रासायनिक उद्योगांचा कच्चा माल म्हणजेच निसर्गाच्या रासायनिक कारखान्यांचा पक्का माल होय. जे निसर्गाने केलेले आहे त्याचा उपयोग करून मानवाने प्रगतीची नवीन पावले टाकली आहेत. निसर्गाने पृथ्वीवरच्या वायुमंडळाचे, भूमंडळाचे आणि जीवमंडळाचे आणि त्यामध्ये सातत्याने घडणाऱ्या क्रियांमधले संतुलन साधले आहे. या सर्व नसíगक क्रियांमध्ये जसे अनेक पदार्थ भाग घेतात तसेच अनेक नवीन पदार्थ निर्माण होतात. ते सर्व पदार्थ मानव स्वत:च्या बुद्धिकौशल्याने आणि गरजेप्रमाणे रासायनिक उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून वापरतो.
रासायनिक उद्योगाच्या सर्व प्रकारच्या कच्च्या मालांचे विभाजन कार्बनी आणि अकार्बनी या मुख्यत: दोन भागांत होते. हवा आणि पाणी या अकार्बनी पदार्थाचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो. हवेच्या घटक वायूंपकी रासायनिक उद्योगासाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचे असलेले घटक म्हणजे ऑक्सिजन आणि दुसरा नायट्रोजन. नायट्रोजनचा सर्वात मोठा औद्योगिक उपयोग अमोनियाच्या निर्मितीत होतो. रासायनिक उद्योगांच्या दृष्टीने कच्च्या मालाइतकेच, किंबहुना त्याहूनही जास्त प्रमाणात विविध प्रकारच्या संस्करणांसाठी लागणारा एक पदार्थ म्हणून पाण्याला फारच महत्त्व आहे. अनेक रसायने पाण्यात विरघळतात, त्यामुळे त्याला ‘वैश्विक विद्रावक’ म्हणतात. साहजिकच अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये, विशेषत: मिश्रणातील घटकांचे विलगीकरण, रसायनांचे शुद्धीकरण, स्फटिकीकरण किंवा अर्क काढणे इ. कामांसाठी पाण्याव्यतिरिक्त फारच थोडय़ा पदार्थाचा वापर होतो. बहुतेक रासायनिक वा अन्य उद्योगांमध्ये जसे तापमान वाढविण्यासाठी मुख्यत: पाण्याच्या वाफेचा उपयोग होतो तसेच तापमान कमी करण्यासाठी शीतक म्हणून गार पाण्याचा वापर करतात. पाणी हा प्रवाही पदार्थ आहे. कोणत्याही प्रकारची स्वच्छता करताना त्यामुळेच पाण्याला अग्रस्थान आहे. पाण्यात न विरघळणारे, पण भिन्न घनतेचे पदार्थ पाण्यात ढवळून वेगवेगळे करतात. जलविद्युत प्रकल्पामध्ये, खनिजांच्या उत्खननामध्ये व मोठय़ा आकाराच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी प्रचंड दाबाच्या पाण्याचा वापर केला जातो.
अकार्बनी कच्च्या मालांमध्ये वरील पदार्थाबरोबर सल्फर, फॉस्फरस, क्लोरिन, चुनखडी आणि विविध खनिज पदार्थाचा समावेश होतो. कार्बनी कच्च्या मालांमध्ये पेट्रोलिअम पदार्थ, सजीव सृष्टी, दगडी कोळसा इत्यादींचा समावेश होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा