पेट्रोलियम इंधनाला पर्याय म्हणून जैविक इंधनाची निर्मिती होत आहे हे स्तुत्य आहे. अन्नधान्याचे उत्पादन आणि इंधने यात समन्वय साधण्यासाठी एिडबर्ग विद्यापीठातील ‘न्यूफील्ड कौन्सिल ऑन बायोइथिक्स वìकग पार्टी ऑन बायोफुएल्स’चे चेअरमन प्रो. जोएस टेट यांनी जैविक इंधनाची निर्मिती आणि वाटपासंबंधी एक विशिष्ट नियमावली तयार केली आहे. त्यात पाच तत्त्वांचा समावेश आहे : मानवी हक्कांचे रक्षण, पर्यावरण स्थर्य, हरितगृह वायूंवर नियंत्रण, सचोटीने व्यापार, खर्च आणि नफ्याचे समन्यायी वाटप.
जैविक इंधनांच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने मका, सोया, ऊस ही पिके वापरली जातात. ‘स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट’मधील संशोधकांनी २६ निरनिराळ्या जैविक इंधनांचा अभ्यास करून त्यांचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आणि त्यांच्या निर्मितीसाठी खर्च करावी लागणारी ऊर्जा यांचा सखोल आढावा घेतला. अमेरिकेतील मका, ब्राझिलमधील सोयाबीन, मलेशियातील पामतेल यांच्यापासून मिळणारी जैविक इंधने खूप महागडी असतात, असे आढळले. मात्र, स्वयंपाकघरातील खरकटय़ापासून उत्पादित केली जाणारी आणि लाकूड-चाऱ्यापासून मिळवण्यात येणारी इथेनॉलसारखी इंधने स्वस्त व उपकारक असतात.
इंग्लंड आणि युरोपियन देशांतील सध्याच्या जैविक इंधनांच्या धोरणामुळे विकसनशील देशातील लोकांच्या समस्या वाढू शकतात. त्यासाठी, आता तेथील वैज्ञानिक नव्या प्रकारची इंधने निर्माण करण्यावर भर देत आहेत. अमेरिकेतील कॉन्रेल विद्यापीठाच्या संशोधकांनी, जैविक इंधनांच्या निर्मितीसाठी अन्नधान्याचा वापर करणे आणि त्यामुळे धान्यांचा तुटवडा होणे, याविषयी चिंता व्यक्त केली आहे. जगात कुपोषणाचे प्रमाण मोठे असताना, पर्यायी इंधनासाठी पिकांची जमीन वापरणे नतिकदृष्टय़ा चुकीचे ठरते, असा त्यांचा दावा आहे. मक्यापासून इथेनॉल प्राप्त करताना ४६ टक्के, स्विचग्रास चाऱ्यापासून जैविक इंधन मिळवताना ५० टक्के, सोयाबीनपासून बायोडिझेल मिळवताना ६३ टक्के, तर रॅपसिड बियांपासून इंधन तयार करताना ५८ टक्के ऊर्जेचा ऱ्हास (निगेटिव्ह एनर्जी रिटर्न) होतो, असे त्यांच्या संशोधन प्रकल्पात आढळले आहे. याव्यतिरिक्त कीटकनाशके आणि खतांमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण, मातीची धूप, हवेचे प्रदूषण, ग्लोबल वाìमग यांसारख्या समस्या उद्भवतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा