पेट्रोलियम खनिज तेलापासून मिळणाऱ्या पदार्थामध्ये हायड्रोकार्बन द्रावणांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. कमी तापमानाला ऊध्र्वपातित होणारी ही द्रावणे इतर पेट्रोलियम पदार्थाप्रमाणे एरॉमेटिक, पॅराफिनिक व नॅफ्थोनिक हायड्रोकार्बन रसायनांची मिश्रणे असतात, तर काही द्रावणे एकाच विशिष्ट प्रकारच्या हायड्रोकार्बन्सने युक्त असतात.
साधारणत: पाण्यासारखी रंगहीन दिसणारी ही द्रावणे पाण्यात अविद्राव्य असतात. परंतु ती अन्य औद्योगिक रसायनांना विरघळवितात. ज्या तापमानाच्या दरम्यान ही द्रावणे उकळतात, त्यानुसार त्यांचे चार मुख्य भागात वर्गीकरण केलेले असते.
विशेष उत्कलन िबदूच्या दरम्यान उकळणाऱ्या द्रावणांना ‘स्पेशल बॉईलिंग पॉइंट स्पिरिट्स’ (एस.पी.एस) म्हणतात व ते ३५ अंश सेल्सिअस ते १६० अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उकळतात. औद्योगिक क्षेत्रातील विशिष्ट वापरानुसार त्यांचे उत्कलनिबदू मर्यादित केले जातात. ६४ ते ६९ अंश सेल्सिअस तापमानाला उकळणारे हेक्झेन हे द्रावण वनस्पती बियांपासून तेल मिळविण्यासाठी वापरतात. बियांचे तुकडे करून या द्रावणात मिसळतात, तेव्हा त्यात तेलाचा अंश विरघळतो. नंतर, हे द्रावण ऊध्र्वपतनाने वेगळे करतात व तेल मिळवतात. ही तेले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तसेच साबण व रंग तयार करण्यासाठी वापरतात. हेक्झेनमध्ये एरोमेटिक्स हायड्रोकार्बन्सचा अंश अजिबात नसतो व त्यामुळे खाद्यतेलापासून शरीराला अपाय होण्याची शक्यता नसते. त्याच्या उत्कलनिबदूची मर्यादा कमी असल्यामुळे, ते सहज उडून जाते व तेल प्राप्तीसुलभ होते. याशिवाय रबरापासून चिकटपट्टय़ा तयार करणे, जलरोधक तंतू निर्माण करणे, गॅसभट्टीत एल.पी.जी.ऐवजी इंधन म्हणूनदेखील हेक्झेनचा वापर होतो.
६० ते १२० अंश सेल्सिअसच्या दरम्यान ऊध्र्वपतित होणारी स्पिरिट्स द्रावणे मुख्यत: रबर उद्योगात मोठय़ा प्रमाणात वापरतात. विशेषत: गाडीचे टायर्स तयार करताना या द्रावणाचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. तसेच रंग किंवा वॉíनश तयार करताना, त्यांचा पातळपणा वाढविण्यासाठी हे द्रावण सर्रासपणे वापरले जाते. याशिवाय, कपडे ड्रायक्लीिनग करताना वापारलेले हे द्रावण सहज उडून जाऊ शकते व कपडा त्वरित सुकण्यास मदत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा