बरेचसे शोध एखादी गोष्ट तयार होत असताना केलेल्या बदलामुळे किंवा कित्येकदा तर त्यात होणाऱ्या बिघाडामुळे लागत असतात. तसं शॅम्पेन या वाइन प्रकाराचं झालं. फ्रान्सच्या एपन्रे शहरातील शॅम्पेन परगण्यात एका क्लितो आडनावाच्या बाईने वाइन बनवून विकायला नेली. बाटल्यातल्या वाइनमध्ये काही साखर उरली असावी. बाटलीत भरल्यावर वाइनमध्ये असलेल्या वाइनचं परत किण्वन (मेर्टेशन) सुरू झालं. या किण्वन प्रक्रियेमुळे तयार झालेला कार्बन डाय ऑक्साइड वायूच्या जोरानं बाटल्या फुटल्या. तेव्हा क्लितोनं भरलेली एक बाटली पिऊन बघण्यासाठी ग्लासमध्ये ओतली. त्या वेळी तळापासून हलके हलके हवेचे बुडबुडे वर येताना दिसले. सेडिमेटमुळे काहीशी गढूळ झालेली वाइन त्यातल्या कार्बन डाय ऑक्साइडमुळे तोंडात मिरमिरणारी चव देत होती आणि एकूणच छान लागत होती. या फसफसणाऱ्या नवीन वाइनला तिने तिच्याच परगण्याचं नाव दिलं शॅम्पेन .
पहिल्यांदा झालेल्या श्ॉम्पेनमध्ये बाटलीत किण्वन प्रक्रिया झाल्याने सेडिमेंट बाटलीतच राही आणि शॅम्पेन ओतायला लागल्यावर त्यातल्या कार्बन डाय ऑक्साइडच्या हालचालीमुळे खालच्या भागातली शॅम्पेन त्या गाळ्याशी मिसळून गढूळ होऊन जाई. आत साचलेला कार्बन डाय ऑक्साइड निसटून जाऊ द्यायचा नाही, पण गाळ काढायचा. ही क्रिया एकाच क्षणात व्हायला हवी असते. याला डिसगॉर्जिग म्हणतात. शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार या बाटल्या उलटय़ा करून काही काळ ब्राइनमध्ये ठेवल्या जात. त्यामुळे त्यांच्या तोंडाशी असलेली वाइन आणि जमा झालेलं सेडिमेंट थंडपणानं गोठून जातं. उलटय़ा झालेल्या वाइनच्या बाटलीतला वायू कार्बन डाय ऑक्साइड वर जातो. त्या बाटलीचा तोंडाकडचा भाग गोठलेला असतो, त्यामुळे डिसगॉर्जिग करणाऱ्याला भरपूर वेळ मिळतो. त्यानंतर ते बूच आतल्या गॅसच्या दाबामुळे उडून जाऊ नये म्हणून ते तारेनं घट्ट फिरवून बसवलं जातं. हे सर्व होईतो, सर्वच बाटल्यांमधल्या शॅम्पेनची पातळी सारखी राहात नाही. ते लक्षात येऊ नये आणि बुचाला गुंडाळलेली तारेची गाठ दिसू नये म्हणून त्यावर बसवली जाणारी अॅल्युमिनिअमची टोपी वाजवीपेक्षा खालवर घेतली जाते. विव्ह क्लितो या नावानं शॅम्पेन बाजारात आली. त्यानंतर डॉम पेरिनो, मोये शँडन हे निराळ्या कंपन्यांचे ब्रँड आले आणि रसिकांच्या पसंतीला पडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा