एखादा बहुरूपी जसा वेगवेगळ्या रूपात आढळतो, तसं कार्बन हे मूलद्रव्य वेगवेगळ्या रूपात आढळतं. कार्बन म्हणजे जणू रसायनाशास्त्रातला बहुरूपीच! कार्बनची ही बहुरूपंसुद्धा वैशिष्टय़पूर्ण आणि आश्चर्यकारक गुणधर्म असलेली आहेत. यापकीच एक आहे ग्राफिन. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पोलादापेक्षा तीनशेपट अधिक मजबूत आणि हिऱ्यापेक्षा चाळीसपट कठीण असलेलं ग्राफिन रबरासारखं लवचीक आहे.
मधमाश्यांच्या पोळ्याच्या कप्प्यांचा जसा आकार असतो, त्या आकारात कार्बनचे अणू एकमेकांशी जोडले जाऊन ग्राफिनचे रेणू तयार होतात. या ग्राफिनला लांबी आणि रुंदी आहे, पण जाडी नाही. ग्राफिनचे सुमारे तीस लाख थर एकमेकांवर ठेवले, तर त्याची जाडी केवळ एक मिलिमीटर होईल.
सामान्य तापमानाला ग्राफिन हे विद्युत प्रवाहाचं चांगलं वाहक आहे. त्यामधून उष्णतेचं चांगल्या प्रकारे वहन होतं.
ग्राफिनचा उपयोग वजनाने अतिशय हलके असलेले उपग्रह, विमानं आणि लष्करी मोटारींच्या बांधणीत करता येतो. ‘बोइंग ७८७’ या अत्याधुनिक विमानातही ग्राफिनचा वापर केलेला आहे. विमानांचा भूसंपर्क होत नसल्याने आकाशात उडणाऱ्या विमानांना लखलखणाऱ्या विजांचा धोका सहसा संभवत नाही. पण तरीही ग्राफिनचा समावेश असलेल्या पदार्थाचा सूक्ष्म थर विमानांना अधिकच सुरक्षित बनवतो.
बर्कलेच्या संशोधकांनी नुकताच ग्राफिनपासून तीस नॅनोमीटर इतक्या सूक्ष्म जाडीचा आणि सात मिलिमीटर रुंदीचा एक पातळ पडदा बनविला आहे. हा पडदा सिलिकॉन डायऑक्साईडचा थर दिलेल्या दोन सिलिकॉन इलेक्ट्रोडमध्ये ठेवण्यात आला. या इलेक्ट्रोडला विद्युतपुरवठा केला असता स्थितीक विद्युत बल निर्माण होतं आणि त्यामुळे ग्राफिनचा पातळ पडदा थरथरतो. पडद्याच्या थरथरण्यामुळे विविध प्रकारचे दर्जेदार आवाज तयार होतात. ग्राफिन अत्यंत पातळ पण लवचीक असल्याने आवाजाचा दर्जा अत्युच्च असतो.
ग्राफिन वापरून तयार केलेले मोबाइल हँडसेट आता येऊ घातले आहेत. हे हँडसेट अत्यंत पातळ आणि लवचीक असल्याने हवे तसे वाकवता येतील किंवा त्यांची चक्क घडी घालता येईल. अशाच प्रकारे घडी घालून कुठेही सहज नेता येणारा टीव्हीसुद्धा भविष्यात तयार होऊ शकेल.

मनमोराचा पिसारा: अंधश्रद्ध व्यक्तींची मजबुरी!
पॅरानॉर्मल प्रकार, प्लँचेट, आत्म्याचं पुनरागमन, अंधश्रद्धा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा भेकड खून या गोष्टींनी माध्यमं चक्रावून गेली आहेत. श्रद्धेच्या पलीकडे असलेल्या अतींद्रिय शक्ती, त्यांचा आपल्या नित्यनैमित्तिक जीवनावर होणारा तथाकथित परिणाम यावर उलटसुलट मतं व्यक्त होत आहेत. अनेक वर्षांपूर्वी लोकविज्ञान चळवळीतर्फे मुंबईत पन्नासेक ठिकाणी अंधश्रद्धेचा पर्दाफाश, विज्ञान विचारांवर आधारित कार्यक्रमांमध्ये आणि त्यानंतर मनोविकारतज्ज्ञ म्हणून समाविष्ट झाल्याचं आठवलं.
वडाळ्याच्या विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर लोकविज्ञानाचा स्टॉल आणि प्रयोग होते. वाकवलेला दाभण जिभेतून आरपार घालवल्याचा आभास, पाण्यासारख्या रसायनाचा अचानक होणारा धूर अशा प्रयोगांतून लोकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या चमत्कारांचा पितळ उघडं पाडण्याचा रंजक प्रयोग होता. त्यात स्वतच सामील झाल्यामुळे अंधश्रद्ध जनसामान्यांची मानसिकता जवळून न्याहाळता आली.
अंधश्रद्धेला बळी पडणारे सर्वसामान्य अशिक्षित लोक आणि सुशिक्षित, विद्याविभूषित मंडळी यांची ‘मानसिकता’ एकच असते. अज्ञानी मंडळी भूतप्रेत, अघोरी मार्ग, कोंबडी-बकरी इ. बळी घेण्याच्या प्रकाराच्या आहारी जातात. तर सुशिक्षित मंडळी नाना प्रकारच्या अंगठय़ा, विचित्र व्रतवैकल्यं, भविष्य सांगणाऱ्यांच्या मागे लागतात. पुढे मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करताना अंगात येणे, कर्णपिशाच्च, भास-आभास, करणी, मूठकरणी यांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनाची वाताहात कशी होते, हा जवळपास रोजचा अनुभव झाला.
अशा प्रकारच्या सर्व अंधश्रद्धा, प्लँचेट, आत्म्याची माध्यमं (मीडिया) यावर केवळ चळवळ, आंदोलन कायदा करूनही प्रश्न सुटणार नाही.
आपण अशा अंधश्रद्धांना का बळी पडतो? तर्कबुद्धीला न पटणाऱ्या गोष्टींना का सत्य म्हणून स्वीकारतो? अंधश्रद्धेला बळी पाडणाऱ्या तथाकथित मांत्रिक, गुरू, बुवा यांना सुशिक्षित नि अशिक्षित माणसं का शरण जातात?
विशेष म्हणजे अंधश्रद्धा निर्माण करणारे, कुडमुडे ज्योतिषी यांच्यात लोकांना बोल बोल म्हणता पटविण्याचं कोणतं कौशल्य असतं? ते कोणत्या नजरबंदीचा खेळ करीत बंद मुठीतून राख काढून दाखवतात, अचल जड वस्तूंना कसं स्वेच्छेने हलवतात? अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वामधले कोणते पैलू ते लोकांना सहजी पटविण्याकरिता वापरतात? यावर अभ्यास आणि संशोधन करायला हवं!
अशा प्रभावी व्यक्तीकडे माणसं ओळखण्याच्या, त्यांच्या मानसिकतेमधल्या कच्च्या दुव्यांचा वापर (त्यांच्याविरुद्ध) करण्याची विलक्षण हातोटी असते. समोरच्या व्यक्तींची पटकन नजरेत न  वैशिष्टय़ं क्षणार्धात हेरायची आणि त्यांना कह्य़ात घ्यायचं तंत्र त्यांना अवगत असतं.
गंमत म्हणजे यातल्या अनेक लहान-मोठय़ा दृश्य चकव्यांची पिसाऱ्यात या वर्षी आणि २०१२ च्या सीझनमध्ये ओळख करून दिलेली आहे.
रिचर्ड वाइस्मन या मानसशास्त्राच्या प्राध्यापकानं दैनंदिन जीवनातल्या मानसिक घडामोडींचा शास्त्रशुद्ध संशोधनात्मक अभ्यास केलाय. अशा किरकोळ वाटणाऱ्या बारीकसारीक समजुती-गैरसमजुती आणि फसगतीच्या अभ्यासाला ‘क्वर्कॉलॉजी’ (०४्र१‘’ॠ८) म्हणतात. ‘पॅरानॉर्मालिटी’, ‘व्हाय वी सी व्हॉट इजंट देअर’ अशा नावाच्या पुस्तकात क्वर्कॉलॉजीच्या पलीकडच्या अनेक गोष्टींचा शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय प्रयोगांच्या मदतीने उलगडा केला आहे. रिचर्ड मुळात हौशी जादूगार, नजरबंदीने टोपीतून (दडवलेला) ससा बाहेर काढणारे. त्यामुळे चमत्कारामागील लबाड युक्त्या त्यांना चांगल्याच अवगत. मानसशास्त्राचा सखोल अभ्यास आणि अंगभूत विनोदी, थट्टेखोर स्वभाव याच्या जोरावर अतिशय रंजक आणि माहितीप्रचुर पुस्तक  त्यांनी लिहिले आहे. ‘भुताच्या प्रयोगशाळे’तल्या वस्तू रात्री-बेरात्री पडणे, विविध टिपिकल आवाज येणे याची कसून तपासणी केली; त्यातून पदार्थविज्ञानामधील ध्वनिकंपनांबद्दल आगळा सिद्धांत मांडलाय (इन्फ्रारेडप्रमाणे इन्फ्रासाऊंड) ते मुळातून वाचायला हवं. रिचर्ड यांची वृत्ती माणुसकीला मानते, त्यामुळे अंधश्रद्ध व्यक्तींबद्दल त्यांना (टिपिकल) तुच्छता वाटत नाही. त्यांची मजबुरी ते समजून घेतात. प्रेमानं पोक्तपणे आणि मिस्कील भाषेत संवाद करतात.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Dr. K. Kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution
समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Animals have exceptional memory
विलक्षण स्मरणशक्ती असते ‘या’ प्राण्यांकडे! माणसालाही देऊ शकतात आव्हान
Loksatta kutuhal Blue Planet Earth British Geologist Dr Arthur Holmes
कुतूहल: निळा ग्रह : आपली पृथ्वी
vehicle caught fire Bhusawal, gas set repair Bhusawal,
जळगाव : भुसावळमध्ये गॅस संच दुरुस्तीवेळी मोटारीचा पेट

प्रबोधन पर्व: महाराष्ट्राची राजकीय प्रवृत्ती अखिल भारतीय राजकारणाची आहे..
‘‘महाराष्ट्राने आजवर प्रादेशिक राजकारण केलेले नाही. अगदी इतिहास काळापासून महाराष्ट्राची राजकीय प्रवृत्ती अखिल भारतीय राजकारण करण्याची आहे. शिवाजी किंवा पहिला बाजीराव, त्यानंतर रानडे- गोखले- टिळक, नंतरचे सावरकर- आंबेडकर किंवा आजचे डांगे- एम.एम.जोशी- यशवंतराव चव्हाण वगैरे सर्व नेते देशाचे राजकारण करणारे होते- आहेत. दिल्लीवर, अखिल भारतावर या नेत्यांचा प्रभाव पडला की नाही, ते किती प्रमाणात यशस्वी- अयशस्वी ठरले, हा प्रश्न वेगळा. पण या सगळ्यांची प्रवृत्ती, राजकीय बैठक अखिल भारतीय होती. दक्षिणेकडे, तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशातून अशी अखिल भारतीय राजकारणाची परंपरागत प्रवृत्ती दिसून येत नाही. नादिरशहा किंवा अहमदशहा अब्दाली दिल्लीवर चालून आला तेव्हा महाराष्ट्रातून फौजा घेऊन जायची तशी काय आवश्यकता होती? शिवाजीमहाराजांना सर्व दक्षिणेकडेची सुभेदारी औरंजेबाकडून सहज मिळवता आली असती; पण त्यांना हवे होते हिंदवी स्वराज्य- दक्षिणोत्तर सर्व हिंदुंचे राज्य!’’
श्री. ग. माजगावकर जानेवारी १९८३ मधील लेखात प्रादेशिक राजकारणाच्या मर्यादा सांगत महाराष्ट्राच्या परंपरेविषयी लिहितात – ‘‘महाराष्ट्रात ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद असला, दलित- अदलित भेद असले तरी द्रविड मुन्नेत्रसारखी चळवळ येथे कधीच उभी राहिलेली नाही. या अर्थाने सावरकरांनी महाराष्ट्राला भारताचा खड्गहस्त म्हटलेले आहे. आपापल्या प्रांतापुरते राजकारणच देशात यापुढे वाढणार असेल तर भारतीय राजकारणाचा विचार कोण करणार?.. प्रादेशिक पक्षांचा आवाकाच मर्यादित असतो. काश्मीर- आसामसारखे किंवा नाणेनिधी कर्जासारखे भारतव्यापी प्रश्न या आवाक्यात बसूच शकत नाहीत आणि हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे असतात, जितके बेळगाव- कारवारसारखे किंवा पाणी – वाटपासारखे प्रश्न असतात. म्हणून इतरत्र जरी प्रादेशिक पक्ष, आपापल्या राज्यापुरते असलेले राजकारण डोके वर काढत असले तरी महाराष्ट्राने या लाटेत बुडून जाणे, हे आजवरच्या इतिहास परंपरेशी विसंगत ठरणार आहे.. महाराष्ट्रात तरी अशा अविचाराला वाव मिळू नये.’’

Story img Loader