नायलॉन ६:६ हा तंतू नायलॉन तंतूंच्या मालिकेमधील सर्वप्रथम तंतू होय. डय़ू. पॉन्ट कंपनीतील वॅलेस कॅरोथर्स आणि त्याच्या सहकारी संशोधकांच्या समूहाने हा १९३६ साली तंतू सर्वप्रथम विकसित केला. नायलॉनचे अनेक प्रकार त्यानंतर विकसित झाले. परंतु नायलॉन ६ आणि नायलॉन ६:६ हे दोन प्रकार वस्त्रोद्योगामध्ये तसेच प्लॅस्टिक उद्योगात सर्वात अधिक प्रचलित झाले.
नायलॉन ६:६ या तंतूच्या उत्पादनांसाठी हेक्सॅमिथीलीन डायअमाइन व अ‍ॅडिपिक आम्ल ही दोन मूलभूत रसायने कच्चा माल म्हणून वापरली जातात. प्रथम या दोन रसायनांच्या रासायनिक प्रक्रियेने अमाइड क्षार बनविला जातो. यास नायलॉन क्षार असे म्हणतात. या क्षाराचे पॉलीकंडन्सेशन या प्रक्रियेने बहुवरिकीकरण केले जाते. या पद्धतीने नायलॉन ६:६ चे वितळलेल्या द्रवात उत्पादन होते.
नंतर हा द्राव तनित्रामधून दाबाने वितळलेल्या रूपातील द्रवधारांच्या रूपात बाहेर काढून त्या धारांना थंड केले असता घन स्वरूपातील नायलॉनचे तंतू तयार होतात. शुद्ध स्वरूपातील नायलॉन तंतू हे खूपच चमकदार असतात. बऱ्याच वेळा इतके चमकदार तंतू रोज वापरावयाच्या कपडय़ांसाठी पसंत केले जात नाहीत म्हणून नायलॉनच्या द्रावामध्ये चमक कमी करणारे पदार्थ मिसळून मध्यम चमक किंवा कमी चमक असणारे तंतू बनविले जातात.
नायलॉन ६:६ तंतूचे गुणधर्म हे बहुतेक नसíगक धाग्यांच्या बरोबरीने किंबहुना वरच्या दर्जाचे असतात. त्यामुळे लवकरच हा तंतू अतिशय लोकप्रिय झाला. नायलॉनचे तंतू, उत्पादन होते त्या वेळी अखंड स्वरूपात (फिलामेंट) असतात. परंतु नसíगक धाग्यांबरोबर मिश्रण करण्यासाठी उत्पादनाच्या वेळीच हे अखंड तंतू कापून आखूड तंतू (स्टेपल फायबर्स) बनविण्याची प्रक्रियाही उपलब्ध आहे.  
नायलॉन ६:६ तंतू सामान्य ताकदीचा तसेच उच्च ताकदीचा अशा दोन प्रकारात बनविता येतो. सामान्य ताकदीच्या तंतूची ताकद ही कापसाच्या तंतूच्या ताकदीपेक्षा सुमारे ५०% पेक्षा अधिक असते आणि हाच तंतू ओला केला असता त्याची ताकद फक्त १० ते १५ टक्क्यांनी कमी होते. तर उच्च ताकदीच्या तंतूची ताकद कापसापेक्षा २०० ते ३००% इतकी अधिक असते.
संस्थानांची बखर: भूपिंदरसिंगांची हिटलर भेट
इतर अनेक संस्थानिकांप्रमाणे पतियाळाच्या महाराजा भूपिंदरसिंग यांनाही महागडी, दुर्मीळ वाहने संग्रह करण्याचा शौक होताच. १९३५ साली ते जर्मनीत गेले होते. महाराजांना हिटलरला भेटण्याची इच्छा झाली. हिटलर कधी भारतीय किंवा इतर ठिकाणच्या राजेलोकांना भेटत नसे. परंतु मोठय़ा मिनतवारीनंतर त्याच्या सेक्रेटरीमार्फत फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या भेटीची वेळ हिटलरने दिली. दरबारी पोशाख चढवून महाराजा हिटलरसाहेबांच्या भेटीस ठरलेल्या वेळी पोहोचले. भूपिंदरसिंग त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्या व्यक्तीवर सहज पाडीत. त्यांचे हिटरलशी संभाषण सुरू झाल्यावर दोघेही इतके रंगून गेले की १५ मिनिटांची वेळ संपल्यावर हिटलरने आणखी अर्ध्या तासाने वेळ वाढवून अर्ध्या तासाची एक तास, एक तासाची दोन तास केली. त्यानंतर फ्युररने त्यांना दुपारच्या जेवणास थांबवून घेतले. यावर मात म्हणून त्या दिवशी महाराज परत जाण्यासाठी निघाले असता आणखी दोन दिवस असेच येण्याचा आग्रह हिटलरने केला.  
तिसऱ्या दिवशीच्या भेटीनंतर हिटलरने महाराजांना आपल्या शस्त्रागारातील लुगर, लिग्नोज, राल्थेर ही पिस्तुले आणि जर्मनीत बनलेली मेबाख ही प्रशस्त कार भेट म्हणून दिली! मेबाखच्या अशा फक्त सहा गाडय़ा बनल्या. त्यापकी तीन गाडय़ा हिटलरने इजिप्तचे राजे फारुख, नेपाळनरेश आणि पतियाळा महाराजा भूपिंदरसिंग यांना भेट दिल्या. विशेष समारंभात, उत्सवात वापरण्यायोग्य या गाडीला इंजिन होते झेपलीन १२ हे. क्रीम रंगाची ही गाडी पतियाळात पोहोचल्यावर मोती महलच्या गॅरेजमध्ये ठेवली गेली. या गाडीच्या आधी तिथे रोल्सरॉइस कंपनीच्या २२ गाडय़ा उभ्या होत्या. या गाडय़ांच्या देखभालीसाठी हार्वे हा ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञ नियुक्त केला होता. भूपिंदररसिंगच्या मृत्यूनंतर या गाडीचा ताबा त्यांचा मुलगा व पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे वडील यादिवद्रसिंगांकडे आला. त्यांनी १९५७ साली ही गाडी आपल्या एका मित्राला भेट दिली. सध्या ही गाडी अमेरिकेतील वाहन संग्रहात असून तिची आजची किंमत पन्नास लाख डॉलर एवढी प्रचंड आहे!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा