आजकाल ‘पी.एच. (pH) बॅलन्स्ड सोप’च्या जाहिराती दूरदर्शनवर आपण पाहतो. पी.एच म्हणजेच मराठीत सामू. pH आम्ल-आम्लारी आणि उदासीन या गुणधर्माशी निगडित आहे. एक ते सहा स्र्ऌ मूल्य असणं म्हणजे आम्लधर्मी, आठ ते चौदा pH मूल्य असणं म्हणजे आम्लारिधर्मी, आणि सात pH मूल्य असेल तर उदासीन गुणधर्म असतो. साबण आम्लारिधर्मी आहे. काही साबणांमध्ये िलबू वापरले जाते ते त्या साबणाचा pH मूल्य कमी करण्यासाठी. िलबामध्ये सायट्रिक आम्ल असतं. अशीच काही आम्लं नसíगक किंवा रसायनांच्या स्वरूपात साबणात वापरली तर त्याचा स्र्ऌ मूल्य कमी होतो. pH मूल्य जर सात करण्यात आला तर साबण उदासीन होतो. आता या पी.एच. आणि आपल्या त्वचेचा काय संबंध असेल की ज्यामुळे या ‘पी.एच (pH) बॅलन्स्ड सोप’चं महत्त्व जाहिराती आपल्याला सांगत असतात.
मानवी त्वचा तीन थरांची मिळून बनलेली असते. त्वचेच्या आतील थरात वेगवेगळ्या ग्रंथी असतात ज्यातून घाम, काही स्निग्ध पदार्थ आणि काही प्रमाणात आम्ल यांचा स्राव होत असतो. त्वचेच्या बाहय़ थरावर आम्लाचा थर जमा होतो, ज्याला ‘अॅसिड मॅन्टल’ असं म्हणतात. या आम्लाचा पी.एच. साधारणत: ४.५ ते ५.५ इतका असतो, जो व्यक्तीनुरूप वेगळा असतो. अॅसिड मॅन्टल धूळ, सूक्ष्म जिवाणू यांच्यापासून त्वचेच्या संरक्षणाचं काम करतं. साबण त्वचा स्वच्छ करतं, त्या वेळी ते धूळ, घाम, सूक्ष्म जीव काढून टाकतं, त्याच वेळी साबण आम्लारिधर्मी असल्याने त्वचेच्या अॅसिड मॅन्टलवर त्याचा परिणाम होतो. त्वचेचा सामू वाढतो. खरं तर थोडय़ाच वेळात त्वचेवर पुन्हा अॅसिड मॅन्टल तयार होते. वय, आरोग्य यानुसार प्रत्येक व्यक्तीचा अॅसिड मॅन्टल तयार होण्याचा वेगवेगळा असतो. साबणामुळे त्वचेचा पी.एच. बदलून ती अल्कलीधर्मी (अल्कली-पाण्यात विरघळणारे आम्लारी) होऊ शकते, त्यामुळे सूक्ष्म जीवांची वाढ होऊन त्वचारोग होऊ शकतात. काही आजारांमुळे त्वचेचा पी.एच. वाढतो. प्रत्येकाच्या त्वचेचा पी.एच.वेगळा असल्यानं प्रत्येकासाठी योग्य साबण वेगवेगळा असतो. स्र्ऌ मूल्य ७ (उदासीन) किंवा ७ च्या जवळपास असलेला साबण त्वचेसाठी चांगला असतो, जो सौम्य समजला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा