खारट चव म्हटली की आपल्याला प्रथम आठवतं ते मीठ. एखाद्या दिवशी जर भाजीत मीठ घालायचं राहिलं तर ती भाजी कशी लागेल? चवीनं खारट असलेल्या या मिठामुळेच तर पदार्थाची लज्जत वाढते.
सोडिअम आणि क्लोरिन ही मिठातील महत्त्वाची मूलद्रव्ये. जेव्हा मीठ आपल्या जिभेच्या पृष्ठभागावर विरघळते तेव्हा सोडिअम आणि क्लोरिन ही मूलद्रव्ये वेगळी होतात. सोडिअमचं धन प्रभारित आयन आणि क्लोरिनचं ऋण प्रभारित आयन असं विभाजन होतं. आपल्या जिभेच्या शेंडय़ापासून मागे डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या दांडय़ाच्या आकाराच्या रुचिकलिकांवर छिद्रं असतात. सोडिअमचे आयन रुचिकलिकांवरील छिद्रांमधून अगदी लहान अशा रसांकुरांपर्यंत पोचतात. रसांकुर चेतापेशींकडे संदेश देतात. चेतापेशी हा संदेश मेंदूकडे पोहोचवतात आणि आपल्याला खारट चवीची जाणीव होते. मिठातील सोडिअम तसेच पोटॅशिअम ही मूलद्रव्यं खारट चव निर्माण करतात.
आपण पदार्थ तोंडात घातला की सर्वप्रथम विरघळणारे पदार्थाचे रेणू चवीची जाणीव निर्माण करतात. पदार्थ चावायला लागल्यावर नवनवीन स्वादाचे रेणू लाळेमध्ये जमा होतात. लाळेतील विकर प्रथिनांशी रासायनिक क्रिया करू लागतात आणि आणखी नवे स्वादाचे रेणू तयार होतात व वेगवेगळ्या चवींची जाणीव होते. उदा. सॉसमध्ये बुडवून मटारची उसळ भरलेला पॅटिस तोंडात घातला तर सॉस द्रवपदार्थ असल्याने सर्वप्रथम चव लागते ती सॉसची. मग जसजसा आपण सामोसा चावतो, तसतशी ती चव बाहेरच्या आवरणाची किंवा मटारची किंवा उसळीतल्या मसाल्याची न राहता एक एकत्रित परिणाम तयार होतो आणि वेगळी चव लागते. फक्त गोड, आंबट, कडू, खारट असा पदार्थ आपण कधीच खात नाही. या सर्व चवींचे एकत्रीकरण होऊन पदार्थाला विशिष्ट चव प्राप्त होते.
पदार्थाची चव त्यातील रासायनिक घटकांबरोबरच रुचिकलिकांच्या क्षमतेवर अवलंबून असते. रुचिकलिकांची क्षमता माणसाच्या वयावर, त्याला झालेल्या रोगांवरही अवलंबून असते. लहान मुलांमध्ये मोठय़ा माणसांपेक्षा जास्त रुचिकलिका असतात. मधुमेहाने अनेक वष्रे पीडित असलेल्या रुग्णांमध्ये कधी कधी रुचिकलिकांची क्षमता कमी झाल्याने पदार्थाची चव त्यांना नीट लवकर समजत नाही असे आढळून आले आहे. अखेर शेवटी चव ही व्यक्तिसापेक्ष आहे हेच खरं!या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराया बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन कराAlready have an account? Sign inसर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठीसबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खारट चव
खारट चव म्हटली की आपल्याला प्रथम आठवतं ते मीठ. एखाद्या दिवशी जर भाजीत मीठ घालायचं राहिलं तर ती भाजी कशी लागेल?
First published on: 06-12-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity salty test
Show comments