कार्बन नॅनो टय़ूब्ज अतिशय सूक्ष्म असतात. नॅनो टय़ूब्जला फक्त लांबी असते; रुंदी नाही. जर नॅनो टय़ूबची मानवी केसाच्या जाडीची मोळी बनवायची असेल तर सुमारे ऐंशी हजार नॅनो टय़ूब्ज एकत्र कराव्या लागतील. कार्बन नॅनो टय़ूब्जवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. त्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूकही केली गेली आहे.
नॅनो टय़ूब्ज पोलादापेक्षा बळकट पण लवचीक असतात. पोलादाच्या तुलनेत त्या शंभर पट मजबूत आणि पाच पट कठीण असतात. या टय़ूब्ज उष्णतेच्या अतिउत्तम वाहक आहेत. जर नॅनो टय़ूब्जपासून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी तयार केली तर गॅसवर भांडं ठेवेपर्यंत हाताला चटका बसेल.
नॅनो टय़ूब्जचे बरेच प्रकार आहेत. काही नॅनो टय़ूब्ज फक्त एकाच गुंडाळीच्या असतात, तर काही एकात एक असलेल्या अनेक गुंडाळींच्या असतात. ही गुंडाळी कोणत्या कोनातून होते यावर नॅनो टय़ूब्जचे गुणधर्म अवलंबून असतात. विशिष्ट कोनातून गुंडाळी झाली तर नॅनो टय़ूब्ज धातूचे गुणधर्म दाखवतात; तर वेगळ्या कोनातून गुंडाळले गेल्यास त्या अर्धवाहकाचे गुणधर्म दाखवतात.
भविष्यात संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या चिप्स ह्या सिलिकॉनपासून नव्हे तर कार्बनच्या नॅनोटय़ूब्जपासून बनलेल्या असतील. कार्बनची एक नॅनोटय़ूब माणसाच्या केसापेक्षा लाखो पटींनी लहान असते. त्यामुळे या टय़ूब्जपासून अतिसूक्ष्म संगणक तयार करणं सहज शक्य होईल. हे अतिसूक्ष्म आकाराचे नॅनो संगणक उद्या आपलं घर, रस्ते, वाहनं, इतकंच काय पण आपण घातलेल्या कपडय़ांमध्ये आणि आपल्या शरीरातसुद्धा असू शकतील!
मोबाइल हँडसेट, कार बंपर्स, बुलेटप्रूफ जाकिटं, तसंच संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्रांमध्येसुद्धा कार्बन टय़ूब्जचा उपयोग केला जाऊ शकतो.
सध्या भेडसावणाऱ्या इंधनसमस्येवरही कार्बन नॅनो टय़ूब्जमुळे काही प्रमाणात मात करणं शक्य होऊ शकेल. कारण कार्बन नॅनोटय़ूब्जमध्ये हायड्रोजन वायू साठवून ठेवता येतो. हायड्रोजन साठवण्याची कार्बन नॅनो टय़ूब्जची सध्याची क्षमता सुमारे ११ टक्के आहे. हे प्रमाण जर ३० टक्क्यांपर्यंत वाढले तर हायड्रोजन गॅसवर चालणारी वाहने वापरात येऊ शकतील. यासाठी जगभरातले संशोधक प्रयत्नशील आहेत.
मनमोराचा पिसारा: रस्में उल्फत को निभाए कैसे..
मनाच्या एखाद्या चिंतनमय क्षणी काही गाणी आठवतात. गज़्ालांची याद येते नि मन आश्वस्त नाही तर अस्वस्थ होतं. हवे असतात फुरसतचे चार दोन लम्हें, पण मनात दाटून येतात न सुटलेले काही प्रश्न. मनाच्या सतारीवर गहिरी सुरावट उमटते, शब्दांच्या झालरी घेऊन अवघड आशय मनाला छेडतो. आपल्याच चुका नि प्रेमातल्या खम्ता मनात काहूर माजवून बेचैन करतात. का बरं असं घडलं आपल्या आयुष्यात? का भोगावी लागली न संपणारी ही मजबुरी? आपली आपबीती कोणाला सुनवायला जावं तर अपने पराये झालेले असतात. मनातल्या न विझणाऱ्या जखमा दाखवू गेलं तर आपलेच बेगाने का होतात? आपलीच जिंदगी आपल्यालाच फितूर होते. का?
‘दिल की राहें’ १९७३ सालच्या (आठवतोय कुणाला? राकेश पांडे आणि रेहाना सुलतानच्या) चित्रपटात नक्श लायलपुरींची, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली लतादीदीनं गायलेली गज़्ाल मनाला अशीच छेडते. लतादीदींनी त्या गज़्ालमधली कशीश इतकी प्रभावीपणे मांडलीय की मन स्तब्ध होतं. गज़्ालमधल्या नायिकेनं उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर नाहीयेत, कारण
चिंगारी कोई भडके
सावन उसे बुझाए
जो सावन अगन लगाए, उसे कौन बुझाए?
तशीच खंत, नाराजीपणा, मनाची निरुत्तर अवस्था आनंद बक्षींनी ‘अमर प्रेम’मध्येही मांडली होती.
या गज़्ालमध्ये ‘कैसे’ या एका शब्दीय रदीफचा अतिशय हृद्य वापर केला आहे आणि लतादीदींनी त्या ‘कैसे’चं अक्षरश: सोनं केलंय. त्या ‘कैसे’त नाइलाज आहे, खिन्नता आहे. दबलेली चीडही प्रतिध्वनित होते. ‘इतकं’ कसं कळत नाही रे तुला? माझ्या नशिबाला हा कसला भोगवटा? असं न बोलता म्हटलंय.
गंमत म्हणजे कोण्या एका रसिकानं यूटय़ूबवर ‘फ्रेड अस्टेअर’चं नृत्य या गाण्यावर जोडून दिलंय. त्यातली लय, सम, ताल, मुद्रा, नृत्यमय ओघवता डौलदार पदन्यास.. अप्रतीम..
रस्में उलफत को निभाए तो निभाए कैसे
गर तरफ आग है दामन को बचाए कैसे
दिल की राहो में जो उठाते हैं जो दुनियावाले
कोई के हद के वो दीवार गिराए कैसे
दर्द में डूबे नगमें हजारो हैं मगर
साजेदिल टूट गया हो तो सुनाए कैसे
बोझ होता जो ग़मोंका तो उठा भी लेते
ज़िदगी बोझ बनी हो तो उठाए कैसे
रस्में उलफत को निभाए तो निभाए कैसे
हर तरफ आग है दामनको बचाए कैसे
नक्श लायलपुरी /मदन मोहन
लता
दिल की राहें
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: सत्तेच्या विकेन्द्रीकरणासाठी लोकसेवक हा पर्याय गरजेचा
‘‘सत्तेपासून अलिप्त असणारा पण सत्तेवर अंकुश ठेवू शकणारा यतीवर्ग ही भारतीयांची राजकारणातली, समाजरचनेतली एक प्राचीन काळापासून चालत आलेली आवडती कल्पना आहे.. राजसत्तेचे हत्यार वेळप्रसंगी, कालमान पाहून वापरायचे, पण या हत्याराचे आपणच बळी व्हायचे नाही, हा साम्यवादी तत्त्वज्ञानाच्याही पलिकडे जाणारा एक विचार याच्या मुळाशी आहे व महाभारतकाळापासून भारतीय राजनीतिज्ञ तो मांडत आलेले आहेत. ‘राजा कालस्य कारणम्’ हा सिद्धांत मांडणाऱ्या व्यासांना राजसत्तेचे महत्त्व व स्थान कळले नव्हते असे समजणे जरा धाडसाचेच ठरेल. पण राजसत्ता म्हणजे सर्वकाही नाही. व्यापक समाज जीवनाचा तो एक भाग आहे, या भागावरही योग्य ते नियंत्रण हवे, हे नियंत्रण अखेरीस लोकांच्या हाती पण लोकहिताचा प्रवक्ता म्हणून दंडहीन लोकसेवक याकामी कमी धोक्याचा, असा यतीवर्ग कल्पनेमागील विचार आहे. या यतीवर्गाने अगदी आपत्प्रसंगीच हत्याराला (सत्तेला) स्पर्श केला पाहिजे. नाहीतर हे हत्यारच ते घडविणाऱ्या यतीवर उलटते, त्याचा बळी घेते.’’ श्री. ग. माजगावकर यतीकल्पनेतील सामथ्र्य व सावधानता सांगताना लिहितात-
‘‘केन्द्रीभूत होणे हा कुठल्याही सत्तेचा स्वभाव असतो. मग ती धार्मिक क्षेत्रातील असो वा राजकारणातील असो. अगदी कामगार-किसानांची सत्ताही याला अपवाद ठरू शकत नाही. सत्ता हळूहळू केन्द्रीभूत होते आणि या अतिरिक्त केन्द्रीकरणामुळे ती भ्रष्ट होत जाते, तिचे वर्तुळ लहानलहान होते, ती साचून, साकळून मुठभरांच्या हातचा खळ बनते. हा दोष एखाद्या व्यक्तीचा नसतो. सत्तेच्या या स्वाभाविक प्रवृत्तीमुळे भ्रष्ट व्यक्तीच स्पर्धेत हळूहळू पुढे येत राहतात, अध:पात वाढत जातो. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय अगदी क्रांतिकारक सत्ताधाऱ्यांनाही वेळोवेळी योजावे लागतात. स्टॅलिनला शुद्धीकरणाच्या मोहिमा काढाव्या लागल्या. माओला सांस्कृतिक क्रांतीचा धक्का द्यावा लागला. पण सत्ताधाऱ्यांनीच या मोहिमा, हे धक्कातंत्र वापरण्यातही धोका असतो.
सत्तेचे केन्द्रीकरण अधिकच वाढते. म्हणून हे कार्य विकेन्द्रित पद्धतीने व्हावे असा लोकसेवक पर्यायामागील विचार आहे.’’