आपल्या भारतातील कृषिसंपदा आणि त्यातून आíथकदृष्टय़ा कापूस देशासाठी महत्त्वाचे पीक आहे. भारतात कापूस लागवडीतील जमिनीचे क्षेत्रफळ इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक आहे. कापसाच्या जाती हब्रेरियम, हब्रेसियम, हिर्सुतम आणि बार्बदेंस या चारीही जातींतील उत्पादन मोठय़ा प्रमाणात होणारा भारत हा एकमेव देश आहे. हवामान, मातीमधली विविधता जशी लाल माती, काळी माती, कसदारपणा, पर्जन्यमान आणि पाणीपुरवठय़ाची परिस्थिती, लागवडीच्या आणि उत्पादनाच्या विविध पद्धती, उत्पादनाचा कालखंड,
भौगोलिक घटक या सर्वामध्येच जी विविधता आढळते ती अजून कुठल्याही देशात नाही. कापसाच्या प्रति हेक्टर उत्पादनामध्ये भारत मात्र खूप मागे आहे. जगातील बाकीच्या देशात सरासरी उत्पादन प्रति हेक्टर ७०० तो ८०० किलोग्रॅम आहे, भारतातील उत्पादन प्रति हेक्टर केवळ ३०० ते ३५० किलोग्रॅम आहे. भारतातील कापूस उत्पादन पावसावर अवलंबून आहे आणि हे या कमी उत्पादनाचे प्रमुख कारण आहे. भारतात अवेळी पाऊस, दुष्काळ, अतिपर्जन्यवृष्टी अशा नसíगक समस्याही कमी उत्पादनाचे कारण आहे.
भारतात प्रभावी कीटकनाशकांची उपलब्धता बाकीच्या देशांपेक्षा कमी आहे, त्यामुळे कापसांच्या पिकांचे कीटकांपासून सरंक्षण करता न येणे, हेही एक कारण आपल्या देशातील कमी कापूस उत्पादनाचे कारण आहे. भारत अजूनही परिणामकारक कीटकनाशके शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात मागे आहे.
भारत स्वतंत्र होतानाच देशाची फाळणी झाली. कापूस उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पंजाब पाकिस्तानच्या सीमेत गेला, त्यामुळे झालेल्या नुकसानाची आकडेवारी जर आपण बघितली तर १९५० मध्ये ४४.२ लाख हेक्टर क्षेत्रफळ कापूस लागवडीखाली होते. त्या वेळचे एकूण कापूस उत्पादन ३.६ लाख टन होते (प्रति हेक्टर उत्पादन ८८ किलोग्रॅम). तर सन २००० मध्ये ८८.२ लाख हेक्टर क्षेत्रफळ कापूस लागवडीखाली होते आणि २३.५ लाख टन उत्पादन होते (प्रति हेक्टर उत्पादन ३०० किलोग्रॅम).
५० वर्षांपेक्षा अधिक काळ जाऊनही भारतात प्रति हेक्टर कापूस उत्पादनामध्ये अपेक्षित अशी वाढ झाली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा