पर्यावरण संवर्धन व संरक्षण या क्षेत्रात बारामती येथील ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ ही संस्था कार्यरत आहे. फोरमच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी प्रचार व प्रसार, वृक्षारोपण, वसुंधरा फेस्टिवल, वन्यजीव बचाव असे विविध कार्यक्रम राबविले जातात.
बारामती व आसपासच्या परिसरात ३०० पेक्षा जास्त लहानमोठे पाझर तलाव आहेत. यांपकी काही तलाव ब्रिटिशकालीन आहेत. या तलावांमधील गाळ काढण्याचे काम वर्षांनुवष्रे झाले नव्हते. ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तलावांमध्ये अनेकदा घातक जलपर्णी, गारवेल अशा वनस्पतींची वाढ होते. यामुळे पुरेसा पाणीसाठा होण्यात अडचणी येतात. शिवाय पाण्यात विषारी द्रव्ये मिसळतात. पाणीसाठा वाढविण्याबरोबरच त्यात विषारी द्रव्ये मिसळू नयेत, यासाठी फोरमने ‘प्रकल्प मेघदूत’ची योजना आखली.
वर्षांनुवष्रे मातीची धूप होऊन ही माती पावसाच्या पाण्याबरोबर तलावांमध्ये वाहून येते. माती साचल्यामुळे तलावांची पाणी साठवण क्षमता कमी होते. तलावांशेजारील बहुतांश जमिनींमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने पाणी साठवण क्षेत्रातील जागेचा उपयोग शेतीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले. बहुतांश तलावांचे भराव व सांडवे फोडले जातात. अनेक पाझर तलावांचे भराव फोडल्याने पाणी साठवण क्षेत्रात पाणी साठून न राहाता वाहून गेल्याचे निदर्शनास आले. पावसाच्या पाण्याबरोबर मोठय़ा प्रमाणात वाहून येणारा गाळ न उपसल्यामुळे तलावांमध्ये ५ ते १५ फुटांपर्यंत मातीचे थर साठलेले आढळले. गारवेलसारख्या वनस्पतींनी तलावाचा जवळजवळ ७० ते ९० टक्के भाग व्यापलेला आहे. तलावाच्या सांडव्यावरती असलेल्या साधी बाभूळ या उपयुक्त वनस्पतीची मोठय़ा प्रमाणात तोड होते. गाळाच्या उपस्याबरोबर अनेक दशके तलावाच्या डागडुगीची कामेसुद्धा झाली नव्हती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मेघदूत प्रकल्पाची योजना आखण्यात आली.
तलाव संवर्धनासाठी काम सुरू करण्यापूर्वी गावातील लोकांमध्ये त्याबाबत जाणीवजागृती निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये चर्चासत्राचे आयोजन करून गावातील लोकांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा