तांत्रिकदृष्टय़ा तंतूंची वर्गवारी दोन वर्गात होते. खंडीत तंतू – नावाप्रमाणे या तंतूंची लांबी मर्यादित असते. अखंडित तंतू – नावाप्रमाणे या तंतूंना अमर्यादित लांबी उपलब्ध असू शकते. नसíगक तंतूंच्या बाबतीत हा अपवादात्मक गुणधर्म मानला गेला आहे. नसíगक तंतूंना मर्यादित लांबीचे तंतू म्हणूनच ओळखले जाते. कारण उपलब्ध नसíगक तंतूंमधे रेशीम हा लांबीच्या बाबतीत अपवाद आहे.  रेशीम कोठून येते यावर पण एक वर्गवारी केली जाते, संवर्धित आणि जंगली.
संवधिर्त : तुतीच्या झाडाच्या पानांवर रेशमाच्या किडय़ांचे संगोपन व संवर्धन करतात. त्यापासून मिळणाऱ्या रेशमास संवर्धित रेशीम म्हणतात. अशा प्रकारच्या झाडांची लागवड ठिकठिकाणी करता येते.
जंगली : रेशमाचे उत्पादन जंगलामध्ये आढळणाऱ्या आसान, ओक, अर्जुन, साल, एरंड यासारख्या झाडांवर पण होते. जंगलात राहणारे व आजूबाजूचे लोक जंगलात नसíगकरीत्या वाढलेले किडे गोळा करण्याचे उद्योग करतात. जंगली रेशमांच्या जातीपकी काही जाती म्हणजे टसर, एरि, मुगा या होत.
संवर्धित तंतू तलम असतात. त्यामुळे भारी तलमपोत असलेल्या वस्त्रांकरता तलम तंतू वापरतात. यामध्ये साडय़ा, शाली, डोक्याला बांधायाचे मफलर (स्कार्फ) या वस्त्र प्रकारांचा समावेश होतो. यामुळे ही वस्त्रे महाग असतात. जंगली तंतू जाडेभरडे असतात. साहजिकच त्यांचा वापर पायजमा, कुर्ता, यासारख्या पेहेरावांच्या वस्त्रांकरता करतात. भारतामध्ये तसेच चीनमध्येसुद्धा धार्मिक कामाकरता (चीनमध्ये -फेंग्शुई) वापर करतात. रेशीम हा महागडा तंतू आहे. त्यामुळे रेशमी वस्त्रांचा व्यवहारात दैनंदिन उपयोगाकरता सहसा वापर केला जात नाही. भारतामधे लग्न कार्यात – शालू पठणी, शेला या वस्त्रांकरता रेशमाचाच वापर होतो. पेहेरावांच्या तयार कपडय़ांमध्ये रेशमाचा वाढता उपयोग अनुभवास येतो. भरतकामाच्या आधुनिक यंत्रांमध्ये रेशमाच्या साहाय्याने अनेक नावीन्यपूर्ण नक्षीकाम करून मूल्यवृद्धी करण्याकडे आंतरराष्ट्रीय वस्त्रव्यापार झुकत आहे. रेशीम विद्युत विरोधक असल्याने विद्युत उपकरणांच्या क्षेत्रातही रेशमाचा उपयोग केला जातो. रेशीम हा प्रथिन तंतू असल्याने जळल्यानंतर  त्याची चिकट गोळी होते. यामुळे तोफेच्या दारूच्या पिशव्या बनवण्यासाठी रेशमाचा उपयोग केला जातो. हवाई छत्री (पॅराशूट)  बनवण्यासाठी रेशमाचा उपयोग कित्येक वर्षे केला जातो. गिर्यारोहणासाठी वापरात येणारे दोरखंड रेशमापासून बनवले जात. आता ही गरज मानवनिर्मित तंतू जास्त चांगल्या प्रकारे भागवतात.

संस्थानांची बखर: स्वातंत्र्योत्तर काळातील ग्वाल्हेर राज्यकत्रे
ग्वाल्हेर राज्याचे संस्थापक राणोजी िशदे यांच्या तिसऱ्या राज्यकर्त्यां पिढीनंतर पुढच्या शासकांनी आपल्या िशदे घराण्याचे नाव बदलून सिंदिया असे केले. जिवाजीराव सिंदिया यांची राजकीय कारकीर्द इ.स. १९२५ ते  १९४७  अशी झाली. १५ जून १९४८ रोजी ग्वाल्हेर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यावर ते प्रथम तत्कालीन मध्यभारत या प्रांतात वर्ग करण्यात आले. सिंदिया घराण्यातल्या पुढच्या पिढयांमधील अनेक लोक सक्रिय राजकारणात महत्त्वाच्या पदांवर आहेत. जिवाजीराव यांचा विवाह १९४१ मध्ये नेपाळ नरेश राणांची कन्या राजकुमारी लेखा दिव्येश्वरी देवी यांच्याशी झाला. त्यांचे विवाहानंतरचे नाव विजयाराजे सिंदिया. जिवाजीरावांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. परंतु पुढे काँग्रेस पक्षाशी काही मतभेद झाल्याने विजयाराजे, भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सदस्य म्हणून अखेपर्यंत कार्यरत राहिल्या. विजयाराजेंचे पुत्र माधवराव सिंदिया हे अखेरीपर्यंत काँग्रेसचे सक्रिय कार्यकत्रे आणि भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. विजयाराजेंची कन्या वसुंधराराजे याही राजकारणात सक्रिय असून १९८९ सालापासून आजपर्यंत त्या सतत चार वेळा राजस्थान विधानसभेवर सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या त्या सक्रिय कार्यकर्त्यां असून सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. माधवराव सिंदियांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंदिया हे काँग्रेस पक्षाचे लोकसभा सदस्य म्हणून २००२ साली निवडले गेले. विजयाराजेंच्या कनिष्ठ कन्या आणि वसुंधराराजेंच्या भगिनी यशोधराराजे याही भाजपच्या कार्यकर्त्यां आणि लोकसभा सदस्य आहेत.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा