कोणती कबरेदके वापरली तर कशी दारू मिळेल याचे ज्ञान माणसाला अनादी कालापासून अवगत आहे आहे. या दारूत इथेनॉल नावाचा महत्वाचा घटक असतो. विविध वनस्पतीजन्य शर्कारामय कबरेदके आंबवून इथेनॉलची निर्मिती करता येते. त्यासाठी यीस्टचा उपयोग करतात. पेट्रोलमध्ये विविध प्रमाणात इथेनॉल मिसळून अमेरिकेत व ब्राझीलमध्ये मोटारी चालवतात. हे इथेनॉल कसावा, बटाटे, मका, ऊस यांपासून बनवितात. इथेनॉलवर चालण्यासाठी मात्र इंजिनात थोडा बदल करावा लागतो.
कुठल्याही जैव वस्तुमानाचे जेव्हा प्राणवायूशिवाय विघटन होते तेव्हा मिथेन, कार्बन मोनॉऑक्साइड, व हायड्रोजन इत्यादी ज्वालाग्राही वायू निर्माण होतात व ते नसíगक वायूप्रमाणे इंधन म्हणून वापरता येतात. साधारणत जैववायू शेणापासून तयार होतो. जैववायूपासून वीज निर्मिती सुद्धा होते. शिवाय वाहने चालवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. कुठल्याही टाकाऊ जैववस्तुमानापासून किवा शेणापासून निर्माण झालेला जैववायू(बायोगॅस) इंधन म्हणून तर कामाला येतोच, पण त्यामुळे वातावरणाचे प्रदूषणही कमी होते. जिथे जिथे कबरेदके असतील ती सर्व कबरेदके जैववायू निर्मितीसाठी वापरता येतात. ही आंबवण्याचीच क्रिया असते, फक्त यात वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव निराळे असतात.
भाभा अणुशक्ती केंद्राने मुंबईत एका ‘निसर्गऋण संयंत्रा’ची कल्पना राबविली आहे. यात स्वयंपाकघर, दवाखाने व हॉटेल यांमधील घनजैव कचरा तसेच कागद, गवत, बगास्से, जंगली वनस्पती वगरेपासून जैववायू निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. यापासून प्रथम नसíगकरीतीने विघटन होणारा कचरा वेगळा केला जातो आणि त्याचे एका पातळ पेस्ट(स्लरी)सारख्या पदार्थात रुपांतर करतात. त्याचे पहिल्यांदा प्राणवायूच्या समवेत व नंतर प्राणवायूच्या शिवाय विघटन करण्यात येते. यासाठी वेगवेगळे सूक्ष्मजंतू वापरले जातात. प्राणवायूच्या समवेत होणाऱ्या विघटनात तापमान वाढवण्यासाठी सौरऊर्जा वापरतात. या प्रक्रियेपासून मिथेन, कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकले जातात. शिवाय उरलेले पाणी परत वापरता येते. मिथेन जळणासाठी किंवा विद्युत निर्मितीसाठी वापरता येतो. विघटन न झालेले सर्व वस्तुमान खत म्हणून वापरता येते. प्राणवायू समवेत जैव कचऱ्याचे विघटन करण्याची प्रक्रिया प्राण वायूशिवाय होणाऱ्या विघटनापूर्वी करणे हा मोठा फरक इतर जैववायू प्रकल्पात आणि निसर्गऋण प्रकल्पात आहे.
प्रबोधन पर्व: मुकुंदराव पाटील – देशातील पहिले ग्रामीण पत्रकार
बहुजन समाजाला धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी म. फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विश्वकोशातील नोंदींनुसार सत्यशोधक चळवळीच्या ऐन बहराच्या काळात (१८७३ ते १९४०)   जवळपास ६५ नियतकालिके निघाली. म. फुले यांचे सहकारी मुकुंदराव पाटील यांचे ‘दीनमित्र’ हे त्यापकीच एक. मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनाने आणि लेखनाने हे पत्र गाजले. मुकुंदराव पाटील यांनी ते तीस वष्रे चालविले. मुळात १८८८मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरूपात ‘दीनमित्र’ सुरू केले. १८९२ मध्ये गणपतरावांच्या निधनाने हे पत्र बंद पडले. त्यांचे दत्तकपुत्र मुकुंदराव पाटील यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी २३ नोव्हेंबर १९१० रोजी ‘दीनमित्र’ साप्ताहिक पुन्हा सुरू केले. आणि तब्बल ५७ वष्रे अव्याहतपणे ते चालविले. अहमदनगरमधील सोमठाणेसारख्या खेडय़ांत ‘दीनमित्र’ प्रकाशित होऊन राज्यभर वितरित होत असे. नंतर ते तरवडी येथून प्रसिद्ध होऊ लागले.  मुकुंदराव हे तत्त्वनिष्ठ संपादक व कट्टर सत्यशोधक होते. केवळ ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्धच नव्हे, तर काही वेळा मराठे व संस्थानिकांविरुद्धही त्यांची लेखणी चाले. त्यांनी ‘कुलकर्णी लीलामृत’, ‘शेटजी प्रताप’, ‘देशभक्त लीलासार’ या ओवीबद्ध ग्रंथांतून अज्ञानी व दरिद्री शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या कुलकर्णी, सावकार व लबाड पुढाऱ्यांवर कोरडे ओढले. ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’ ही महत्त्वाची कादंबरी आणि ‘दीनमित्र निवडक अग्रलेख’ ही त्यांच्या इतर पुस्तकांची नावे. ‘दीनमित्र’ने ब्राह्मणी व्यवस्थेवर व प्रसंगी गावोगावच्या पाटलांवरही कठोर हल्ले चढविले. मुकुंदरावांनी शेतकऱ्यांकडून पसे जमा करून ‘दीनमित्र’ चालविले. ‘दीनमित्र’चा छापखाना शेतीच्या जमिनीत होता. शेतीची जमीन बिनशेतीच्या कामासाठी वापरली जाते असा कांगावा करत ‘दीनमित्र’ला न्यायालयात खेचण्यात आले, तेव्हा शाहू महाराजांनी मुकुंदरावांना आíथक मदत केली. शेतीवर काम करणाऱ्या कामगारांना छपाईचे तंत्र शिकवून मुकुंदरावांनी हे पत्र चालविले. त्यामुळे अनेक संशोधकांनी मुकुंदरावांचा ‘देशातील पहिले ग्रामीण पत्रकार’ असा उल्लेख केला आहे. मुकुंदरावांना इंग्रज सरकारने ‘रावसाहेब’ ही पदवी दिली होती, परंतु म. गांधी यांच्या खुनानंतर त्यांनी ती परत केली.
मनमोराचा पिसारा: प्रेम ..कृष्णमूर्ती उवाच
जिद्दू कृष्णमूर्ती हे नाव भारतसारस्वत विचारवंतांमधले वंदनीय आणि श्रद्धेय नाव. अतिशय लहानपणापासून ऊर्जा जागृती आणि विलक्षण बुद्धिसामर्थ्यांच्या जोरावर त्यांनी आपले दार्शनिक सर्वसामान्यांकरिता ग्रथित केले. स्फटिकासारखे स्पष्ट आणि हिऱ्यासारखे तेजस्वी विचार जे. कृष्णमूर्ती यांनी मांडले. पुपुलजी जयकर आणि विमला ठकार यांनी त्या विचाराला आचरण आणि व्याख्यानाद्वारे पुढे नेले.
कृष्णमूर्तीने कोणताही अभिनिवेश न बाळगता, कोणत्याही पोथिनिष्ठतेचा गवगवा न करता ‘ज्ञानमार्गा’चा अवलंब केला.
त्यामुळे ‘प्रेम’ या भावनेबद्दल जे. कृष्णमूर्ती काय म्हणतात, याबद्दल उत्सुकता वाटली. यातील सुवचने कृष्णमूर्तीनी दिलेल्या भाषणांमधून निवडलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दांमध्ये विलक्षण ओघवतेपण आहे..
प्रेमामध्ये कोणतेही ध्येय अथवा उद्दिष्ट नसते, ते फक्त स्वायत्त आणि चिरंतन असते.
– आपल्या नात्यांमध्ये साचलेपण आणि शिळेपणा का येतो? तुमच्या लक्षात येईल की नात्याबद्दल तुम्ही फक्त विचार, विचार आणि विचारच करीत राहाता. नात्यांना तुम्ही तोलून पाहाता, त्यामधला वजनदारपणा जोखता, त्यावर भाष्य करता, मोजूनमापून बघता! पण नात्यांमधल्या शिळेपणापासून मुक्त करतं ते नात्यातील प्रेम ही भावना. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, तिच्यावर विचार करू शकता, पण प्रेमावर विचार करू शकत नाही.
प्रेम करणारी व्यक्ती क्रांतिकारक असते, फक्त तीच व्यक्ती क्रांती करू शकते.
– जेव्हा असूया, मत्सर, वर्चस्व गाजवण्याची वृत्ती आणि मालकी हक्काच्या भावना लोप पावतात तेव्हा प्रेम म्हणजे काय हे जाणवतं. जोवर ‘त्या’ भावना मनात (थैमान घालत) असतात, तोवर प्रेम अशक्य आहे.
– प्रेम ही मानसिक अवस्था नसून, प्रेम हे आपल्या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे.
– तुम्ही प्रेम करता तेव्हा ‘तू’ आणि ‘मी’ हे द्वैत लोप पावते, प्रेम म्हणजे तेजस्वी ज्योत, धूरविरहित.
– अणूचं विभाजन करण्याची बौद्धिक ताकद असलेल्या माणसाच्या मनात ‘प्रेम’ नसेल तर त्याचा राक्षस होतो.
– प्रेम वाटत नसेल तर ‘भूतकाळ’ पुसून टाकता येणार नाही. प्रेम म्हणजे ‘भूतकाळ’ नाहीसा होणं.
– प्रेमामुळे सगळे काही शक्य होते.
– प्रेम वाटणं, ही भावना त्यामधली उत्कटता जोपासता येत नाही, शिकवता येत नाही.
प्रेम श्वासाइतकं सहज आणि नैसर्गिक असतं.
– प्रेम म्हणजे निसर्गातल्या अखंड सौंदर्याची, मनोहारी सूर्योदयाची नित्य प्रचीती.
– तुम्ही हवं ते करा म्हणजे पृथ्वीवरील यच्चयावत देवांची दर्शनं घ्या, समाजसेवा करा, गरिबांचा उद्धार करा, कविता ते राजकारण, काय वाटेल ते करा, तुमच्या मनात हे सर्व करताना ‘प्रेम’ नसेल तर तुम्ही जिवंत माणूस नाही. तुम्ही काहीही करा, प्रेमानं केलं नाहीत, तर तुमच्या समस्या कैक पटीनं वाढतील; पण प्रेमानं काहीही कराल, तर कोणतीही जोखीम नाही, संघर्ष नाही की समस्या!
डॉ.राजेंद्र बर्वे

Do You Know Which Animals can survive without oxygen
Animals That Live Without Oxygen: अविश्वसनीय! पण ‘हे’ प्राणी जगात ऑक्सिजनशिवाय जगू शकतात; कोणते ते घ्या जाणून…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Is it necessary to take protein powder for fitness What are the side effects
तंदुरुस्तीसाठी ‘प्रोटिन पावडर’ घेण्याची खरोखर गरज आहे? कोणासाठी ती उपयुक्त? कोणते दुष्परिणाम?
This is what happens to the body when you drink amla water first thing in the morning every day
रोज सकाळी उठताच आवळ्याचे पाणी प्यायल्यास काय होईल? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Rajiv Kapoor alcohol addiction heart disease cardiovascular health
अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात
vehicle caught fire Bhusawal, gas set repair Bhusawal,
जळगाव : भुसावळमध्ये गॅस संच दुरुस्तीवेळी मोटारीचा पेट
Story img Loader