शिक्षणाने आपण सर्व काही मिळवू शकतो, याचं एक उदाहरण म्हणजे भास्करराव मुंढे. सुरुवातीला त्यांनी बँकेत कारकुनाची नोकरी केली. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते आयएएस अधिकारी झाले. ज्या विद्यापीठाच्या वसतिगृहात खोली मिळाली नाही, त्याच विद्यापीठाचे ते काही काळ प्रभारी कुलगुरू झाले. मग औरंगाबाद महसूल विभागाचे विभागीय आयुक्त झाले. महाराष्ट्रातील एक निरपेक्ष वृत्तीने कार्य करणारा तडफदार अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.
नाशिक जिल्ह्य़ातील गिरणा धरण प्रकल्प २००५ साली झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे ओसंडून वाहू लागला. त्याच वेळी धुळे जिल्ह्य़ातील तीन तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती अटळ होती. धुळे जिल्ह्य़ातील अवर्षण परिस्थितीबाबत आढावा घेताना अशी माहिती पुढे आली की, गिरणा धरणाचा पांझण डावा कालवा धुळे जिल्ह्य़ाच्या सीमेवरून जातो. पुराचे पाणी पांझण कालव्यात सोडून पुढे धुळे जिल्ह्य़ातील खोरदड गावाजवळ तोडून एका नाल्यात सोडले तर ते पुढे बोरी नदीत जाते व तिथून बोरी धरणात जाते. जिल्हाधिकारी या नात्याने मुंढे यांनी तत्परतेने या कल्पनेचा पाटबंधारे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. मंत्री, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, सरकारी यंत्रणा या सर्वाचे उत्तम सहकार्य लाभल्याने पांझण कालवा फोडून गिरणेचे पाणी बोरी नदी व बोरी धरणात येऊ लागले. या मिनी जोड नदी प्रयोगामुळे शेकडो गावे, काही हजार हेक्टर शेती आणि लाखो ग्रामस्थ यांना पाणी मिळाले. या प्रयोगाचे त्या वर्षी सगळीकडे कौतुक झाले.
शासनाकडून कोणताही निधी न घेता केवळ स्थानिक संस्थांच्या सहकार्याने आणि त्यांच्या स्थानिक संस्थांच्या आíथक सहयोगातून नगण्य खर्च करून मिनी नदी जोड प्रकल्प यशस्वीपणे राबवला गेला. त्याचे फार मोठे श्रेय धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी भास्करराव मुंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आहे. मुंढे यांचे नेतृत्व, समन्वयासाठी त्यांनी केलेल प्रयत्न याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा