वस्त्रांचे रंग व त्यांच्या संस्करण पद्धती कशा विकसित होत गेल्या हे सविस्तरपणे समजावण्यात येईल. अत्यंत प्राचीन पद्धती- एका घमेल्यात आधी सोडा वा तत्सम रसायन टाकून कपडे साफ करणे व ते नंतर धुणे, वा नंतर पाणी व रंग टाकून ते रंगवण्यासाठी तापवायला ठेवणे.
यंत्रांच्या शोधाने या प्रक्रिया आता यंत्रात होतात, हे सत्य जरी तसेच राहिले असले तरी त्याला रंग रसायनशास्त्रात झालेला विकास पण तितकाच कारणीभूत आहे. यंत्रामध्ये सर्व प्रक्रिया अंककीय (इलेक्ट्रॉनिक/ डिजिटल) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने- म्हणजेच ‘ई डाइंग’ या स्वयंचलित पद्धतीने होतात. या तंत्रज्ञानाने व त्यातील संपूर्ण स्वयंचलित वस्त्रसफेदीच्या प्रक्रियांमध्ये पण पूर्णत्व आले. जसे वस्त्र रंगवता येते, तसे धागे वा तंतूंची रंगपद्धती प्रचलित आहे. या सर्व तंत्रज्ञानात अतुलनीय क्रांती झाल्याने रंगसफेदी, रंगामध्ये सखोलत्व, सातत्याने समानता व रंगाचा टिकाऊपणा या गुणांमध्ये वृद्धी झाली.
वरील चित्रातील यंत्राने याची थोडी कल्पना यावी. पूर्वी डायरेक्ट, व्हॅट इत्यादी रंग वापरले जात. आता व्हॅटच्या व रिअॅक्टिव्ह रंगांच्या संशोधनाने साधलेली प्रगती प्रशंसनीय आहे. पूर्वी रंगकाम हे विभागात्मक (बॅच) पद्धतीने व्हायचे. त्यामुळे रंगाच्या समानतेवर नियंत्रण ठेवणे कठीण असायचे.
वरील चित्रातील विकसित अखंड रंगकामाच्या संशोधनाने अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे रंगाची बचत, पाण्याची बचत झाली. या सर्वाचा आढावा यावरील लेखमालेत घेतला जाईल.
रंगातील अत्यंत प्रगत संशोधनाने वरील सर्व फायदे अनुभवास आले, तसे त्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम पण लक्षात आले. पर्यावरणाच्या बाबतीत पण संशोधनातील प्रगती वाखाणण्याजोगी आहे. या सर्वावर या लेखमालेमधून प्रकाश टाकण्यात येईल. आधुनिक रंगपद्धती व त्याचे ग्राहकाला काय फायदे-तोटे आहेत, हे सुद्धा सामान्य माणसाला समजून येईल. पर्यावरण संबंधित निर्माण झालेली चिंता व त्यामुळे पर्यावरण पोषक रंगपद्धती रसायनशास्त्राच्या विकसित (सस्टेनेबल केमिस्ट्री) संशोधन पद्धतीने होणारे वस्त्राचे रंगकाम या अत्यंत आधुनिक पद्धतीवरही प्रकाश टाकण्यात येईल. एका र्सवकष दृष्टिकोनातून या सदरातील लेखांची रचना करण्यात आलेली आहे.
श्वेतकेतू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा