१. तंतू लांबी : पॉलिस्टर हा मानवनिर्मित तंतू असल्यामुळे मूलत: तो अखंड लांबीचा बनतो, परंतु त्याच्या उपयोगानुसार त्याची लांबी ठरते. हे तंतू दोन स्वरूपात बनविले जातात. अखंड तंतू आणि आखूड तंतू. अखंड तंतूंची लांबी सलग कित्येक किलोमीटपर्यंत असते, तर आखूड तंतूंची लांबी ३२ मि.मी.पासून १५ से.मी.पर्यंत असते.
२. तंतूंची जाडी / तलमता : पॉलिस्टरचे तंतू विविध तलमतेचे किंवा जाडीचे बनविले जातात. तंतूंची जाडी डेनिअर या मापात मोजली जाते. एक डेनिअरचा तंतू म्हणजे या तंतूच्या ९००० मी. लांबीचे वजन १ ग्रॅम असते. ९००० मी. लांबीचे ग्रॅममध्ये जितके वजन असते, तितका त्या तंतूचा डेनिअर असतो. अखंड तंतू हे २४ पासून २८८ एकेरी तंतू एकत्र करून बनविले जातात. अखंड तंतूंची एकत्रित जाडी ही ४० डेनिअरपासून ३०० डेनिअपर्यंत असते आणि त्यामधील एकेरी तंतूंची जाडी ०.५ पासून १.५ डेनिअर इतकी असते. काही वेळा अखंड तंतू एकेरी स्वरूपातच वापरले जातात, त्या वेळी या एकेरी तंतूंची जाडी ८ ते २५ डेनिअर इतकी असते.
आखूड तंतूंची जाडी ही, हे तंतू कुठल्या तंतूबरोबर मिसळले जाणार आहेत त्यावर आणि कुठल्या प्रकारच्या कापडासाठी वापरले जाणार आहेत यावर ठरते. १.० ते १.४ डेनिअरचे तंतू शìटग, साडय़ा यासाठी लागणारे कापड तयार करण्यासाठी उपयोगात आणले जातात, तर २.० व ३.० डेनिअरच्या तंतूंपासून पँट व सूटिंगसाठी लागणारे कापड बनविले जाते. लोकरीबरोबर मिश्रण करण्यासाठी ३.० ते ६.० डेनिअर जाडीचे तंतू बनविले जातात, तर गालिच्यासाठीचा तंतू ९.० ते १५.० डेनिअर जाडीचा असतो.
३. तंतूंची ताकद / तन्यता : पॉलिस्टर तंतूची ताकद बहुतेक सर्व नसíगक तंतूंपेक्षा जास्त असते.
मानवनिर्मित तंतूंची ताकद ही ग्रॅम या एककात मोजली जाते, परंतु तुलनात्मक अभ्यास करण्याच्या दृष्टीने ग्रॅम्स प्रति डेनिअर या एककात मोजली जाणारी तन्यता अधिक प्रचलित आहे.
विविध प्रकारच्या उपयोगासाठी पॉलिस्टरचे विविध तन्यतेचे तंतू बनविले जातात. पॉलिस्टर तंतूखेरीज इतर कुठल्याही नसíगक किंवा मानवनिर्मित तंतूंमध्ये तन्यतेच्या बाबतीत इतकी विविधता आढळून येत नाही.
संस्थानांची बखर: शीख साम्राज्याची अखेर
महाराजा दुलीप सिंग हे महाराजा रणजित सिंगांचे कनिष्ठ पुत्र आणि शीख साम्राज्याचे अखेरचे शासक. दुलीपला पाचव्या वर्षी आई जिंदकौरच्या पालकत्वाखाली राजसिंहासनावर बसविले गेले, दुलीप सिंगांच्या फौजांनी प्रथम अँग्लो-शीख युद्धात सपाटून मार खाल्ल्यावर बराच मोठा राज्यप्रदेश गमावला. कंपनी सरकारने दुलीप सिंगला राजपदावरून पदच्युत करून त्याचे राज्य कंपनी सरकारात सामील केले गेले. पाच लाख रुपये वार्षकि निवृत्तिवेतन देऊन दुलीपला इंग्लंडमध्ये हद्दपार केले गेले. आई जिंदकौरला कोलकात्यात स्थानबद्ध केले गेले. इंग्लंडला नेण्यापूर्वी त्याचे इंग्लिशीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी त्याला ख्रिश्चन धर्मविषयक माहिती देऊन, १८५३ साली फतेहगढ येथे त्याला ख्रिश्चन धर्माची दीक्षा देण्यात आली. दुलीप सिंगने दोन लग्ने केली. पहिले बाम्बा मुलरशी व दुसरे अॅडा इग्लसशी. या दोन पत्नींपासून झालेली आठ मुले अल्पवयीन ठरून पुढे शिखांच्या या राजघराण्याचा अस्त झाला. दुलीप सिंग प्रथम इंग्लंडमध्ये आला त्या वेळी फक्त पंधरा वर्षांचा होता आणि महाराणी व्हिक्टोरियाचा त्याला लळा लागलेला होता. राणीच्या नात्यातल्या मुलांबरोबर तो बकिंगहॅम राजवाडय़ात खेळत असे. इंग्लंडमध्ये आल्यावर त्याला फक्त दोनदाच भारतात येऊ दिले गेले. प्रथम आईला भेटण्यासाठी व तिला आपल्याबरोबर इंग्लंडमध्ये नेण्यासाठी तर दुसऱ्या वेळी आई जिंदकौरच्या मृत्यूनंतर तिच्या अस्थी भारतात नेण्यासाठी. १८८२ साली दुलीप सिंगने ब्रिटिश राजवटीकडून आपल्याला मिळणाऱ्या निवृत्तिवेतनात वाढ व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले. परंतु ब्रिटिशांनी ते नाकारल्यावर तो फ्रान्समध्ये वास्तव्यासाठी गेला. १८९३ साली वयाच्या ५५ व्या वर्षी दुलीप सिंगचा पॅरिस येथे मृत्यू झाला. आयुष्यभर पारतंत्र्यात जगलेल्या दुलीपची इच्छा, आपल्या मृत्यूनंतर आपले अंत्यसंस्कार शीख पद्धतीने भारतात व्हावेत अशी होती. पण ब्रिटिश राजवटीने त्यामुळे भारतात अराजक माजेल असे कारण दाखवून या शिखांच्या महाराजाचे अंत्यसंस्कार लंडनमध्ये ख्रिश्चन पद्धतीनेच केले!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com