आपल्याकडून शत्रूपक्षाला गोपनीय माहिती मिळू नये म्हणून सन्याच्या वा पोलिसांच्या ताब्यात सापडल्यावर अतिरेकी, गुंड सायनाइडच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करतात. खरेच का सायनाइड खाल्ल्यावर तात्काळ मृत्यू येतो?
सायनाइडची विषबाधा मुख्यत्वेकरून जे पदार्थ पाण्यात विरघळल्यावर सायनाइड आयन तयार करतात अशा पदार्थातून होते. सर्वसामान्यपणे सायनाइडची विषबाधा ही वायू स्वरूपातील हायड्रोजन सायनाइड आणि स्फटिक स्वरूपात असलेल्या पोटॅशिअम व सोडिअम सायनाइड यांच्यामुळे होऊ शकते. यातील हायड्रोजन सायनाइडमुळे तीव्र विषबाधा होऊन तात्काळ मृत्यू येऊ शकतो. लोकर, रेशीम आणि पॉलियुरेथेन किंवा व्हिनील इ. पदार्थ जाळल्यास यातून निघणाऱ्या धुरात या वायूचा समावेश असतो. हायड्रोजन सायनाइडचे औद्योगिक पातळीवर उत्पादन केले जाते आणि पॉलिमरपासून ते औषध कीटकनाशकांमध्ये वापरले जाते. त्यामुळे कीटकनाशकांमार्फतही ते आपल्यापर्यंत पोहोचू शकते. हायड्रोजन सायनाइड वायू हा रंगहीन असून याचा उत्कलनांक २५.६ अंश सेल्सिअस आहे. हा वायू पाण्यात विरघळतो आणि सायनाइड आयन तयार होतात, या स्वरूपात याला ‘हायड्रोसायनिक आम्ल’ म्हणतात. शरीरात गेल्यानंतर हायड्रोसायनिक आम्ल जठरात शोषले जाते व विषबाधेची लक्षणे दिसतात. पेशीतील मायटोकाँड्रियामध्ये असलेल्या ‘सायटोक्रोम सी ऑक्सिडेज’ या विकराच्या यंत्रणेवर या आम्लामुळे विपरीत परिणाम होतो व पेशी प्राणवायूचा उपयोग करू शकत नाही. म्हणजे रक्तात प्राणवायू पुरेशा प्रमाणात असला, तरीही पेशी प्राणवायूअभावी गुदमरतात व मरतात. साहजिकच व्यक्ती मृत्युमुखी पडते.
पोटॅशिअम आणि सोडिअम सायनाइड हे पांढऱ्या रंगाच्या स्फटिक स्वरूपात असतात. हे दोन्ही पाण्यात विद्राव्य आहेत. या धातू सायनाइडची आम्ल आणि पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन हायड्रोसायनिक आम्ल तयार होते. सायनाइडची विषारी शक्ती त्यातून बाहेर येणाऱ्या हायड्रोसायनिक अॅसिडवर अवलंबून असते. ६० मि.ग्रॅ. शुद्ध हायड्रोसायनिक अॅसिड वा २०० मि.ग्रॅ. पोटॅशिअम सायनाइडमुळे मृत्यू होतो. हायड्रोसायनिक आम्लाचे सेवन केल्यास २ ते १० मिनिटांत, तर सोडिअम वा पोटॅशिअम सायनाइड खाल्ल्यास ३० मिनिटांत मृत्यू ओढवतो.
प्रबोधन पर्व: श्रमाचा अभिमान वाटणारी पिढी महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थांतून तयार होत नाही
‘‘महाराष्ट्र हा देशात औद्योगिकदृष्टय़ा ऐतिहासिक कारणामुळे व स्वातंत्र्योत्तर काळातही दिलेल्या प्रोत्साहनामुळे एक पुढारलेले राज्य समजले जाते. देशातील एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. परंतु आता विकासाच्या गतीच्या बाबतीत गुजरातने महाराष्ट्रास मागे टाकले आहे आणि इतरही अनेक राज्ये महाराष्ट्राबरोबर यशस्वी स्पर्धा करीत आहेत. पण खरा प्रश्न महाराष्ट्रातील औद्योगिक उत्पादनाची उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च व दर्जा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकेल असा आहे काय? महाराष्ट्रातील कापडधंद्याची तर संपूर्ण दुर्दसाच झाली आहे. उद्योगधंद्याच्या प्रगतीवरच अर्थव्यवस्थेचे सामथ्र्य अवलंबून असते. कृषी उद्योगासकट सर्व उद्योगधंद्यांचा गतीने व व्यापक विकास झाला तर लक्षावधी बेकारांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू. म्हणून उद्योगधंद्याच्या प्रगतीकडे सर्व समाजाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. व्यापार व उद्योगधंद्यात असलेल्या सामाजिक घटकासंबधित समाजातील गैरसमज दूर झाले पाहिजेत आणि व्यापार व उद्योगधंद्याच्या विकास ही राष्ट्रीय प्रगतीची गुरुकिल्ली आहे हे सर्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे.’’ अण्णासाहेब शिंदे ‘महाराष्ट्र : विकासाचे नवे प्रवाह’ यातील लेखात म्हणतात (१९९१) – ‘‘भारताला किंवा महाराष्ट्राला वेगाने प्रगती करावयाची असल्यास निरक्षरता नष्ट केल्याशिवाय व साक्षर, सुशिक्षित, कुशल, प्रजानन निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही.. एवढेच नव्हे तर शिस्तप्रिय, व्यवहारी ज्ञान असलेली, श्रमाविषयी प्रेम असलेली, श्रमाने हात व कपडे काळे करून घेण्यात अभिमान वाटणारी सुशिक्षित पिढी आपल्या शिक्षणसंस्थेतून आपण निर्माण करू शकलो नाही. राष्ट्र घडविणारी माणसे आणि समाज तयार केल्याशिवाय महाराष्ट्राचा किंवा भारताच्या प्रगतीचा पाया हा भक्कम आधारावर कधीच उभारता येणार नाही आणि म्हणून कितीही साधनसामग्रीची चर्चा केली तरी देश घडविणारा योग्य माणूस, योग्य शिक्षणपद्धती, शिस्तप्रिय समाज आणि व्यावहारिक ज्ञान असलेला समाज निर्माण केल्याशिवाय साधनसामग्रीचा हिशोब करून फारसेकाही निष्पन्न होणार नाही.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा