वस्त्र संस्कृतीच्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास वाचताना तीन तंतूंचा उल्लेख अनिवार्यपणे वारंवार येतो. हे तीन तंतू म्हणजे कापूस, लोकर आणि रेशीम. यातही नसíगक आणि वनस्पतीजन्य मुबलकता यामुळे कापसाला तंतूंच्या राजाचा सन्मान मिळतो. पुढील कारणांमुळे कापसाला हा सन्मान मिळाला आहे.
१) ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका पाचही खंडांत कापसाचे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते, अशा प्रकारचा हा एकमेव तंतू आहे.
२) नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपासून बनवलेल्या वस्त्रनिर्मितीत अनेक वर्षे कापूस अग्रगण्य आहे.
३) कताई, धुलाई, विणाई, रंगाई, छपाई या सर्व प्रक्रिया कापसावर सुलभतेने पार पडतात.
४) कापसापासून बनवलेले कापड हे आíथकदृष्टय़ा सर्व प्रकारच्या उत्पन्न वर्गासाठी वाजवी किमतीत उपलब्ध होऊ शकते.
कापसाने व्यापलेले क्षेत्र, वाढीव अंतिम उत्पादन, सातत्याने वाढणारी उत्पादन क्षमता, सतत वाढीव वापर व उपभोग्यता या सर्व कारणांमुळे कापसाला हा सन्मान मिळाला आहे.
आता तर रंगीत कापूससुद्धा उत्पादनात अग्रेसर आहे. या सर्व कारणांमुळे कापसाला तंतूंचा राजा म्हणणे किती समर्पक आहे, हे लक्षात येईल. कापूस हा वनस्पतीजन्य तंतू आहे. साहजिकच कापसाचे गुणधर्म मातीचा कसदारपणा, पर्जन्यमान आणि पाणीपुरवठय़ाची परिस्थिती या घटकांवर अवलंबून असतात. कापसाचे उत्पादन पाचही खंडांत होत असल्यामुळे या घटकांमध्ये विविधता आढळते. त्यामुळे कापसाच्या गुणधर्मातही फरक पडतो. या गुणधर्मानुसार कापसाच्या जाती हब्रेरियम, हब्रेसियम, हिसुर्तम आणि बर्बादेन्से या चार वर्गात विभागल्या जातात. हब्रेरियम जातीतील कापूस कमी लांबीचा आणि जाडाभरडा असतो आणि बर्बादेन्से या वर्गातील कापूस जास्त लांबीचा आणि तलम असतो. ही विविधता हे कापसाचे वैशिष्टय़ आहे, पण त्यापासून वस्त्रनिर्मिती हे आव्हान आहे. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी अविरत परिश्रम करून हे आव्हान स्वीकारले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा