स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांपर्यंत भारतामध्ये होणारे कापूस उत्पादन हे मुख्यत: सुधारित अशा पारंपरिक जातींचेच होते. भारताच्या मध्य, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात कापसाचे पीक घेतले जात होते. आजही याच भागात कापूस मोठय़ा प्रमाणावर पिकविला जातो. यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व बंगाल ही राज्ये आघाडीवर होती व आजही आहेत. बंगालमध्ये- बांगलादेशी, पंजाब, हरियाणामध्ये- पंजाब देशी, गुजरात, महाराष्ट्रामध्ये- लक्ष्मी, कल्याण, वागड, तर कर्नाटकमध्ये जयधर व तामिळनाडूमध्ये- सी.ओ- २ या पारंपरिक कापसाच्या जाती प्रचलित होत्या.
पारंपरिक जातींच्या कापसाचे उत्पादन त्या वेळी प्रति हेक्टरी १३० ते १९० कि. ग्रॅ. इतके कमी होते आणि त्याचबरोबर या कापसाच्या तंतूंची लांबी जास्तीत जास्त २६ मि.मि. इतकीच होती. अशा कापसापासून फक्त कमी सूतांकाचे (जाडे) सूतच कातता येऊ शकत असे. (३० सूतांकाच्या खालील). मध्यम व उच्च सूतांकाच्या सूताच्या उत्पादनासाठी इजिप्त, सुदान यांसारख्या देशांतून अधिक तंतू लांबीच्या कापसाची आयात करावी लागत असे. त्यामुळे त्या वेळेस आपला वस्त्रोद्योग खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण नव्हता.
संकरित कापूस :
भारतातील पारंपरिक कापसाच्या जाती या गॉसिपियम अबरेरियम व गॉसिपियम हबरेसियम या वर्गातील होत्या. या वर्गातील कापसाच्या सुधारणेला मर्यादा होत्या. त्यामुळे अमेरिका, इजिप्त, वेस्ट इंडिज यांसारख्या देशातून गॉसिपियम हिरसुटुम व गॉसिपियम बार्बाडेन्स या वर्गातील कापसाच्या जाती भारतात आणून त्यांचा येथील स्थानिक कापसाशी संकर करण्याचे प्रयोग सुरू झाले. यासाठी संकरासाठी पश्चिमेकडील देशातील कापसाच्या जाती निवडणे हे मोठे आव्हान होते. कारण भारतातील जमिनी, हवामान व पावसाचे प्रमाण यामध्ये टिकाव धरू शकणाऱ्या अशाच जाती संकरासाठी योग्य होत्या. संकरित कापसावरील संशोधन १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाले. संकरित कापसाचा विकास ही भारतीय वस्त्रोद्योगाच्या इतिहासातील एक मोठी क्रांती होती.

संस्थानांची बखर: ओच्र्छा संस्थानाचे स्थापत्य
मध्य प्रदेशातील टिकमगढ या जिल्ह्याच्या शहरापासून ८० किमी आणि झांशीपासून १५ किमी अंतरावरील ओच्र्छा हे छोटेसे गाव तेथील ऐतिहासिक महाल, मंदिरे आणि छत्र्यांसाठी विख्यात आहे. जागतिक वारशाचा दर्जा मिळालेल्या येथील वास्तू पाहण्यासाठी भारतीय आणि जागतिक प्रवासी नेहमी येत असतात.
बुंदेला राजपूत घराण्यातील रुद्र प्रतापसिंग या योद्धय़ाने १५०१ साली ओच्र्छा राज्याची स्थापना केली. बाबराच्या आक्रमणामुळे झालेल्या गोंधळाचा फायदा उठवीत रुद्र प्रतापने आपला राज्यविस्तार केला. पुढे ५२०० चौ.कि.मी. व्याप्ती असलेले हे राज्य बुंदेलखंड एजन्सीत सर्वाधिक मोठे राज्य होते. १९०१ साली ओच्र्छा राज्याची लोकसंख्या होती ५२०००. राजा बीरसिंग देव याची इ.स. १६०५ ते १६२७ अशी राजकीय कारकीर्द ओच्र्छा राज्याला अतिशय वैभवसंपन्न ठरली. तो एक चोख प्रशासक, कुशल योद्धा आणि स्थापत्यशास्त्रातील जाणकार होता. बीरसिंग देवचा बादशाह जहांगीरशी विशेष स्नेह होता. बीरसिंग देव अनेक वेळा जहांगीरच्या शाही महालात अतिथी म्हणून जात असे. दोघे बरोबर शिकारीसाठी जात असत. बीरसिंगने ओच्र्छामध्ये जहांगीरासाठी खास सुबक, भव्य असा त्याच्याच नावाने ‘जहांगीर महल’ बांधला.
आजही सुस्थितीत असलेला जहांगीर महल पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. बीरसिंगच्या कारकीर्दीत ओच्र्छाची भरभराट झाली. जहांगीर महल आणि सावन भादो महल हे बीरसिंगच्या स्थापत्यशास्त्रातील प्रतिभेचे साक्षीदार आहेत.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
MIDC plot for old age home for artists thane news
‘एमआयडीसी’चा भूखंड कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी;उद्याोगमंत्र्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Agriculture Commissioner, traders ,
शेतीमाल हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, कृषी आयुक्तांचे आदेश
manmohan singh
सामान्य माणूस, शेतकरी यांच्यापर्यंत आर्थिक सुधारणा पोहोचल्या का?
Two men commit unnatural torture on a minor child in Buldhana district
आता…बालकेही सुरक्षित नाहीत!…खामगावच्या शाळेत अंध मुलावर…
Story img Loader