक्षा खूपच कमी असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा