नायलॉन तंतू तयार करण्यासाठी लागणाऱ्या बहुवारिकाचा पायाभूत रेणू हा मूळ रसायनांपासून प्रयोगशाळेतच तयार केला जातो आणि नंतर या रेणूपासून बहुवारिक तयार केले जाते. या बहुवारिकाचे पुढे तंतूमध्ये रूपांतर केले जाते.
मूळ रसायने वापरून प्रयोगशाळेतच एखादा रेणू किंवा पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेस संश्लेषण (सिंथेसिस) असे संबोधले जाते आणि म्हणूनच नायलॉनसारख्या प्रयोगशाळेतच तयार करण्यात येणाऱ्या तंतूंना संश्लेषित तंतू (सिंथेटिक फायबर) असे नाव पडले.
नायलॉनच्या यशानंतर शास्त्रज्ञांना अधिकच हुरूप आला आणि त्यानंतरच्या काळात पॉलिस्टर, अॅक्रिलिक, पॉलिप्रॉपिलीन, पॉलियुरेथिन असे अनेक तंतू विकसित झाले आणि खूप लोकप्रिय झाले. संश्लेषित तंतूंचे गुणधर्म नसíगक तंतूंच्या बरोबरीचेच नव्हे तर त्यांच्यापेक्षा अनेक बाबतीत सरस असतात. त्यामुळे हे तंतू अतिशय लोकप्रिय झाले. या तंतूंच्या, उच्च ताकद, उच्च स्थितिस्थापकता, चांगली लंबन क्षमता यांसारख्या गुणधर्मामुळे हे तंतू वस्त्रप्रावरणांसाठी लोकप्रिय तर झालेच, पण उद्योग, वैद्यकीय, क्रीडा, कृषी, स्थापत्य यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये वस्त्रोद्योगांमध्ये तयार होणाऱ्या कापडाचा/ सुताचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला. संश्लेषित तंतूंमुळे वस्त्रोद्योगासाठी अनेक दालने खुली झाली. आज संश्लेषित तंतू इतके लोकप्रिय झाले आहेत की जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण तंतूंपकी मानवनिर्मित तंतूंचे प्रमाण ६० ते ६५% इतके आहे आणि नसíगक तंतूंचे प्रमाण ३५ ते ४०% इतके कमी झाले आहे. संश्लेषित तंतूंमुळे खऱ्या अर्थाने नसíगक तंतूंना पर्याय मिळाला आहे.
मानवनिर्मित तंतूंनी नसíगक तंतूंना पर्याय निर्माण केला हे सत्य असले तरी नसíगक तंतूंचा वापर पूर्णपणे थांबला नाही. नसíगक तंतूचे आणि मानवनिर्मित तंतूचे प्रमाणबद्ध मिश्रण करून दोन्ही प्रकारच्या तंतूच्या गुणधर्माचा फायदा घेण्याचे धोरण वस्त्रोद्योगात अवलंबले गेले. याचा सर्वात जास्त फायदा ग्राहकाला झाला. वापरायला अनुकूल, धुवायला सोपे, वाळायला अवधी कमी, इस्त्रीची गरज मर्यादित इत्यादी अंगांनी हा ग्राहकाचा फायदा वर्णन करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा