डॉ. शांतिस्वरूप भटनागर – (२१ फेब्रुवारी १८९४ ते १ जानेवारी १९५५)
‘शांतिस्वरूप भटनागर पारितोषिकं’ ही सन १९५७ पासून प्रतिवर्षी देण्यात येतात. हेतू हा की, तरुण भारतीय संशोधन व तंत्रज्ञ यांनी केलेल्या महत्त्वाच्या संशोधनाला योग्य मान्यता मिळवून देणं. ही पारितोषिकं कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे (उरकफ) डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ देण्यात येतात. हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीनं भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात त्यांनी बहुमोल कामगिरी केली. काही पायसांच्या (इमलशन) भौतिक-रासायनिक गुणधर्मासंबंधी संशोधन करून भटनागर यांनी १९२१ मध्ये लंडन विद्यापीठाची डी. एस्सी. पदवी मिळविली. त्यानंतर ते भारतात परतले व पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठात िहदू रसायनशास्त्राचं प्राध्यापकपद स्वीकारलं. १९२४ मध्ये ते लाहोर येथील पंजाब विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व तेथील रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक झाले. १९२६ पासून त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्रातील संशोधनास प्रारंभ करून या विषयाच्या अभ्यासात उपयुक्त असलेलं चुंबकीय व्यतिकरण संतुलनमापक (इँं३ल्लंॠं१-टं३ँ४१ टंॠल्ली३्रू कल्ल३ी१ऋी१ील्लूी इं’ंल्लूी) हे उपकरण के. एन. माथूर यांच्या सहकार्यानं त्यांनी तयार केलं व त्याचं एकस्व (पेटंट) मिळविलं. १९३६ मध्ये त्यांनी स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडविण्यात संशोधन करून बहुमोल मदत केली. या कार्याकरिता या कंपनीनं दिलेल्या मोबदल्यातून भटनागर यांनी पंजाब विद्यापीठात एक खास प्रयोगशाळा स्थापन केली आणि त्यामध्ये केरोसिनचं शुद्धीकरण, गंधहीन मेणाचं उत्पादन, वंगणं व वंगणक्रिया, धातूंच्या क्षरणक्रियेला प्रतिबंध यांसारख्या विविध समस्यांवर संशोधन केलं.
१९४२ मध्ये वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचं रूपांतर ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (उरकफ) या मंडळात झालं आणि भटनागर यांची या मंडळाचे पहिले संचालक म्हणून नेमणूक झाली ब्रिटिश सरकारनं १९३६ मध्ये, ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ व १९४१ मध्ये ‘नाइट’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. भारत सरकारनं त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब दिला. १९४३ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थाचं सदस्य होण्याचा त्यांना बहुमान मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा