पीटीए (प्युरिफाइड टेरेप्थॅलिक अॅसिड) पद्धत : पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या शुद्धतेचे आणि दर्जाचे टेरेप्थॅलिक अॅसिड बनविण्याचे प्रयत्न १९५३ पासूनच सुरू झाले होते, परंतु त्यांना यश आले नाही. डेल मायर या संशोधकाने १९६३ साली तंतू बनविण्यासाठी लागणाऱ्या दर्जाचे शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिड बनविण्याची प्रक्रिया विकसित केली. त्यानंतर लवकरच पॉलिस्टर तंतू बनविण्यासाठी डीएमटीऐवजी शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिडचा वापर लोकप्रिय होत गेला. १९६५ मध्ये डायनामाइट नोबल या कंपनीने शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिड बनविण्याची अशा प्रकारची प्रक्रिया विकसित केली की, ज्यामुळे डीएमटी पद्धतीतील यंत्रसामग्री थोडासा बदल करून पीटीए पद्धतीसाठी वापरता येईल. १९८० नंतर जगभर पॉलिस्टर तंतूंच्या निर्मितीसाठी पीटीए पद्धत सर्वमान्य झाली आणि डीएमटी पद्धतीचा वापर हळूहळू कमी होत गेला. कच्चा माल म्हणून डीएमटीऐवजी पीटीटीएला प्राधान्य मिळण्याची अनेक कारणे आहेत त्यापकी दर्जा, गुणवत्ता आणि तंतूचा उत्पादन खर्च ही मुख्य होती.
पॉलिस्टर तंतू तयार करताना पीटीएमुळे कच्च्या मालाच्या खर्चात १५%ची बचत होते. पीटीएची घनता डीएमटीपेक्षा जास्त असल्याने वाहतूक खर्चात बचत होते आणि साठविण्यासाठी कमी जागा लागते. पीटीएचे ईस्टरीकरण करण्यासाठी कोणत्याही साहाय्यकाची (उत्प्रेरक) गरज नसते. पण डीएमटीचे ईस्टरीकरण करण्यासाठी साहाय्यकाची गरज असते. पीटीए पद्धतीमध्ये ईस्टरीकरणाची पातळी समान राखणे सोपे असते. परंतु डीएमटी पद्धतीमध्ये ईस्टरीकरण प्रक्रिया कच्च्या मालाच्या दर्जातील बदल तसेच प्रक्रियेदरम्यान होणारे बदल यास खूप संवेदनशील असते.
पीटीएमध्ये पाणी हे उपउत्पादन म्हणून बनते. तर डीएमटी पद्धतीत मिथेनॉल हे उपउत्पादन म्हणून बनते आणि ते हाताळणे अतिशय जिकिरीचे असते. एकूणच पीटीए पद्धतीने बनविलेल्या तंतूंचा दर्जा अधिक चांगला आणि उत्पादन खर्च खूपच कमी असतो. या सर्वामुळे ही पद्धत अतिशय लोकप्रिय झाली आणि आज जगभर पॉलिस्टर तंतूंच्या निर्मितीसाठी हीच पद्धत अवलंबली जाते.
पीटीए पद्धतीमध्ये शुद्ध टेरेप्थॅलिक अॅसिडबरोबर इथिलिन ग्लायकॉलची रासायनिक प्रक्रिया करून इथिलिन टेरेप्थॅलेट हे ईस्टर प्रथम बनविले जाते आणि नंतर या ईस्टरचे बहुवारिकीकरण करून पॉली इथिलिन टेरेप्थॅलेट हे बहुवारिक बनविले जाते. या बहुवारिकापासून वितळ कताई पद्धतीने पॉलिस्टर तंतूंची निर्मिती केली जाते.
संस्थानांची बखर: शिक्षण, संगीत आणि क्रीडा केंद्र पतियाळा
पतियाळा राज्यकर्त्यांचा प्रभाव राजकीय क्षेत्रापेक्षा शिक्षण, संगीत, क्रीडा आणि इतर सांस्कृतिक क्षेत्रात अधिक दिसून येतो. सध्याही पतियाळा हे एक आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र म्हणून ओळखले जाते. पतियाळा शासकांनी संगीताला राजाश्रय दिल्यामुळे अभिजात गायकीचे पतियाळा घराणे तयार झाले. अठराव्या शतकाच्या मध्यावर मोगलशाहीच्या अस्तानंतर दिल्ली दरबारचे अनेक संगीतकार पतियाळा दरबारात दाखल झाले. पुढे उस्ताद अलीबक्ष या पतियाळा घराण्याच्या प्रसिद्ध गायकांनी व त्यांचे पुत्र उस्ताद अख्तर हुसेन खान यांनी िहदुस्थानी संगीताला वेगळेपण दिले. पतियाळा घराण्याच्या उस्ताद बडे गुलाम अलीखान यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली. पतियाळातील १८७० साली स्थापन झालेले मोिहदर कॉलेज हे या प्रदेशातील पदवी देणारे पहिले महाविद्यालय. महाराजा भूिपदरसिंग हे अमृतसरच्या खालसा कॉलेजचे कुलगुरू आणि आश्रयदाता होते. त्यांनीच बँक ऑफ पतियाळा स्थापन केली.
चेंबर ऑफ प्रिन्सेसचे दहा वेळा अध्यक्ष, पतियाळा फोस्रेसचे कमांडर इन चीफ, रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी आणि झुऑलॉजिकल सोसायटीचे फेलो, रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य अशी महत्त्वाची पदे भूिपदरसिंगांनी भूषविली. पहिल्या विश्वयुद्धातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना अनेक पदके मिळाली.
संस्थानात काही समाजकल्याणार्थ चांगल्या गोष्टी करूनही भूिपदरसिंग अनेक देशबांधवांच्या मनातून उतरले. त्याचे कारण म्हणजे अमृतसरमधील जालियनवाला बागेतील हत्याकांडास कारणीभूत असलेल्या जनरल डायर आणि ब्रिटिश राजवट यांना महाराजांनी दिलेला पाठिंबा हे होय. भूिपदरसिंगांचे पुत्र महाराजा यदवींद्रसिंग यांनी २० ऑगस्ट १९४८ रोजी पतियाळा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. अनेक संस्थानिक आपली राज्ये स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्यात चालढकल करीत होते, सहकार्य करीत नव्हते. यदवींद्रने अशा संस्थानिकांचे मन वळवून हे काम पूर्ण केले. सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यामुळे यदवींद्रसिंगचे कौतुक करून आभार मानले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com