सर्व व्यक्तींची निवड भागवायचा मार्ग आहे, रंगातील विविधता. त्याकरिता जबाबदार आहेत सेंद्रिय रसायने आणि असेंद्रिय रसायने. पूर्वी जेव्हा लोकसंख्या कमी होती, जनतेच्या गरजा कमी होत्या, यंत्रयुगाचा उदय व्हायचा होता, खनिज तेलाचा शोध लागायचा होता, त्या वेळी मुख्यत्वे नसíगक रंगच वापरले जात होते. त्याकरिता विविध वनस्पतींचा वापर केला जात होता. वनस्पतींची फुले, साली, पान यांचा वापर होत असे. तसेच खनिजांचा वापरही होत असे.
मुख्य रंग म्हणून लाल, पिवळा आणि निळा हे रंग ओळखले जातात. तर काळा, पांढरा हे दोन उपरंग म्हणून वापरले जातात. या रंगाचे वेगवेगळ्या प्रकारांनी मिश्रणे करून असंख्य रंगछटा मिळवता येतात. उदाहरण म्हणून रेशमाला पिवळा रंग द्यायचा असेल तर तो तयार करण्यासाठी चोर हळद, हरसिंगारच्या काडय़ा, करडीची फुले, झेंडूची फुले आणि पिवळी माती यांचा वापर केला जात असे. या मातीच्या रंगाचा वापर अजिंठय़ामधील चित्रांमध्येही मोठय़ा प्रमाणात केलेला आढळतो. कारण, या मातीच्या रंगावर सूर्यप्रकाश आणि ओलसरपणा याचा परिणाम होत नाही. भिंती रंगवण्यासाठी पिवळ्या रंगात चुना मिसळून हा रंग फिका करता येत असे किंवा त्यामध्ये काजळीचा काळा रंग वापरून तपकिरी रंगाची छटाही तयार करता येत असे. तांबडय़ा रंगासाठी मेंदी, गेरू, कात यांचा वापर होई, तर निळ्या रंगाकरिता, नीळ, निळ्या रंगाचे खडे यांचा वापर केला जाई. हे सर्व रंग चांगले टिकाऊ असत. तरीसुद्धा रेशीम रंगवल्यास ते चमकदार दिसावे म्हणून त्या त्या रंगानुसार हरभऱ्याची आंब, मीठ, तुरटी इत्यादी द्रावणाचा वापर केला जायचा. तसेच रंगवलेले रेशीम कटाक्षाने सावलीत वाळवले जायचे. या नसíगक पदार्थाचा वापर करताना प्रत्येक रंगाकरिता एक पद्धत ठरलेली होती. त्याचा काटेकोरपणे अवलंब केला जायचा. त्यामध्ये अधिक वेळ जायचा, पण त्याचा परिणाम चांगला असायचा. रंगाची खात्री असायची. असेंद्रिय रसायनांचा वापरामुळे काही बदल निश्चित आले, पण त्यामध्ये भेसळीचा राक्षस शिरला आणि त्यांनी सर्वच रंगाचा बेरंग करून टाकला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा