रक्ताच्या एका लहानशा थेंबात लक्षावधी पेशी असतात. कधी जखम झाली तर रक्त वाहून वाया जाऊ नये म्हणून रक्त गोठण्याची एक संरक्षण यंत्रणा आपल्या शरीरात निसर्गत:च असते. जखमेतून वाहणारे रक्त काही वेळातच जेलीसारखे घट्ट व्हायला लागते. सर्वप्रथम त्यात धागे तयार व्हायला लागतात. मग त्या धाग्यांचे जाळे तयार होते. त्यात रक्तातल्या पेशी आणि इतर घटक अडकायला लागतात. रक्ताची गुठळी तयार व्हायला लागते किंवा रक्त गोठायला लागते. त्या गुठळीमध्ये हळूहळू रक्तातले जीवद्रव्यही अडकते. रक्ताची गुठळी अधिकाधिक घट्ट होत जाते आणि रक्त वाहायचे थांबते. वरवरची जखम असेल तर ही प्रक्रिया १ ते ५ मिनिटांत पूर्ण होते. जखम खोल असली तर मात्र या प्रक्रियेला वेळ लागतो.
रक्ताची गुठळी होण्यासाठी आधी जी धाग्यांची जाळी बांधली जाते, ती ‘फायब्रिन’ या रसायनामुळे! पण हे रसायन आपल्या रक्तात अगदी तयार स्वरूपात नसते, कारण तसे जर ते रक्तात असेल तर शरीरांतर्गत सतत रक्ताच्या गुठळ्या होतील आणि रक्त व्यवस्थित वाहूच शकणार नाही. रक्तामधील फायब्रिनोजेन आणि थ्रोम्बिन हे दोन पदार्थ एकत्र आले की फायब्रिन तयार होते. रक्तातल्या जीवद्रव्यात फायब्रिनोजेन असते, तसेच प्रोथ्रोम्बिन नावाचे एक रसायन असते. प्रोथ्रोम्बिनपासून थ्रोम्बिन तयार होते, पण तेही काही ठरावीक परिस्थितीतच!
शरीराच्या ज्या भागाला जखम झाली असेल त्या ठिकाणच्या जखमी ऊती, रक्ताच्या गुठळी होण्याच्या प्रक्रियेला उद्युक्त करणारे ‘थ्रोम्बोकीनेस’ नावाचे रसायन रक्तात सोडतात. रक्तातल्या कॅल्शियमच्या उपस्थितीत ‘थ्रोम्बोकीनेस’ कार्यरत होते आणि प्रोथ्रोम्बिनपासून थ्रोम्बिन तयार करते. या ठरावीक परिस्थितीत तयार झालेल्या थ्रोम्बिनची फायब्रिनोजेनबरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि फायब्रिनचे धागे तयार व्हायला लागतात. अशा प्रकारे अनेक रासायनिक अभिक्रिया होत, जखमेच्या ठिकाणी रक्त गोठण्याची प्रक्रिया पार पडते.
पण मग आपल्याला जेव्हा डास चावतो तेव्हा त्याने आपल्या त्वचेला केलेल्या सूक्ष्म अशा जखमेच्या ठिकाणी रक्ताची गुठळी होऊन, डासाला आपले रक्त शोषण्यापासून आपोआपच प्रतिबंध का नाही होत?
मनमोराचा पिसारा: व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड
लुई आर्मस्ट्राँगचं हे गाणं.. अंतराळवीर नव्हे, ‘पॉप्स’ या टोपणनावानं ओळखला जाणारा हा संगीतकार! हे गाणं केवळ ऐकण्यासारखं नाहिये. लुईला जबरा स्टेज प्रेझेन्स होता. त्याचा चेहरा कमालीचा भावदर्शी- इन्टेन्स होता. ‘व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड.. कसं अद्भुत सुंदर आहे हे जग’ हे गाताना सुरांतली प्रसन्नता त्याच्या डोळय़ांत चमकते. या गाण्यातल्या सकारात्मकतेवर त्याचा विश्वास आहे, असं त्याच्याकडे पाहून वाटतं.
कुठून येते ही सकारात्मकता, हा विश्वास? लुई मूळचा गरीब घरातला, चार पैसे सहज कमवता आले तर आईला वेश्याव्यवसाय करावा लागणार नाही, हा धडा त्यानं वयाच्या दहाव्या वर्षी गिरवला.
पुढे लिथुनिआमधील एका स्थलांतरित ज्यू कुटुंबानं हे धुळीतलं रत्न पारखलं आणि लुई संगीत शिकू लागला. जाझ संगीत प्रकाराला त्यानं आकार दिला.
आपल्या खरखरीत तरी मुलायम आवाजानं गाणी गायली. ‘व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड..’ हे गाणं गायलं तेव्हा वांशिक द्वेषानं अमेरिका धुमसत होती (१९६७). या गाण्यानं तेव्हा तिथे लोकप्रियता मिळवली नाही, पण युरोपनं ते गाणं उचललं आणि लुई रातोरात महाप्रसिद्ध झाला. अलीकडे डेव्हिड अॅटनबरोनं (बीबीसीवर) त्या गाण्याला आदरांजली वाहिली.
यूटय़ुबवर कोण्या संगीतप्रेमीनं ‘केनीजी’च्या सुरावटीवर अरेंज केलेलं हे गाणं ऐक. पुन:पुन्हा ऐकशील आणि म्हणशील कसं अद्भुत सुंदर जग आहे!
त्या गाण्याचा भावानुवाद असा..
हिरवीगार दिसतात झाडं, लाल गुलाब उठून दिसतात
तुझ्यासाठी, माझ्यासाठी, बघ कसे फुलून येतात.
म्हणतो मी स्वत:शीच मग,
कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
लख्ख निळं दिसतं आभाळ,
धवल -शुभ्र दिसतात जल-द
उजळलेले प्रसन्न दिवस, धीर गंभीर रात्री गडद
म्हणतो मी स्वत:शीच मग,
कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
खुलतात रंग इंद्रधनुष्याचे, आभाळात तिथे वर
पण त्याची आभा उजळते इथे साऱ्यांच्या चेहऱ्यावर
करतात मित्र हस्तांदोलन, विचारतात, कसा आहेस तू
खरं तर त्यांना म्हणायचं असतं, दोस्ता, आय लव यू
म्हणतो मी स्वत:शीच मग,
कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
किलबिलाट करताना दिसतात बाळं,
दिसतात मोठी होताना
किती शिकून होतील शहाणी!
करताही येत नाही कल्पना
म्हणतो मी स्वत:शीच मग,
कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
भावानुवाद : ललिता बर्वे
प्रबोधन पर्व: सर्वाच्या हिताचा, निष्पक्ष सत्यशोधक-विचार
‘‘सत्यशोधक समाज हा काही कोणा एका पक्षाची बाजू धरण्यासाठी अवतरला नाही. नव्हे, पक्षभेद, वर्णभेद यांचा व समाजाचा मुळीच संबंध नाही. समाज हा ज्ञानसूर्य आहे. ज्याप्रमाणे सूर्याचे उगवणे कोणा एकाच जातीच्या अथवा पंथाच्या हितासाठी नसते, तद्वत समाजाचे उद्देशही कोणा एका पक्षाच्याच बाजूचे असतात असे नाही.. कोणी कोणी म्हणतात की, सत्यशोधक समाजाला ध्येयच नाही. तो वारकऱ्याप्रमाणे माळा घाला म्हणत नाही, अथवा समाजाप्रमाणे प्रार्थना करीत नाही; तेव्हा याला काही बुडच नाही, असा टीकाकारांचा आरोप आहे. पण हा आरोप सर्वस्वी चुकीचा किंबहुना बिनबुडाचा आहे. ध्येयाशिवाय जगात एकही कार्य होत नाही, ध्येय नसता कार्य करू पाहणे म्हणजे कुठे जायचे हे न ठरविता आगगाडीत बसल्याप्रमाणे निर्थक आहे.. सत्यशोधक समाज कोणत्याही धर्मास, पंथास किंवा समाजास नादान म्हणत नाही, फक्त त्या त्या धर्मात, त्या त्या पंथात होत चाललेली घाण जाणणारे उत्पन्न होणे, म्हणजेच या समाजाचा आचार आणि त्या ध्येयाचा विजय होय. यावरून गंध माळा, जाणवे टिळा यांच्यापुरते समाजाचे ध्येय अपुरे नसून सर्वाच्या हिताचा ज्यात निष्पक्षभावाने विचार होणे शक्य आहे, इतके ते विशाल आहे!’’ ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील सत्यशोधक समाजाविषयीची भूमिका स्पष्ट करताना लिहितात – ‘‘धर्माच्या नावाखाली निर्माण झालेली घाण नष्ट करावी, प्रत्येकाने आपल्या धर्मातील खरेखोटेपणा डोळसपणे पाहावा, देव आणि धर्म यांच्यात दलाली मिळवण्याच्या उद्देशाने अज्ञानाची भिंत उभी करणाऱ्या धर्मगुरूवर बहिष्कार टाकावा, मानसिक गुलामगिरीचे घट्ट बसलेले जू झुगारून देण्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. अस्पृश्यता निवारण, जातीयता प्रतिकार, शिक्षण प्रसार, बालविवाह बंदी इत्यादी सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांना सरकारने कायद्याचे स्वरूप दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करून सरकारने अंधश्रद्धा वाढविणाऱ्या यात्रा, मेळे इ. ना आळा घालावा, मूर्तीपूजेविरुद्ध प्रचार करावा, धर्मवेडाने बुद्धी भडकावून देणाऱ्या धर्माचार्यावर र्निबध घालावेत.. ’’