मर्सरायिझग ही प्रक्रिया तलम अणि अतितलम अशा सुती वस्त्रांकरिता केली जाते. कॉस्टिक सोडय़ाचा (NaOH) उपयोग करून, त्या कापडाचे सौंदर्य वाढवून ते अधिक आकर्षक केले जाते. जॉन मर्सर यांनी १८४४ साली प्रथम अशी प्रक्रिया करून त्याचा उपयोग सर्वाच्या नजरेस आणून दिला. पुढील अनेक वष्रे इतर संशोधकांनी सुधारणा करून ही प्रक्रिया अधिक परिणामकारक करून ‘मर्सरायिझग’ प्रक्रियेला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. यामुळे सुती कापडाच्या प्रक्रियेत ‘मर्सरायिझग’चा समावेश अनिवार्य झाला. कॉस्टिक सोडय़ाच्या या प्रक्रियेमुळे सुतामधील तंतूचे स्वरूप बदलते. त्यांना एक प्रकारचा गुळगुळीतपणा येतो. नसíगक पीळ काही प्रमाणात खुला होतो. अंतर्गत भाग पारदर्शक बनतो. तसेच पृष्ठभाग तजेलदार होतो. तसेच तंतूच्या मूळ वजनात भर पडून कापडाची ताकद ३० ते ५० टक्क्यांनी वाढते. त्याचप्रमाणे कापडाची पाणी शोषून घेण्याची क्षमताही वाढते. याचा फायदा कापडाची रंगाई करताना होतो. त्यामुळे रंग कमी प्रमाणात लागतो.
सुतावर किंवा कापडावर मर्सरायिझगची प्रक्रिया दोन प्रकारे केली जाते. पहिल्या प्रक्रियेत कापडावर ताण देऊन प्रक्रिया केली जाते किंवा आधी प्रक्रिया करून मग ताण दिला जातो. दुसऱ्या पद्धतीत पहिल्यापेक्षा जास्त ताण द्यावा लागतो. तंतूचे सूत बनवताना जास्त पीळ दिला असेल तर अधिक ताण द्यावा लागतो. सर्वसाधारणपणे कपडय़ातील उभ्या धाग्यांपेक्षा आडव्या धाग्यात पीळ कमी असतो. आडव्या धाग्यावर ही प्रक्रिया प्रभावी दिसते. कापसाची प्रत जेवढी चांगली तितका मर्सरायिझगचा परिणाम अधिक चांगला होतो.
मर्सराइझ केलेल्या कापडावर साबणाचे पाणी पसरून त्यावर सौम्य अ‍ॅसिटिक किंवा फॉर्मिक आम्लाचा वापर करून ती आम्ले धुऊन न टाकता तशीच वाळवली तर त्या वस्त्राला रेशमासारखा कुरकुरीतपणा येतो. सुरुवातीच्या प्रक्रियेत कापड आटण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पादकाचा तोटा होत होता. लोवे नावाच्या शास्त्रज्ञाने कापडाला विशिष्ट ताण देऊन कॉस्टिक सोडय़ाची प्रक्रिया केली तर ते आटत नाही, हे सिद्ध केले. तेव्हापासून या प्रक्रियेची उपयुक्तता व लोकप्रियता वाढली.

मनमोराचा पिसारा: जनसामान्यांचे वर्तनशास्त्रीय अर्थविज्ञान
डॅना अ‍ॅरिएली हा मूळचा पदार्थविज्ञान आणि गणित यांचा विद्यार्थी. त्यामुळे सिद्धान्त आणि सूत्रे मांडून समोरील वस्तू अथवा आकडय़ांचा अर्थ लावणे ही त्याची क्रमिक शिक्षणातली कुशलता; परंतु त्याच्या जीवनाला अचानक वळण लागलं. त्याची गाडी तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राकडे वळली. मग अमेरिकेला रामराम ठोकून आपल्या प्रॉमिस्ड लॅण्ड- इस्राएलकडे स्थलांतरित झाला. जीवनाला पुन्हा जबरदस्त धक्का बसला, कारण कुठल्या तरी स्फोटक पदार्थाला आग लागून ७० टक्के भाजला. त्यापुढील अनेक र्वष तो कैक रुग्णालयात वास्तव्य करून राहिला. त्यातही अनेक संकटं म्हणजे रक्तदानातून यकृताला दूषितीकरण, स्नायू आणि चामडीला पडलेल्या आक्रस गाठी यातून स्वत:ला सांभाळत तो पुढे गेला आणि त्यानं पुन्हा आपल्या आजाराकडे अथवा व्यंगात्मक शरीराकडे मागे वळून पाहिलं नाही. डय़ूक विद्यापीठातून मानसशास्त्र आणि नंतर व्यवसाय व्यवस्थापनात दोन वेळा डॉक्टरेट मिळवून तिथेच प्राध्यापक झाला आणि त्याच्या अभ्यास विषयानं पलटी मारली. त्यानं हे सर्व सोडून एका नव्या अभ्यास विषयाला हात घातला आणि आता ‘बिहेविअर इकॉनॉमिक्स’ (वर्तनशास्त्रीय अर्थविज्ञान) यात प्रचंड नावारूपाला आलाय.
‘प्रेडिक्टेबली इरॅशनल’ आणि ‘हॉनेस्ट ट्रथ अबाऊट डिसहॉनेस्टी’ (म्हणजे अप्रामाणिकपणाबद्दलचं प्रामाणिक सत्य) या नावाची त्याची पुस्तकं बेस्टसेलर आहेत.
यू टय़ूबच्या व्हिडीओवर डॅन दिसतो तेव्हा त्याचा किंचित तिरका चेहरा आणि बोलण्यातला सुस्पष्ट अ‍ॅक्सेंट जाणवतो काही क्षणापुरता. कारण तो अत्यंत नर्मविनोदीपणानं आपला विषय मांडतो. त्याच्या लेखनातही किंचित मिस्कीलपणा जाणवतो. इतकंच काय तर संशोधनाच्या एका विषयात त्यानं विद्यार्थ्यांना मस्त कोपरखळी दिलीय. म्हणजे अंतिम चरणातल्या संशोधन निबंधाच्या सबमिशनच्या वेळी कशा काय (बुवा) सगळ्या विद्यार्थ्यांच्याच आज्या सोयीस्करपणे मरण पावतात! ‘बिहेविअर इकॉनॉमिक्स’ची ओळख यापूर्वी किंचित झाली होती, पण डॅननं विचारसंशोधन चिंतन-मनन याची नवी दालनं उघडून दिली.
अर्थशास्त्र बरंचसं सैद्धान्तिक स्वरूपात, गणितीसूत्रात मांडलं जातं. शासकीय अथवा मोठय़ा खासगी पातळीवरील वित्त, लोकांची क्रयशक्ती, तयार मालाचा पुरवठा, व्याजदर, बँकांतील ठेवी आणि गुंतवणूक यांच्या विविध सूत्रांवर आधारित आर्थिक धोरणं आणि अंदाजपत्रकं आखली जातात.
जागतिक पातळीवरील आर्थिक समस्यांची सोडवणूक करण्याकरिता यांचं व्यापक उपयोजन होतं. या प्रक्रियेला हळूहळू धक्का बसला. कारण जागतिक, राष्ट्रीय पातळीवरचे अंदाज चुकले. उदा. भारतातील आर्थिक संकट (१९९१), युरोप समूहातील मंदी आणि अमेरिकेतील सबप्राइम संकट यातून एक विचार प्रकर्षांने पुढे आला की, अर्थव्यवहाराचा गाडा अटकळ बांधू त्याप्रमाणे चालत नाही. अर्थव्यवहाराचं एक टोक वित्त असलं तर दुसरं टोक सामान्य माणसाच्या अर्थविषयक सवयी (सोनं खरेदी, बचत करणं, पैसा उधळणं इ.) आणि स्वभाव हे असतं. मानवी स्वभावात काही अंगभूत फसवाफसवी करण्याची ऊर्मी असते. सर्वसामान्य माणूस छोटय़ा छोटय़ा फसवणुकी करतो तर एन्रॉनसारख्या कंपन्या महाप्रचंड प्रमाणावर.
डॅननं नेमक्या याच समस्यांना हात घातलाय. म्हणजे सामान्य माणूस अर्थविषयक निर्णय घेताना आश्चर्यकारकरीत्या अनपेक्षितपणे वागतो. फसतो आणि फसवितो. डॅन या सर्वसामान्य ज्ञानाचा अभ्यास अत्यंत रंजक प्रयोगाच्या आधारे करतो. त्या प्रयोगांची प्रारूपं आणि पद्धती अचंबित करतात. त्यातले निष्कर्ष चकित करतात. म्हणजे फसवणूक करण्याची वृत्ती मोजा वगैरे. खोटय़ा ब्रॅण्डच्या वस्तू वापरताना (गुच्ची पादत्राणं, पर्स इ.) आपण अधिक फसवितो. ते का? आणि कसं? हे सगळं मुळातून वाचलं की आपण नकळत या विषयात गुंततो आणि डॅनचे फॅन होतो.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
500 kg of banned plastic bags seized
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक
Plastic Chair Cleaning Tips
काळ्या-पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या ‘या’ तीन छोट्या उपायांनी करा स्वच्छ
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

प्रबोधन पर्व: कनिष्ठ वर्गाचे नवे आव्हान मांडायला भाषा उणी पडते
‘‘माणूस शब्दांच्या आधाराने विचार करतो. नव्या विचाराला समाजाची भाषा व संस्कृती, उचित शब्द पुरवण्यास तोकडय़ा पडतात. संस्कृतीचा पसारा वरिष्ठ वर्गाच्या प्रज्ञेच्या, अनुभवाच्या व गरजांच्या अनुषंगाने उभा राहिलेला असतो आणि संस्कृतीमधल्या संकल्पना, तत्त्वज्ञान, परंपरा इत्यादी गोष्टी वरिष्ठ वर्गाच्या असतात आणि त्याच्या सत्तेला पोषक असतात. भाषेचा विकासही वरिष्ठ वर्गाचे विचार व्यक्त करण्याच्या दृष्टीनेच होत असतो. भाषेचे सामथ्र्य तेवढय़ापुरते मर्यादित असते. स्वाभाविक नवनिर्माणाला वरिष्ठ वर्गाचे तत्त्वज्ञान वा विचारसरणी या एकांगी म्हणून अपुऱ्या पडतात. आणि कनिष्ठ वर्गाचे नवे आव्हान देऊ पाहणारे विचार मांडायला भाषा उणी पडते.’’
गीता साने ‘भारतीय स्त्रीजीवन’ (मौज प्रकाशन गृह, ऑगस्ट १९८६) या पुस्तकात स्त्रीजीवनाच्या नवनिर्माण करण्यासाठी भाषा हे हत्यार कसे उपयोगी आहे हे सांगतानाच त्यापायी होणाऱ्या छळाबद्दल लिहितात – ‘‘विशिष्ट संस्कृतीत वाढलेली भाषा ही नवीन विचार मांडताना उणी पडते, आणि म्हणूनच फुले- आणि प्रसंगी आगरकरही- यांची भाषा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या मानाने ओबडधोबड वाटते; आणि ती तशी असतेही. कारण ती नवे व विद्रोही विचार व्यक्त करण्याची धडपड करीत असते.. भाषेच्या पांगळेपणामुळे विचारांतला गोंधळ जास्त वाढतो. विविध थरांचे हितसंबंध भिन्न असतात व आपले मनोगत इतरांना समजावण्याचे चर्चेचे साधन उपलब्ध होत नाही. त्यामुळे दलित थरांच्या मागण्यांचे विकृत अर्थ लावण्यात येतात. उपेक्षा, उपहास, विरोध यांना सतत तोंड देण्याचा प्रसंग दलितांवर येतो. स्त्रियांनी अशा विरोध-उपहासाला सतत तोंड दिलेले आहे. समाजाने चाकोरी सोडण्याबद्दल स्त्रियांचा वेळोवेळी पाणउतारा केला. सुसंस्कृत पुण्यात सावित्रीबाईंच्या अंगावर लोक थुंकले, तर पुढारलेल्या मुंबईत आनंदीबाईंना शिव्यांबरोबर दगडही मारण्यात आले. स्वातंत्र्य मागणाऱ्या स्त्रियांचा उपहास अजूनही होत असतो. विदेशातील स्त्रियांनाही असाच जाच सोसावा लागला व आजही लागत आहे.’’

Story img Loader