तांत्रिकदृष्टय़ा तंतूंची वर्गवारी दोन वर्गात होते. खंडीत तंतू – नावाप्रमाणे या तंतूंची लांबी मर्यादित असते. अखंडित तंतू – नावाप्रमाणे या तंतूंना अमर्यादित लांबी उपलब्ध असू शकते. नसíगक तंतूंच्या बाबतीत हा अपवादात्मक गुणधर्म मानला गेला आहे. नसíगक तंतूंना मर्यादित लांबीचे तंतू म्हणूनच ओळखले जाते. कारण उपलब्ध नसíगक तंतूंमधे रेशीम हा लांबीच्या बाबतीत अपवाद आहे. रेशीम कोठून येते यावर पण एक वर्गवारी केली जाते, संवर्धित आणि जंगली.
संवधिर्त : तुतीच्या झाडाच्या पानांवर रेशमाच्या किडय़ांचे संगोपन व संवर्धन करतात. त्यापासून मिळणाऱ्या रेशमास संवर्धित रेशीम म्हणतात. अशा प्रकारच्या झाडांची लागवड ठिकठिकाणी करता येते.
जंगली : रेशमाचे उत्पादन जंगलामध्ये आढळणाऱ्या आसान, ओक, अर्जुन, साल, एरंड यासारख्या झाडांवर पण होते. जंगलात राहणारे व आजूबाजूचे लोक जंगलात नसíगकरीत्या वाढलेले किडे गोळा करण्याचे उद्योग करतात. जंगली रेशमांच्या जातीपकी काही जाती म्हणजे टसर, एरि, मुगा या होत.
संवर्धित तंतू तलम असतात. त्यामुळे भारी तलमपोत असलेल्या वस्त्रांकरता तलम तंतू वापरतात. यामध्ये साडय़ा, शाली, डोक्याला बांधायाचे मफलर (स्कार्फ) या वस्त्र प्रकारांचा समावेश होतो. यामुळे ही वस्त्रे महाग असतात. जंगली तंतू जाडेभरडे असतात. साहजिकच त्यांचा वापर पायजमा, कुर्ता, यासारख्या पेहेरावांच्या वस्त्रांकरता करतात. भारतामध्ये तसेच चीनमध्येसुद्धा धार्मिक कामाकरता (चीनमध्ये -फेंग्शुई) वापर करतात. रेशीम हा महागडा तंतू आहे. त्यामुळे रेशमी वस्त्रांचा व्यवहारात दैनंदिन उपयोगाकरता सहसा वापर केला जात नाही. भारतामधे लग्न कार्यात – शालू पठणी, शेला या वस्त्रांकरता रेशमाचाच वापर होतो. पेहेरावांच्या तयार कपडय़ांमध्ये रेशमाचा वाढता उपयोग अनुभवास येतो. भरतकामाच्या आधुनिक यंत्रांमध्ये रेशमाच्या साहाय्याने अनेक नावीन्यपूर्ण नक्षीकाम करून मूल्यवृद्धी करण्याकडे आंतरराष्ट्रीय वस्त्रव्यापार झुकत आहे. रेशीम विद्युत विरोधक असल्याने विद्युत उपकरणांच्या क्षेत्रातही रेशमाचा उपयोग केला जातो. रेशीम हा प्रथिन तंतू असल्याने जळल्यानंतर त्याची चिकट गोळी होते. यामुळे तोफेच्या दारूच्या पिशव्या बनवण्यासाठी रेशमाचा उपयोग केला जातो. हवाई छत्री (पॅराशूट) बनवण्यासाठी रेशमाचा उपयोग कित्येक वर्षे केला जातो. गिर्यारोहणासाठी वापरात येणारे दोरखंड रेशमापासून बनवले जात. आता ही गरज मानवनिर्मित तंतू जास्त चांगल्या प्रकारे भागवतात.
रेशमाचा उगम आणि उपयोग
तांत्रिकदृष्टय़ा तंतूंची वर्गवारी दोन वर्गात होते. खंडीत तंतू - नावाप्रमाणे या तंतूंची लांबी मर्यादित असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-02-2015 at 01:49 IST
TOPICSपॉलिस्टर
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity polyester usage