तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. ज्यांची कल्पनाही कधी केली नव्हती अशी कार्यक्षेत्रे कर्तृत्वाला मोकळी झाली. या क्षेत्रांनी विविध आव्हाने वस्त्रोद्योगापुढे उभी केली. ही आव्हाने वस्त्रोद्योग मोठय़ा प्रमाणावर पेलू शकला तो एकाच तंतूमुळे. तो तंतू आहे पॉलिएस्टर. आणि हे शक्य झाले ते या तंतूच्या बहुवारिकाच्या विशिष्ट रचनेमुळे. या रचनेमुळे बहुवारिकाचे मूळ स्वरूप तसेच ठेवूनही वेगळ्या गुणधर्माचे तंतू निर्माण करणे शक्य झाले. आणि याचा पुरेपूर फायदा घेऊन तंत्रज्ञांनी नवनवीन आव्हाने पेलण्याकरता वेगवेगळ्या गुणधर्माचे पॉलिएस्टर तंतू निर्माण केले.
नेहमीच्या वापरातील सूत आणि कापड निर्मितीसाठी वापरले जाणारे तंतू सोडून पुढील प्रकारचे तंतू सध्या निर्माण केले जात आहेत- पोकळ तंतू, त्रिदलीय काटछेद असलेले तंतू, अतितलम
तंतू, कापसासारखे दिसणारे तंतू, जाड-पातळ अखंड तंतू, मिलांज परिणाम साधणारे अखंड तंतू, इमारतींच्या बांधकामाला उपयोगी पडणारे तंतू इत्यादी.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पॉलिएस्टर तंतूचे उत्पादन सुरू झाले. १९६०च्या सुमारास एकूण तंतूंच्या वापरातील पॉलिएस्टरचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी होते. आज ते प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचलेले आहे. असा प्रगतीचा वेग साधणे अन्य कुठल्याही तंतूला जमलेले नाही.
या तंतूची पाणी शोषण करण्याची क्षमता खूपच कमी आहे. त्यामुळे या तंतूंचे कपडे लवकर वाळतात. पण याच गुणधर्मामुळे स्थितिक विद्युत निर्मिती सहज होते. म्हणूनच शरीरालगत वापरल्या जाणाऱ्या कपडय़ात हा तंतू वापरला जात नाही. नसíगक तंतूबरोबर पॉलिएस्टरचे मिश्रण करून वापर केला जातो. चांगल्या घर्षणक्षमतेबरोबरच चांगली रसायन आणि किटाणुरोधकता असल्यामुळे विशिष्ट उपयोगांकरता या तंतूचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. घरांच्या िभतीवर सिमेंट काँक्रीटचा गिलावा केला जातो. या गिलाव्याचे आयुष्यमान वाढवण्याकरता अतिशय कमी लांबीच्या पॉलिएस्टर तंतूंचा वापर करण्यात येतो.
इतक्या विविध क्षेत्रांतील उपयुक्ततेमुळे या तंतूचा वापर भविष्यात वाढतच जाईल हे नक्की.
बहुआयामी पॉलिएस्टर
तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. ज्यांची कल्पनाही कधी केली नव्हती अशी कार्यक्षेत्रे कर्तृत्वाला मोकळी झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2015 at 03:43 IST
TOPICSपॉलिस्टर
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity polyester