डॉ. शांतिस्वरूप भटनागर – (२१ फेब्रुवारी १८९४ ते १ जानेवारी १९५५)
‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिकं’ ही सन १९५७ पासून प्रतिवर्षी देण्यात येतात. हेतू हा की, तरुण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ यांनी केलेल्या महत्त्वाच्या संशोधनाला योग्य मान्यता मिळवून देणं. ही पारितोषिकं कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे (उरकफ) डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ देण्यात येतात. हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीनं भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात त्यांनी बहुमोल कामगिरी केली. काही पायसांच्या (इमलशन) भौतिक-रासायनिक गुणधर्मासंबंधी संशोधन करून भटनागर यांनी १९२१ मध्ये लंडन विद्यापीठाची डी. एस्सी. पदवी मिळविली. त्यानंतर ते भारतात परतले व पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठात िहदू रसायनशास्त्राचं प्राध्यापकपद स्वीकारलं. १९२४ मध्ये ते लाहोर येथील पंजाब विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व तेथील रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक झाले. १९२६ पासून त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्रातील संशोधनास प्रारंभ करून या विषयाच्या अभ्यासात उपयुक्त असलेलं चुंबकीय व्यतिकरण संतुलनमापक (इँं३ल्लंॠं१-टं३ँ४१ टंॠल्ली३्रू कल्ल३ी१ऋी१ील्लूी इं’ंल्लूी) हे उपकरण के. एन. माथूर यांच्या सहकार्यानं त्यांनी तयार केलं व त्याचं एकस्व (पेटंट) मिळविलं. १९३६ मध्ये त्यांनी स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडविण्यात संशोधन करून बहुमोल मदत केली. या कार्याकरिता या कंपनीनं दिलेल्या मोबदल्यातून भटनागर यांनी पंजाब विद्यापीठात एक खास प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्यामध्ये केरोसिनचं शुद्धीकरण, गंधहीन मेणाचं उत्पादन, वंगणं व वंगणक्रिया, धातूंच्या क्षरणक्रियेला प्रतिबंध यांसारख्या विविध समस्यांवर संशोधन केलं.
१९४२ मध्ये वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचं रूपांतर ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (उरकफ) या मंडळात झालं आणि भटनागर यांची या मंडळाचे पहिले संचालक म्हणून नेमणूक झाली  ब्रिटिश सरकारनं १९३६ मध्ये, ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ व १९४१ मध्ये ‘नाइट’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. भारत सरकारनं त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला. १९४३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थाचं सदस्य होण्याचा त्यांना बहुमान मिळाला.

मनमोराचा पिसारा: टेकडय़ा, दऱ्या नि वळणदार नद्या..
शानशुई ही चिनी चित्रकला शैलीतील प्राचीन परंपरा. पिवळसर कॅनवासवर, ब्रश आणि शाईने चितारलेल्या चित्रांचे विषय पर्वत, टेकडय़ा, नद्या, ओढे, नाले, अवचित लहानमोठे धबधबे आणि आकाश यापलीकडे जात नाहीत. दाओइझम् शैली (ताओ)मध्ये अशा निसर्गाकडे अचंबित होऊन सहसा जगाकडे पाठ फिरवून पाहणारा चिमुकला माणूस दिसतो.
शानशुई शैली जवळजवळ दीड हजार वर्षांपूर्वीपासून विकसित झालीय; पण त्यात कालानुरूप फारसा फरक पडलेला नाही. चित्रकारांनी काय दिसतंय यापेक्षा पाहून काय जाणवलं, वाटलं आणि भावलं याचं चित्रण केलं. त्यामुळे इथल्या टेकडय़ा प्रतीकात्मक आहेत आणि रंग मनातून उमलणारे आहेत. या शैलीत मुळातल्या चित्रविचारांना दृश्य आकार दिलेला इतकंच. यातही पंचमहाभूतांचा आविष्कार आणि त्यांचा परस्परांशी असणारा संबंध महत्त्वाचा. चित्र पाहणं म्हणजे खरं पाहता चित्रात शिरणं असा अर्थ होतो.
यात तीन महत्त्वाचे मुद्दे
वाटा : म्हणजे चित्रात शिरून वाटचाल करण्याचे मार्ग त्या पायवाटा किंवा रस्ते सहसा नसतात. असतो वळणावळणाचा नदीचा प्रवाह, पर्वतांच्या वेडय़ावाकडय़ा सावल्या, पर्वतांवरून घरंगळणारी सूर्यकिरणं. सारं वळणावळणाचं असायला हवं. अगदी जीवनासारखं.
मग येतो त्या वाटेवरचा उंबरठा. ती वाट तिथे घेऊन जाते, आपलं स्वागत करते. मुख्यत: डोंगर – नव्हे टेकडी. ही टेकडी म्हणजे काहीतरी संपल्याची जाणीव किंवा सुरू झाल्याचा अनुभव. चिनी विचारपरंपरेत टेकडय़ा नि डोंगर म्हणजे दगड-माती किंवा खडकांच्या राशी नव्हेत, तर अमर्त्यांचा अंतिम निवास. हा उंबरठा पार करून आपण पोहोचतो चित्राच्या गाभ्यापाशी, हृदयस्थतेशी. सारे मार्ग, साऱ्या रेषा तिथेच पोहोचतात. ही हृदयस्थता म्हणजे नभोमंडपातले अवकाश नाही, तर तेजाळ प्रकाश. मित्रा, चिनी चित्रांची प्रदर्शनं आणि म्युझियम्स खूप पाहिले होते. त्या चित्रांतल्या प्रत्येक रंगरेषेबरोबर घसरगुंडी खेळली होती, त्या अवकाशस्य तेजानं स्तंभित झालो होतो.
दालीच्या अतिवास्तव शैलीत टेकडय़ांवरच्या शिळा चमत्कृतीपूर्ण आकार घेऊन स्तिमित करतात. त्या खडकांचे पृष्ठभाग तरल आणि गुळगुळीत होतात. कांग्रा या भारतीय लघुचित्रशैलीतल्या टेकडय़ा चित्रविषयाच्या पाश्र्वभूमीवर अथांग पसरतात. किंचित उंच आणि नागमोडी वळणाच्या.
परंतु, चिनी चित्रशैलीतील डोंगरदऱ्यांनी भुरळ घातली होती. ठेंगण्या ठुसक्या, हिरव्यागार वनराईनं बहरलेल्या टेकडय़ा, त्यांचे सुळके आणि लयदार बाह्य़रेषा बघण्याची उत्सुकता होती. चीनमधल्या ‘ली’ नदीच्या प्रवाहात त्या बोटीतून प्रवास करताना ‘शानशुई’च्या चित्रप्रदर्शनात स्वैर फिरतोय असं वाटतं. ‘जेड’ रंगाची हलक्या हिरवट रंगाची वळणावळणाची नदी, निरुंद प्रवाह. पाणी नितळ इतकं की नदीचा तळ दिसतो. मंद गतीनं नागमोडी वळणांना अखंड महिरप ‘त्या’ टेकडय़ांची. गंमत म्हणजे हिरव्यागार वृक्षराजीत अधूनमधून मातकट पिवळ्या रंगाचे सपाट नैसर्गिक कॅनवास दिसतात, त्यावरील चित्र म्हणजे अमूर्त आकार आणि त्यात सापडतात अनेक चित्राकृती.
चीनमधल्या प्रवासातला ‘ली’ नदीतला बोटीचा प्रवास केवळ अविस्मरणीय.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: रामायण ‘हिंदू’ म्हणून त्याज्य मानणे हाही मूलतत्त्ववादच
‘‘..महाकाव्ये म्हणजे नुसता धर्म व अंधश्रद्धा नसतात, तो एक सामाजिक इतिहाससुद्धा असते, हे ठाऊक नसते. लोकांना त्यांचा इतिहास वाऱ्यावर सोडून द्या असे सांगता येत नाही, परिवर्तनवाद्यांनी तरी अजिबात सांगू नये. रामायणाचे व महाभारताचे अर्थ जरूर लावावेत, पण त्यांना ‘हिंदू’ असे नामाभिधान देऊन त्याकडे दुर्लक्ष करणे ह्य़ापरते अनैतिहासिक दुसरे काय असणार? एक म्हणजे ‘हिंदू’ गोष्टी ह्य़ा ‘हिंदूू’ म्हणून त्याज्य मानणे हाही इतर मूलतत्त्ववादांइतकाच- आणि आंधळा मूलतत्त्ववाद (फंडामेंटालिझम्) आहे. एखादी गोष्ट ‘मुस्लिम’ आहे म्हणून त्याज्य आहे ह्य़ा मूलतत्त्ववादाइतकाच. सर्व इतिहासाप्रमाणे महाकाव्यातही ह्य़ा समाजाच्या मूल्यव्यवस्थेची अनित्यता (डायलेक्टिक) दृष्टीस पडते. त्यामुळेच त्यांचे विविध व बदलते अर्थ लावता येतात, यायला हवेत. ते करायचे सोडून रामायण (किंवा महाभारत) हिंदू आहे म्हणून अश्रुपात करणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे, निर्थक आहे.’’
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे ‘रहिमतपुरकरांची निबंधमाला -१ : नाटकी निबंध’ (डिसेंबर १९९५) या पुस्तकातील ‘सागर रामायणाची रहस्ये..’ या लेखात  एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात. ते असे – ‘‘ह्य़ा देशातील उदारमतवाद्यांनी, परिवर्तनवाद्यांनी महाकाव्यातील अनुस्यूत इतिहासाची अनित्यता (डायलेक्टिक ऑफ हिस्टरी) बघणे फार निकडीचे झाले आहे. जे लोक हे करू शकतात व त्यायोगे हिंदू जाणीवांचे खरेखुरे नूतनीकरण किंवा आधुनिकीकरण करू शकतात त्या मंडळींनी हिंदू समाजाकडेच पाठ फिरविली आहे. फुल्यांनी, आगरकरांनी किंवा कर्मवीर शिंद्यांनी हे केले नव्हते, हे विसरून उपयोगाचे नाही.. प्राचीन भारत वज्र्य मानलात की ज्या हिंदुत्वावर किंवा ब्राह्मणवादावर तुम्हाला हल्ला चढवायचा आहे तोच ब्राह्मणवाद डोक्यावर बसतो. हे इतके साधे रहस्य तुम्ही ध्यानात घेत नाही हे ‘हिंदुत्वा’चा शाब्दिक मुकाबला करणाऱ्यांना विचारायची वेळ आलेली आहे.’’

Story img Loader