मर्सरायिझग ही प्रक्रिया तलम अणि अतितलम अशा सुती वस्त्रांकरिता केली जाते. कॉस्टिक सोडय़ाचा (NaOH) उपयोग करून, त्या कापडाचे सौंदर्य वाढवून ते अधिक आकर्षक केले जाते. जॉन मर्सर यांनी १८४४ साली प्रथम अशी प्रक्रिया करून त्याचा उपयोग सर्वाच्या नजरेस आणून दिला. पुढील अनेक वष्रे इतर संशोधकांनी सुधारणा करून ही प्रक्रिया अधिक परिणामकारक करून ‘मर्सरायिझग’ प्रक्रियेला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. यामुळे सुती कापडाच्या प्रक्रियेत ‘मर्सरायिझग’चा समावेश अनिवार्य झाला. कॉस्टिक सोडय़ाच्या या प्रक्रियेमुळे सुतामधील तंतूचे स्वरूप बदलते. त्यांना एक प्रकारचा गुळगुळीतपणा येतो. नसíगक पीळ काही प्रमाणात खुला होतो. अंतर्गत भाग पारदर्शक बनतो. तसेच पृष्ठभाग तजेलदार होतो. तसेच तंतूच्या मूळ वजनात भर पडून कापडाची ताकद ३० ते ५० टक्क्यांनी वाढते. त्याचप्रमाणे कापडाची पाणी शोषून घेण्याची क्षमताही वाढते. याचा फायदा कापडाची रंगाई करताना होतो. त्यामुळे रंग कमी प्रमाणात लागतो.
सुतावर किंवा कापडावर मर्सरायिझगची प्रक्रिया दोन प्रकारे केली जाते. पहिल्या प्रक्रियेत कापडावर ताण देऊन प्रक्रिया केली जाते किंवा आधी प्रक्रिया करून मग ताण दिला जातो. दुसऱ्या पद्धतीत पहिल्यापेक्षा जास्त ताण द्यावा लागतो. तंतूचे सूत बनवताना जास्त पीळ दिला असेल तर अधिक ताण द्यावा लागतो. सर्वसाधारणपणे कपडय़ातील उभ्या धाग्यांपेक्षा आडव्या धाग्यात पीळ कमी असतो. आडव्या धाग्यावर ही प्रक्रिया प्रभावी दिसते. कापसाची प्रत जेवढी चांगली तितका मर्सरायिझगचा परिणाम अधिक चांगला होतो.
मर्सराइझ केलेल्या कापडावर साबणाचे पाणी पसरून त्यावर सौम्य अॅसिटिक किंवा फॉर्मिक आम्लाचा वापर करून ती आम्ले धुऊन न टाकता तशीच वाळवली तर त्या वस्त्राला रेशमासारखा कुरकुरीतपणा येतो. सुरुवातीच्या प्रक्रियेत कापड आटण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पादकाचा तोटा होत होता. लोवे नावाच्या शास्त्रज्ञाने कापडाला विशिष्ट ताण देऊन कॉस्टिक सोडय़ाची प्रक्रिया केली तर ते आटत नाही, हे सिद्ध केले. तेव्हापासून या प्रक्रियेची उपयुक्तता व लोकप्रियता वाढली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा