एखादं पीक जेव्हा वाया जातं तेव्हा सर्वसाधारणपणे शेतकरी दोन मार्ग स्वीकारतात. एक म्हणजे पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे किंवा ते पीक घेणंच बंद करणे. पण असेही काही शेतकरी आहेत की जे त्या समस्येच्या अगदी मुळापर्यंत पोहोचतात आणि त्या समस्येवर तोडगा काढतात. गुजरातचे धीरजलाल विरजीभाई थुम्मर हे अशाच काही प्रयोगशील शेतकऱ्यांपकी एक.
२००४ सालची गोष्ट. धीरजलालनी आपल्या शेतात ‘जीजी-२०’ जातीच्या भुईमुगाची लागवड केली होती. भुईमूग हे या भागातलं प्रमुख पीक. २००४ साली भुईमुगावर रोग पडला आणि त्यामध्ये धीरजलाल यांचं संपूर्ण पीक अक्षरश: नष्ट झालं. पण इतर शेतकऱ्यांप्रमाणे धीरजलाल खचून गेले नाहीत. रोग पडलेल्या पिकाचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर त्यांना अशी काही रोपं आढळली की ज्यांच्यावर या रोगाचा कोणताही परिणाम झालेला नाही. ही रोपं चांगली राहिली याचा अर्थ रोगावर प्रतिकार करण्याची शक्ती या रोपांमध्ये आहे, हे त्यांनी ओळखलं.
धीरजलालनी मग चांगल्या रोपांपासून मिळालेली बियाणं पुढच्या हंगामात पेरून त्यापासून रोगाला प्रतिबंध करणारी आणखी रोपं मिळवली आणि त्याची बियाणं पुढच्या हंगामात पेरली. अशा प्रकारे सतत तीन वष्रे हा उद्योग धीरजलालनी केला आणि शेवटी रोपांवर पडणाऱ्या बुरशीला प्रतिबंध करू शकेल असं बियाणं मोठय़ा प्रमाणात मिळवण्यात त्यांना यश आलं.
या बियाणांची चाचणी प्रत्यक्ष शेतात व्हावी यासाठी धीरजलालनी हे बियाणं सौराष्ट्रातल्या अमरेली, राजकोट आणि भावनगर जिल्ह्य़ातल्या शेतकऱ्यांना वाटलं. या शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया खूपच चांगल्या होत्या. कारण धीरजलालनी दिलेल्या बियाणांमुळे चांगलं उत्पादन आलं होतं.
हे बियाणं आता ‘धीरज- १०१’ या नावाने ओळखलं जातं. या बियाणांपासून ९५ ते १०५ दिवसांत पीक तयार होऊन प्रत्येक रोपाला सुमारे ३० ते ४० शेंगा लागतात आणि प्रतिहेक्टर सुमारे तीन ते साडेतीन हजार किलो इतकं उत्पादन मिळतं. बुरशी, तांबेरा या रोगांना प्रतिबंध करणारी आणि जास्त उत्पादन देणारी भुईमुगाची ही जात म्हणजे धीरजलाल यांच्या प्रयोगशील वृत्तीचं फलित आहे.
कुतूहल: भुईमुगाची रोगप्रतिबंधक जात
एखादं पीक जेव्हा वाया जातं तेव्हा सर्वसाधारणपणे शेतकरी दोन मार्ग स्वीकारतात. एक म्हणजे पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे किंवा ते पीक घेणंच बंद करणे. पण असेही काही शेतकरी आहेत की जे त्या समस्येच्या अगदी मुळापर्यंत पोहोचतात आणि त्या समस्येवर तोडगा काढतात. गुजरातचे धीरजलाल विरजीभाई थुम्मर हे अशाच काही प्रयोगशील शेतकऱ्यांपकी एक.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-06-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity disease resistant groundnut seeds