खरेदी करावयाची शेतजमीन आदिवासी, सरकारी अथवा खासगी जंगल, आरक्षित म्हणून घोषित, निर्णय प्रलंबित इत्यादी बाबींची पडताळणी संबंधित महसुली अधिकाऱ्याकडून करून घेणे फायद्याचे ठरेल. भविष्यात अडचणी येणार नाहीत.
जमिनीचा खरेदी व्यवहार पूर्ण करण्याच्या तारखेपर्यंत जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीने त्या जमिनीचा सर्व प्रकारचा कर, महसूल भरले आहेत की नाही, ते पाहून जमीन बोजाविरहित केल्याची खातरजमा त्या त्या महसूल अधिकाऱ्याकडून करून घ्यावी.
विक्री करणाऱ्या/ देणाऱ्या व्यक्तीची जमीन ही त्यांच्याकडे वंशपरंपरागत आली असेल तर त्या कुटुंबातील प्रत्येक हयात वाली-वारसाची संबंधित विक्री व्यवहाराला लेखी संमती असावी. ती असल्याची खातरजमा करून मगच पुढे जावे. अशी संमती गरजेची आहे व त्यांना या व्यवहारात संमतीसाठी सामील करून घ्यावे. जर ती जमीन स्वकष्टार्जति असेल तर विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची उदा. नवरा, बायको, मुले यांची संबंधित व्यवहारास लेखी संमती घ्यावी. त्या सर्वाना या व्यवहारात सामील करून घ्यावे. साठेखत/ इसार पावती आणि खरेदी खत या सर्व व्यवहारांतदेखील या वाली व वारसांना सामील करून घ्यावे. त्याबरोबरच कायद्याने अत्यावश्यक प्रतिज्ञापत्रे व घोषणापत्रे साक्षांकित करून घ्यावीत. उभय पक्षांनी मान्य केलेल्या मुदतीतच ही सर्व कामे करून घेऊन अंतिम व्यवहार पूर्ण करावा. यामुळे भविष्यात कोणालाही, कोणत्याही वादास सामोरे जावे लागणार नाही.
खरेदी व्यवहार करण्यापूर्वी ती जमीन ज्या गावहद्दीत येते, त्या विभागासाठी सरकारने ठरवलेला बाजारभाव काय आहे व त्यानुसार करावयाच्या दस्तासाठी प्रचलित दरानुसार किती मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरावी लागेल, यांची माहिती संबंधित संयुक्त/ दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयातून मिळवावी. त्याचप्रमाणे सरकारने घोषित केलेल्या अथवा निर्धारित केलेल्या बाजार मूल्यांपेक्षा खरेदी व्यवहाराची किंमत कमी असता कामा नये, हे पाहावे.
या कामी आवश्यकतेनुसार तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्यावा. व्यवहाराच्या सुरुवातीपासून व्यवहार पूर्ण करेपर्यंत त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या देखरेखीखाली व्यवहार पूर्ण करावा.
वॉर अँड पीस: रसायनप्रयोग : भाग-७
दिवसेंदिवस गोरगरीब, श्रीमंत, ग्रामीण व शहरातील बहुसंख्य मंडळींचे दैनंदिन जीवनात पूर्वीसारखे स्वास्थ्य, शांतता, स्वस्थता हे गुण अभावाने दिसतात. सगळ्यांचे जीवन खूप फास्ट’ झाले आहे. मला नेहमी माझ्याकडे आम्लपित्त, अॅसिडिटी, उलटी याकरिता येणाऱ्या रुग्णांच्या अपेक्षांची गंमत वाटते. ‘डॉक्टर, तुम्ही आम्हाला जेवणा- खाण्याच्या वेळेचे विचारू नका बुवा! तुम्ही आपले औषध द्या आणि मोकळे करा.’ आहे की नाही रुग्णमित्रांचा अजब सांगावा! आम्लपित्त, अॅसिडिटी, उलटय़ा, पोटफुगी, पोटदुखी या विकारांचे मूळ जेवणाखाण्याच्या अनियमित वेळा असते.
तुम्ही-आम्ही जे खातो-पितो त्याच्याबरोबर चार तासांनंतरच्या काळाने पित्ताचे स्राव अमाशयाचा शेवटचा भाग व पच्चमानाशयाच्या सुरुवातीच्या भागात येत असतात. मात्र तुम्ही कालच्या दुपारच्या एक वाजताची जेवणाची वेळ न पाळता आज दुपारी तीन वाजता जेवलात की गोंधळ होतो. कारण कालच्या हिशोबाने दुपारी पाच वाजता पित्त पोटात हजर असते. पण त्याला तिथे अन्न नसल्यामुळे काही कामच नसते. स्वाभाविकपणे ते पित्त वर वर येते. अॅसिडिटी, आम्लपित्त उलटीची भावना उत्पन्न करते. असे वारंवार होत गेले की, छातीत जळजळ, पोटफुगी व शेवटी आतडय़ात व्रण, अल्सर अशी लक्षणे बळावतात. पण मंडळी आपली रोजची धावपळीची दीनचर्या बदलत नाहीत. जिथे मला जेवायला वेळ नाही तिथे मी रसायन औषध काय घेणार, असा प्रश्न स्वाभाविकपणे रुग्णाला व औषधोपचाराचा सल्ला देणाऱ्यालापण होतो. कमीतकमी घटकद्रव्ये असलेले अल्पमोली, बहुगुणी कमी खटाटोपाचे रसायन औषध म्हणजे लघुसूतशेखर. सुवर्णसूतशेखर किंवा पित्ताची मात्रा नव्हे हे वाचकांनी पक्के लक्षात ठेवावे. मौक्तिक, प्रवाळ, कामदुधा यांच्यातील एक औषध गोरखचिंचावलेहा बरोबर रसायन म्हणून घ्यावे. श्रीगणपती अथर्वशीर्ष फलश्रुतीत लाह्य़ांचे महत्त्व सांगितलेलेच आहे. जो राजगिऱ्याच्या, साळीच्या लाह्य़ा खाईल तो वाचेल. इति श्रीगणेशकृपा!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा