पेट्रोलियम इंधनाला पर्याय म्हणून जैविक इंधनाची निर्मिती होत आहे हे स्तुत्य आहे. अन्नधान्याचे उत्पादन आणि इंधने यात समन्वय साधण्यासाठी एिडबर्ग विद्यापीठातील ‘न्यूफील्ड कौन्सिल ऑन बायोइथिक्स वìकग पार्टी ऑन बायोफुएल्स’चे चेअरमन प्रो. जोएस टेट यांनी जैविक इंधनाची निर्मिती आणि वाटपासंबंधी एक विशिष्ट नियमावली तयार केली आहे. त्यात पाच तत्त्वांचा समावेश आहे : मानवी हक्कांचे रक्षण, पर्यावरण स्थर्य, हरितगृह वायूंवर नियंत्रण, सचोटीने व्यापार, खर्च आणि नफ्याचे समन्यायी वाटप.
  जैविक इंधनांच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने मका, सोया, ऊस ही पिके वापरली जातात. ‘स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट’मधील संशोधकांनी २६ निरनिराळ्या जैविक इंधनांचा अभ्यास करून त्यांचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आणि त्यांच्या निर्मितीसाठी खर्च करावी लागणारी ऊर्जा यांचा सखोल आढावा घेतला. अमेरिकेतील मका, ब्राझिलमधील सोयाबीन, मलेशियातील पामतेल यांच्यापासून मिळणारी जैविक इंधने खूप महागडी असतात, असे आढळले. मात्र, स्वयंपाकघरातील खरकटय़ापासून उत्पादित केली जाणारी आणि लाकूड-चाऱ्यापासून मिळवण्यात येणारी इथेनॉलसारखी इंधने स्वस्त व उपकारक असतात.
   इंग्लंड आणि युरोपियन देशांतील सध्याच्या जैविक इंधनांच्या धोरणामुळे विकसनशील देशातील लोकांच्या समस्या वाढू शकतात. त्यासाठी, आता तेथील वैज्ञानिक नव्या प्रकारची इंधने निर्माण करण्यावर भर देत आहेत. अमेरिकेतील कॉन्रेल विद्यापीठाच्या संशोधकांनी, जैविक इंधनांच्या निर्मितीसाठी अन्नधान्याचा वापर करणे आणि त्यामुळे धान्यांचा तुटवडा होणे, याविषयी चिंता व्यक्त केली आहे. जगात कुपोषणाचे प्रमाण मोठे असताना, पर्यायी इंधनासाठी पिकांची जमीन वापरणे नतिकदृष्टय़ा चुकीचे ठरते, असा त्यांचा दावा आहे. मक्यापासून इथेनॉल प्राप्त करताना ४६ टक्के, स्विचग्रास चाऱ्यापासून जैविक इंधन मिळवताना ५० टक्के, सोयाबीनपासून बायोडिझेल मिळवताना ६३ टक्के, तर रॅपसिड बियांपासून इंधन तयार करताना ५८ टक्के ऊर्जेचा ऱ्हास (निगेटिव्ह एनर्जी रिटर्न) होतो, असे त्यांच्या संशोधन प्रकल्पात आढळले आहे. याव्यतिरिक्त कीटकनाशके आणि खतांमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, मातीची धूप, हवेचे प्रदूषण, ग्लोबल वाìमग यांसारख्या समस्या उद्भवतात.

वॉर अँड पीस: जलसुरक्षा : आयुर्वेदीय संकल्पना
जगभर दिवसेंदिवस शुद्ध पाण्याची समस्या  शहर व ग्रामीण भागात त्रस्त करून सोडत आहे. पावसाळय़ात जलसुरक्षेकडे लक्ष दिले नाही तर हगवण, जुलाब, अतिसार, कॉलरा, पोटदुखी, जेवणाखाण्याचे भय यांनी माणसे बेजार होऊन जातात. अन्न, वस्त्र, निवारा या तीन समस्यांकडे बहुतेक सर्व जण शासनासकट लक्ष देत असतातच. पण शुद्ध पाण्याच्या गरजेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. स्थानिक स्वराज संस्था पिण्याच्या पाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर क्लोरीनसारखे पदार्थ मिसळून हा प्रश्न बऱ्यापैकी सोडवू पाहतात. तरीपण खराब पाण्यामुळे दिवसेंदिवस हगवणीच्या विकारग्रस्त रुग्णांची संख्या वाढती आहे. आपल्याला नेहमीच्या रोगसमस्यांची लागण झाली की बडेबडे धंदेवाले त्या क्षेत्रात उतरतात. येथेही घरगुती जलशुद्धिकरण यंत्रवाले, बाटलीबंद पाणी पुरवणारे पुढे आलेआहेत.
‘जीवनं तर्पणं हृद्यं हादि बुद्धिप्रबोधनम्।’
गांग संज्ञक पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वीच पात्रात धरिले असतां शुद्ध, स्वच्छ, थंड, लघु, अव्यक्तरस (ज्यांच्यात गोडपणा, खारटपणा किंवा दुसरा कोणताही रस कळून येत नाही.), आल्हाददायक, तृप्तिदायक, मनास हुशारी आणणारे जीवन-व्यापाराचे उत्तेजक, पिण्याला प्रिय व अमृततुल्य असते. ऊन चांदणे व वायू यांचा संपर्क झाला असता त्याचा बरेवाईटपणा देशकालावर अवलंबून आहे. शरद ऋतूत आकाश निरभ्र असते. हवेत धूलिकण अभावाने असतात. त्या काळात आपल्या गच्चीवर स्वच्छ कपडे बांधलेल्या पातेल्यात पावसाचे पाणी साठवता आले तर ते सर्वात शुद्ध पाणी होय. आपल्या घरचे पाणी मोठे बुडबुडे येईपर्यंत उकळले, सहा-आठ तासांत वापरले तर हगवण समस्येवर निश्चित मात करता येते. दहा ग्रॅम चुनखडी, एक लीटर पाणी एकत्र उकळून गार झाल्यावर दोनशे मिलीच्या पाच बाटल्या भराव्यात. असे सुधाजल, लाइमवॉटर- चुन्याची निवळी ‘मोस्ट सेफ वॉटर’। नागरमोथाचूर्ण, निवळीबीचूर्ण यांचे जलशुद्धीकरणात मोठेच योगदान आहे ‘इति. जलसुरक्षा।’
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      लवासा आणि सहारा सिटी
सह्य़ाद्रीच्या कुशीत जिथे एकेकाळी शिवाजीचे मावळे स्वाभिमानाने जगत होते तिथे ही दोन कृत्रिम शहरे वसवण्यात आली आहेत. आणि ती शहरे विद्रूप दिसतात असे अतिरेकी विधान मी इथे करतो. आपल्या देशाच्या सद्यस्थितीत कोणी तरी महत्त्वाकांक्षी माणसांनी सरकारशी संगनमत करून अमाप पैसे ओतून नव्या आणि जुन्या श्रीमंतांसाठी अशी चैनीची शहरे वसवणे आणि स्थानिक लोकांना त्यामुळे न भूतो न भविष्यती असा रग्गड रोजगार मिळतो, अशी विधाने करणे म्या मतिमंदाला पटत नाही. सहाराच्या शहरात निदान ३० टक्के मुंबईचे आहेत, परंतु तिथे कृत्रिम समुद्र निर्माण केला आहे आणि विजेच्या जोरावर भरती ओहोटीचा देखावा दाखवण्यात येतो. हे बघून मी सर्द झालो. ह्य़ाला मी नासाडी म्हणतो. अमाप घरे बांधणे. त्यासाठी विमानाची पट्टी तयार करणे, अनेक लक्ष टन डांबर ओतणे आणि नंतर प्रदूषण रोखण्यासाठी विजेवर चालणाऱ्या छोटय़ा गाडय़ा फिरवणे या उपर दांभिकपणाचे दुसरे लक्षण मी बघितलेले नाही. आता हे शहर विकायला काढले आहे असे ऐकतो. कोणीही महाराष्ट्रात यावे आणि त्याने राजकीय आणि आर्थिक बळावर असले काही तरी अफाट आणि अचाट करावे हा तुघलगी बलात्कारच. लवासा तर स्वकीयांनी वसवले. इथे आता काम बंद पडले आहे. ते पर्यावरणाच्या मुद्दय़ावर. त्यातले बारकावे मला माहीत नाहीत. इथे विद्यापीठ येणार, तंत्र निकेतन येणार, स्वच्छ निकोप निरोगी आयुष्य जगता येईल असे म्हणत तळ्याच्या काठी स्केटिंग करताना अद्ययावत आधुनिक कपडे घातलेल्या मुलामुलींच्या जाहिराती दाखवण्यात येतात. रोटी कपडा मकानचे हे उत्तम उदाहरण(!) खरे तर ही आधुनिक मयसभाच आणि तीही मूठभर माणसांसाठी. अनेक घरे बांधून झाली आहेत, पण तिथे कोणी राहत नाही. काही अर्धवट पडली आहेत. सगळी डोंगराच्या कुशीत आहेत. सध्या तरी त्याचे स्वरूप मला भूतबंगल्यासारखे वाटले. आणि डोंगर रडत आहेत असा भास झाला. मी काही साम्यवादी नाही, परंतु सर्वत्र गरिबी पसरली असताना मध्येच असे शहर वसवण्याची कल्पना जर उदारमतवादी भांडवलशाहीमुळे अमलात येत असेल, तर इथे कही तरी नासके आहे अशी कल्पना माझ्या मनात आली तर मला कोणी दोष देऊ नये. सर्वागीण विकास हे स्वप्नच राहणार आहे, ते कोठेही जगाच्या पाठीवर झालेले नाही. कारण निसर्गातच वैविध्य आणि विषमताही आहे. पण हे सहारा आणि लवासासारखे प्रयोग बघून एखादे गळू कसे ठसठस करत दुखत राहते तसे मला झाले. महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर लवासामधली कारंजी तर उष्ण लाव्ह्य़ासारखी भासली. उद्या पाण्याबद्दल.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत: ४ नोव्हेंबर
१९११ > जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्या संशोधक व पाली, सिंहली, ब्रह्मी, थाई या भाषा अवगत करून घेऊन त्या भाषांतील मूळ साधनांनिशी संशोधन करून सुमारे १४० शोधनिबंध लिहिणारे विद्वान डॉ. पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचे निधन.
२००५ > कोशकर्ते, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक व इतिहासकार सदाशिव मरतड गर्गे यांचे निधन. काही नोंदींप्रमाणे, त्यांची जन्मतारीखही ४ नोव्हेंबर १९२० अशी आहे. ‘भारतीय समाजविज्ञान कोशा’च्या संपादनाची धुरा त्यांनी दीड तप सांभाळली, तसेच रियासतकार सरदेसाईंच्या सर्व ‘रियासत’ खंडांचे संपादन केले. भारतीय राज्यघटनेचा इतिहास, राज्यशास्त्राचा विकास, समाजवादी समाजरचना, सुलभ राज्यशास्त्र अशी पुस्तके त्यांनी लिहिली. अर्थात, ‘भारतीय समाजविज्ञान कोशा’चे संपादन हे स. मा. गर्गे यांचे उत्तुंग कार्य ठरले.
२०११ > एकांकिका व नाटककार दिलीप परदेशी यांचे निधन. मन पिंजऱ्याचे, महाद्वार, फिनिक्स, काजळपूर्वा हे एकांकिका संग्रह, स्वप्न एका वाल्याचे, निष्पाप, काळोख देत हुंकार, थेंब थेंब आभाळ, मश्रूम्स आर ग्रोइंग, म्हणून मी तुला कुठे नेत नाही आदी गाजलेल्या नाटकांसह ४५ नाटके त्यांनी लिहिली होती.
संजय वझरेकर

Story img Loader