कुक्कुटपालन व्यवसाय कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे. अत्याधुनिक शास्त्रीय ज्ञान, प्रशिक्षित तंत्रज्ञ, अत्यंत प्रगत पायाभूत सुविधा इत्यादी बाबतीत भारताचा कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये जगात वरचा क्रमांक लागतो. अंडी उत्पादनामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि मांस उत्पादनात पाचव्या क्रमांकावर आहे. पूर्वी हा व्यवसाय केवळ खेडय़ातील शेतीला पूरक उत्पादनाचा जोडधंदा म्हणून होता. परंतु आता तो प्रशिक्षित लोकांचा भांडवल गुंतवून पूर्ण वेळ मोठा उद्योग म्हणून विकसित झालेला आहे.
व्यावसायिक कुक्कुटपालनातून ७० टक्के अंडी उत्पादन मिळते आणि ते शहरी भागातील (२५ टक्के) लोकांची गरज भागवतात. विशेषत: प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी अंडी आणि मांस यांची ग्रामीण भागातही गरज आहे. कोंबडीचे मांस आणि अंडी पौष्टिक असून शरीरास उपयुक्त आहे. अंडय़ामध्ये अल्ब्युमीन नावाचे प्रथिन असते. त्याचे शरीरात सहज शोषण होते. शरीराची वाढ चांगली होते. त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते. परसबागेतील सुधारित जातीच्या कोंबडय़ांचा उपयोग करून ग्रामीण भागातील प्रथिनकमतरतेचा प्रश्न सोडवता येईल.
या व्यवसायात अर्ध स्वयंचलित यंत्रणा बसवून एक माणूस हजारो कोंबडय़ा सांभाळू शकतो. स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही रोजगार मिळवून देऊ शकतो. कुक्कुटपालन व्यवसाय ग्रामीण भागात सुरू केल्यास रोजगाराच्या स्थलांतराचा प्रश्न मिटवण्यास मदत होईल. या व्यवसायातील प्रगती पाहून बऱ्याच बँकांनी आíथक साहाय्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विद्यापीठ, शासन यांच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.
भारतीय पोषण संस्थेच्या अहवालानुसार अंडी व मांस उत्पादन प्रगत देशांच्या तुलनेत भारतात फार कमी आहे. जागतिक पातळीवर भविष्यात अंडी व मांस पदार्थ यांना फार मोठय़ा प्रमाणावर मागणी असणार आहे. पूर्वी ग्राहकांची मागणी मुख्यत: किमतीवर आधारित होती. परंतु आता ग्राहक किमतीपेक्षा पदार्थाच्या गुणवत्तेला महत्त्व देत आहे. जागतिकीकरणामुळे अंडी व मांस निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा जसे, स्वच्छ स्वयंचलित कत्तलखाने, शीतगृह, आदींची गरज आहे.
वॉर अँड पीस: पिग्मेंटेशन : वाढता त्वचाविकार
एक काळ खेडोपाडीचीच नव्हे तर लहान-मोठय़ा शहरातील तुमची-आमची राहणी खूप साधी होती. खाण्या-पिण्यात खूप आंबवलेले, शिळे अन्न, बेकरी पदार्थ, मेवा मिठाई अभावाने असे. तुलनेने व्यसने कमी होती. पोशाख अघळपघळ सुती कापडाचे होते. गेल्या पंचवीस वर्षांत आपली राहणी खूपच चंगळवादी स्वरूपाची झाली आहे. कपडे कृत्रिम धाग्याचे टेरेलिन असे आहेत. शारीरिक श्रम कमी झाले आहेत. दैनंदिन खाण्या-पिण्यात खूपच बदल झाले आहेत. होत आहेत. एक काळ हॉटेलमधील खाणे निंद्य समजले जायचे. आता हॉटेलिंग ‘ऑर्डर ऑफ दि डे’ झाले आहे. तंबाखू, मद्यपान, मशेरी, धूम्रपान वाढले आहे. आंघोळीकरिता साबणाचा वाढता वापर आहे.
एकीकडे भरपूर मीठ असणारे लोणची, पापड चमचमीत पदार्थ खायचे व दुसरीकडे शारीरिक श्रम आभावाने करायचे अशी लाइफस्टाइल सुरू झाली की शरीरातील मलद्रव्ये घामाच्या रूपाने बाहेर पडणे बंद होते. स्थूल स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी अल्पार्तव, अनार्तव, अनियमित पाळी अशा वाढतात. बऱ्याचशा त्वचाविकारांचे एक प्रमुख कारण मलावरोध, पोट साफ नसणे, मळाचा वेळेवर झाडा न होणे असे असते. पिग्मेंटेशन म्हणजे त्वचेवरील डाग गोऱ्या माणसाचे काळे डाग; सावळ्या माणसाचे पांढरे डाग म्हणजे मूळ रोग नव्हे. मल, मूत्र व स्वेद स्त्रियांचे आर्तव यांच्या अवरोधामुळे पिग्मेंटेशनसारखे विकार जास्त करून तरुणांना ग्रासतात.
पिग्मेंटेशन या तक्रारीमुळे दैनंदिन व्यवहारात कसलीच हानी नसते. फक्त दिसायला वाईट दिसते. आपला चेहरा ‘बघणेबल’ हवा असेल तर प्रवाळ, कामदुधा, चंदनादि प्र. ३ गोळ्या दोन वेळा, उपळसरीचूर्ण सकाळी; रात्री गंधर्वहरितकी किंवा त्रिफळाचूर्ण एक चमचा घ्यावे. शक्यतो अळणी जेवावे. बाह्य़ोपचारार्थ दशांगलेप, सुवर्णमुखीचूर्ण, शतधौतघृत यांचा युक्तीने वापर करावा. काळ्या मनुका खाव्यात. त्वचेचे नकोसे डाग निश्चित जातात.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. कालिदास आणि शकुंतला
शकुंतला मेनकेची मुलगी. विश्वामित्रांना भुलविण्यासाठी जी पाठविली ती ही मेनका आणि त्या दोघांची ही मुलगी. महाभारतात रीतसर विवाह जरा कमीच. ही अशी अनौरस मुलगी शकुंत नावाच्या पक्ष्यांच्या पाळणाघरात काही दिवस काढते म्हणून शकुंतला. पुढे कण्व ऋषी हिला वाढवतात. ही जरा भन्नाटच. बापाची प्रखरता आणि आईची कमनीयता. ही तरुण झाल्यावर शिकार करायला आलेल्या दुष्यंत स्वत:च शिकार होतो. तसा तो रुबाबदारच तेव्हा हीसुद्धा नाही कशाला म्हणेल? बापाची हुशारी आणि आईची चतुराई घेऊन आलेली ही म्हणते माझ्या पोटच्या मुलाला युवराज करणार असशील तरच.. दुष्यंत हो म्हणतो. याला हल्ली परदेशात ढ१ील्ल४स्र्३्रं’ अॠ१ीेील्ल३ म्हणतात. मधुचंद्राच्या रात्री ‘कौन जीता और कौन हारा?’ याचे उत्तर दुष्यंतर हरला. पुढे हिला दिवस जातात, पण हा पठ्ठय़ा बेपत्ताच. हा बायकांचा जुना ढ१ु’ीे आहे. मग ही थेट राजधानीतच जाते. ‘रात गयी बात गयी’ या धर्तीवर तो तिला फुटवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही भडाभडा बोलते तेव्हा आकाशवाणी होते. जणू काही ॅील्ली३्रू ळी२३्रल्लॠ चा अहवालच. तेव्हा मग गडी नमतो, म्हणतो हे लचांड आवरलेले बरे. ही झाली महाभारतातली गोष्ट.
महाकवी कालिदास ही गोष्ट उलटी करतो. यात कण्व ऋषींचा शोक आहे. सासरी जाऊ नको, असे म्हणत पदर खेचणारी हरिणी आहे. ‘प्यार किया तो डरना क्या?’ अशी बिनधास्त शकुंतला आहे. निरोप पोहोचविणारी प्रीयवंदा आहे. मुलींना ‘सखी’ लागते किंवा मिळून साऱ्या जणी असतात. पायाला काटा टोचल्याचे निमित्त करीत दुष्यंताकडे चोरून बघणारी आणि भान हरपलेली शकुंतला दुर्वास मुनींकडे दुर्लक्ष करते तेव्हा तिला ‘तुझा नवरा तुला विसरेन’ असा शाप मिळतो आणि कालिदास ‘दुष्यंताची काय चूक?’ असले पुरुषी नाटक आधीच रचून ठेवतो. प्रियंवदा विनवते म्हणून अंगठी दाखवली तर ओळख पटेल, असा उ:शाप मिळतो. मग अंगठी हरविते तेव्हा ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेत दुष्यंत हात वर करतो. कालिदासची शकुंतला आपल्या प्रेमावर नितांत विश्वास असल्यामुळे हल्लीच्या री१्रं’२ मधल्या सतिसावित्रीसारखी वागते. तपश्चर्या करते. र्रल्लॠ’ी ट३ँी१ होते. मग मासा गळाला लागतो. अंगठी मिळते (!) तो बिचारा निर्दोष दुष्यंत जागा होतो आणि हात जोडतो आणि धरतोही.
इथेही शकुंतलाच जिंकते आणि टागोर म्हणतात, कालिदासने स्त्री-पुरुष प्रेम आध्यात्मिक पातळीवर नेऊन पोहोचवले.
अशा तऱ्हेने कवी मंडळी समाजमनाला निरनिराळी वळणे देतात. म्हणून म्हणतात जे न देखे रवि ते देखे कवी. माध्यमांना हाताशी धरून अशा तऱ्हेने समाजमन वळविणाऱ्यांना हल्ली रस्र््रल्ल ऊू३१२ म्हणतात.
रविन मायदेव थत्ते
आजचे महाराष्ट्रसारस्वत: १९ ऑगस्ट
१९०३ > कोशकार, चरित्रकार, पत्रकार, संपादक गंगाधर देवराव खानोलकर यांचा जन्म. ‘प्रतिभा’ हे पाक्षिक त्यांनी सुरू केले होते. त्यांचे महत्त्वपूर्ण साहित्यिक योगदान म्हणजे सात खंडांचा ‘अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक’ हा कोश. याशिवाय ‘प्रेम आणि विद्धता’ हा कथासंग्रह, ‘वि. का. राजवाडे : व्यक्ती, विचार व कार्य’ हा ग्रंथ तसेच श्री. कृ. कोल्हटकर, लाला लजपतराय आदींची चरित्रपुस्तके गंदेंनी लिहिली.
१९०५ > ‘खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधडय़ा। उडविन राइ राइ एवढय़ा॥’ या लोकप्रिय कवितेचे कवी, कादंबरीकार व समीक्षक वामन भार्गव पाठक यांचा जन्म. ‘नकोत त्या गोष्टी’ हा लघुनिबंध संग्रह आणि ‘आशेचे किरण’ ही कादंबरी, हे त्यांचे प्रकाशित साहित्य. त्यांनी (अप्रकाशित) नाटकही लिहिले होते, अशी माहिती मिळते.
१९९० > ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ लिहिणारे पत्रकार व लेखक रामचंद्र केशव लेले यांचे निधन. हा ग्रंथ लेले यांनी वि. कृ. जोशी यांच्या सहकार्याने लिहिला व त्याचा पहिला खंडच प्रकाशित होऊ शकला. सूचिकार आणि कोशकार म्हणून काम केलेल्या लेले यांनी ‘ग्रंथवर्णन’ व ‘ग्रंथसूची’ ही पुस्तके सिद्ध केली.
संजय वझरेकर