आपल्या भारतातील कृषिसंपदा आणि त्यातून आíथकदृष्टय़ा कापूस देशासाठी महत्त्वाचे पीक आहे. भारतात कापूस लागवडीतील जमिनीचे क्षेत्रफळ इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक आहे. कापसाच्या जाती हब्रेरियम, हब्रेसियम, हिर्सुतम आणि बार्बदेंस या चारीही जातींतील उत्पादन मोठय़ा प्रमाणात होणारा भारत हा एकमेव देश आहे. हवामान, मातीमधली विविधता जशी लाल माती, काळी माती, कसदारपणा, पर्जन्यमान आणि पाणीपुरवठय़ाची परिस्थिती, लागवडीच्या आणि उत्पादनाच्या विविध पद्धती, उत्पादनाचा कालखंड,
भौगोलिक घटक या सर्वामध्येच जी विविधता आढळते ती अजून कुठल्याही देशात नाही. कापसाच्या प्रति हेक्टर उत्पादनामध्ये भारत मात्र खूप मागे आहे. जगातील बाकीच्या देशात सरासरी उत्पादन प्रति हेक्टर ७०० तो ८०० किलोग्रॅम आहे, भारतातील उत्पादन प्रति हेक्टर केवळ ३०० ते ३५० किलोग्रॅम आहे. भारतातील कापूस उत्पादन पावसावर अवलंबून आहे आणि हे या कमी उत्पादनाचे प्रमुख कारण आहे. भारतात अवेळी पाऊस, दुष्काळ, अतिपर्जन्यवृष्टी अशा नसíगक समस्याही कमी उत्पादनाचे कारण आहे.
भारतात प्रभावी कीटकनाशकांची उपलब्धता बाकीच्या देशांपेक्षा कमी आहे, त्यामुळे कापसांच्या पिकांचे कीटकांपासून सरंक्षण करता न येणे, हेही एक कारण आपल्या देशातील कमी कापूस उत्पादनाचे कारण आहे. भारत अजूनही परिणामकारक कीटकनाशके शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात मागे आहे.
भारत स्वतंत्र होतानाच देशाची फाळणी झाली. कापूस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पंजाब पाकिस्तानच्या सीमेत गेला, त्यामुळे झालेल्या नुकसानाची आकडेवारी जर आपण बघितली तर १९५० मध्ये ४४.२ लाख हेक्टर क्षेत्रफळ कापूस लागवडीखाली होते. त्या वेळचे एकूण कापूस उत्पादन ३.६ लाख टन होते (प्रति हेक्टर उत्पादन ८८ किलोग्रॅम). तर सन २००० मध्ये ८८.२ लाख हेक्टर क्षेत्रफळ कापूस लागवडीखाली होते आणि २३.५ लाख टन उत्पादन होते (प्रति हेक्टर उत्पादन ३०० किलोग्रॅम).
५० वर्षांपेक्षा अधिक काळ जाऊनही भारतात प्रति हेक्टर कापूस उत्पादनामध्ये अपेक्षित अशी वाढ झाली नाही.
संस्थानांची बखर: महादजी आणि तानसेनची नगरी ग्वाल्हेर
ग्वाल्हेर संस्थानाची ऐतिहासिक प्रसिद्धी सध्याही दोन कारणांमुळे टिकून आहे. एक तर मराठा संघराज्यातील एक निष्ठावंत आणि प्रबळ घटक म्हणून व दुसरे म्हणजे महान गायक मियाँ तानसेनचे मूळ गाव म्हणून.
अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठय़ांच्या वाढत्या वर्चस्वामुळे रोहिल्यांचा पुढारी नजीब-उद्-दौला आणि अफगाण अहमदशाह अब्दाली यांच्याशी झालेल्या मराठय़ांच्या संघर्षांत ग्वाल्हेरच्या िशदे घराण्यातील दत्ताजी याची हत्या झाली. दत्ताजी िशदेची हत्या हे पानिपतच्या प्रसिद्ध तिसऱ्या लढाईचे एक कारण झाले. पानिपतच्या या लढाईत ग्वाल्हेर राज्याचा सूत्रधार जनकोजी िशदे हा खंदा वीरही मारला गेला. त्यानंतर १७६४ साली माधवराव प्रथम हा ग्वाल्हेरच्या गादीचा वारस म्हणून कारभार पाहू लागला.
माधवराव हा महादजी या नावानेच ओळखला जात होता. पानिपतच्या लढाईत महादजींचा एक पाय अधू झाला तो त्यांच्या अखेरीपर्यंत. मराठा राज्यसंघाचे पंतप्रधान म्हणजे पेशवे यांच्याशी एकनिष्ठ राहून महादजींनी पुढील पाच वर्षांत आपले राज्य, एक प्रबळ सनिकी शक्ती म्हणून नावारूपाला आणले. १७७२ साली माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर महादजींनी आणि नंतर त्यांचा वारस दौलतराव यांनी मराठा साम्राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. पुढे मियाँ तानसेन म्हणून प्रसिद्ध झालेला, ग्वाल्हेरच्या मकरंद पांडे यांचा पुत्र तन्ना ऊर्फ रामतनु पांडे हा महान गायक, संगीतकार आणि रचनाकार बादशाह अकबराच्या नवरत्नांपकी एक होता. पूर्वी ग्वाल्हेर नगरीबद्दल एक वाक् प्रचार प्रसिद्ध होता, ‘‘यहाँ बच्चे रोते हैं, तो सूर में और पत्थर लुढकते हैं तो ताल में।’’
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com