वातावरणातील ७८% एवढी मुबलक जागा व्यापणारा नायट्रोजन हा एक उदासीन वायू आहे. सजीवांना या असेन्द्रिय वायूचा प्रत्यक्ष वापर फारसा होत नाही. नायट्रोजनचा रेणू (N2) हा तीन इलेक्ट्रॉनिक बंधांनी घट्ट जखडलेला असतो. त्यामुळे त्याचे बंध तोडण्यासाठी बऱ्यापकी ऊर्जा खर्च करावी लागते. वनस्पती व प्राण्यांमध्ये हा नायट्रोजन त्याच्या संयुगरूपाने ‘स्थिर’ केला जातो व तो हवेतील वायूप्रमाणे निष्क्रिय ठरत नसून क्रियाशील बनतो. या क्रियाशील नायट्रोजनची (Nr) कमतरता असेल तर, वनस्पतीची वाढ खुंटते आणि पिकांपासून पुरेसे उत्पादन मिळत नाही. तेव्हा, नायट्रोजन वातावरणात निष्क्रिय असला तरी तो जीवसृष्टीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे, हे निश्चित!
आपल्या शरीराचा ३ % भाग नायट्रोजनचा बनलेला असतो. ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन यानंतर ते शरीरातले चौथ्या क्रमांकाचे मूलद्रव्य होय. शरीरपेशीतील केंद्रकात असलेली केंद्रीय आम्ले व प्रथिने तयार करणारी अमिनो आम्ले नायट्रोजनची बनलेली असतात. अन्नधान्याचे उत्पादन तर नायट्रोजनवरच अवलंबून असते.
वीज चमकणे, वणवे पेटणे यांसारख्या नसíगक घटनांमुळे उच्च तापमान निर्माण होते व त्यामुळे वातावरणातील नायट्रोजनचे बंध तुटतात. त्याचे क्रियाशील स्वरूपात रूपांतर होते. वनस्पतीच्या मुळांच्या गाठीत वास्तव्य करणारे काही सूक्ष्म जीवाणूदेखील वातावरणातील निष्क्रिय नायट्रोजन वायूचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. समुद्रात वाढणारी हिरवे निळे शैवाल (खरे तर जीवाणू – सायनोबॅक्टेरिया) हेही नायट्रोजन स्थिरीकरण करण्यात अग्रेसर असतात.
अमोनिया (NH3) हा वायू नायट्रोजनचे अत्याधिक क्रियाशील संयुग असून, औद्योगिक क्षेत्रात व खते तयार करण्यासाठी त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. अमोनिया सोबतच नायट्रिक आम्ल, नायट्रेट्स (स्फोटक व गतिदायक पदार्थ), सायनाइड्स यातदेखील नायट्रोजन असतो. केवलरसारख्या मजबूत धाग्यात आणि सायनोअक्रिलेटसारख्या सुपर गोंदातही नायट्रोजन असतो.
हरितगृह वायूमध्ये कार्बनडायोक्साईड (CO2) असला तरी नायट्रस ऑक्साईड (N2O) वायूचा वाटादेखील नाकारता येणार नाही. पृथ्वीला तापविण्याची त्याची क्षमता कार्बन-वायूच्या २९८ पटीने जास्त आहे. या नायट्रस ऑक्साइडचे आयुर्मान साधारण १२० वर्षांचे असते व हा वायू अन्य हरितगृह वायूंपेक्षा जास्त टिकाऊ आहे. दरवर्षी ०.३ टक्क्यांनी वाढणारा हा वायू अत्यंत धोक्याचा आहे,
सेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा