क्युप्राअमोनिअम रेयॉन हा तंतूसुद्धा पुनर्जनीत सेल्युलोज बहुवारिकापासून बनविला जातो. निसर्गातील घन स्वरूपातील सेल्युलोज बहुवारिक एखाद्या द्रावणात विरघळवून नंतर त्याचा तंतूच्या स्वरूपात साका तयार (प्रेसिपिटेशन) केल्यास सेल्युलोजचे रूपांतर एकरेषीय बहुवारिकामध्ये होते. हे कोणताही पुनर्जनीत तंतू बनविण्याचे तत्त्व आहे. सेल्युलोज बहुवारिक हे विरघळण्यास अतिशय अवघड असते. सर्वसाधारण द्रावणात ते विरघळत नाही. इ.स.१९५७ मध्ये स्वित्र्झलडमधील शास्त्रज्ञ श्वाइझर याने सेल्युलोज बहुवारिक कॉपर ऑक्साइड मिसळलेल्या द्रवरूप अमोनियामध्ये विरघळते असा शोध लावला. त्यामुळे सेल्युलोज असलेले पुनर्जनीत तंतू बनविण्याचा मार्ग सोपा झाला. पुढे जे.पी. बेम्बर्ग या कंपनीत नोकरीस असणाऱ्या डॉ. थिएले यांनी ताण-कताई (स्ट्रेच स्पििनग) हे तंत्र विकसित केले आणि या तंत्राचा वापर करून त्यांनी क्युप्राअमोनियम तंतूची निर्मिती केली.
हे तंत्र वापरून याच कंपनीने इंग्लंड, जपान, अमेरिका आणि इटली या देशांत क्युप्राअमोनियम तंतूचे उत्पादन सुरू केले. या कंपनीच्या नावावरून या तंतूस ‘बेम्बर्ग’ असे नाव पडले आणि नंतर तो जगभर बम्बार्ग या नावानेच प्रसिद्ध झाला. या तंतूंची कताई प्रक्रिया व्हिस्कोजपेक्षा काहीशी सोपी असते.  या तंतूंच्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून जििनग नंतर कापसाच्या बियांवर जे अतिशय आखूड तंतू (िलटर्स) उरतात, त्यांचा वापर केला जातो. उत्पादन प्रक्रियेमध्ये प्रथम कापसाच्या आखूड तंतूंतील कचरा व रासायनिक अशुद्धता काढून टाकली जाते व त्यांचे विरंजन (ब्लिचिंग) केले जाते. अशा रीतीने या तंतूंमध्ये शुद्ध स्वरूपातील सेल्युलोज उरते.
द्रवरूप अमोनियममध्ये कॉपर ऑक्साईड मिसळले असता क्युप्राअमोनियम हायड्रॉक्साईड बनते. या द्रावकात शुद्ध केलेले कापसाचे आखूड तंतू मिसळले असता या तंतूंतील सेल्युलोज द्रावकात विरघळतात व त्यांचे द्रावण तयार होते. या द्रावणाला कॉपर सेल्युलोज असे संबोधले जाते. हे कॉपर सेल्युलोजचे द्रावण दीर्घ काळ साठवून ठेवता येते. हे द्रावण थोडे पाणी घालून सौम्य केले जाते. या सौम्य केलेल्या द्रावणात गंधकाम्ल मिसळेले असता द्रावणामधील सेल्युलोजचा साका तयार होतो. सेल्युलोजच्या या साक्यापासून तनित्राच्या (स्पिनरेट) साहाय्याने तंतू तयार केले जातात.

संस्थानांची बखर: पुण्यश्लोक अहिल्याबाई
१७५४ साली मराठय़ांनी कुंभेर किल्ल्यास वेढा घातला होता. मल्हारराव होळकरांचा एकुलता एक मुलगा खंडेराव हा वेढय़ावर देखरेख करीत असताना किल्ल्यावरून आलेल्या तोफगोळ्याने खंडेरावाचा बळी घेतला. खंडेरावाच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी मल्हाररावांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर खंडेरावाचा मुलगा मालेराव याची कारकीर्द जेमतेम एक वर्षांची होऊन तोही मृत्युमुखी पडला.
पुढे कोणी वारस नसल्यामुळे मल्हाररावांची सून अहिल्याबाई हिने स्वत: इ.स. १७६७ ते १७९५ अशी २८ वष्रे इंदूरचा कारभार सांभाळला.
 ‘पुण्यश्लोक’ या आदरार्थी पदवीने इंदूरच्या जनतेनेच सन्मानित केलेल्या अहिल्यादेवींनी आपली राजधानी इंदूरहून महेश्वर येथे नर्मदातिरी हलविली. या कर्तबगार सुनेला मल्हाररावांनी पतिनिधनानंतर सती जाऊ दिले नाही. राणी अहिल्यादेवींनी भारतभरात अनेक मंदिरे आणि नदीघाट बांधले. त्यांनी बांधलेल्या मंदिरांमध्ये द्वारका, उज्जन, बनारस, नाशिक आणि परळी वैजनाथ यांचा समावेश आहे.
 महेश्वर येथील नदीवरचा घाट बांधून अहिल्यादेवींनी इंदूर आणि महेश्वर या शहरांचे सुशोभीकरण केले. पडदा पद्धत झुगारून त्या रोज जनता दरबार भरवीत आणि प्रजेची गाऱ्हाणी ऐकून घेत. उत्तम शासक आणि संघटक म्हणून नावाजल्या गेलेल्या अहिल्यादेवींच्या कारकीर्दीत इंदूर संस्थानाची भरभराट झाली.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader