कापसाला तंतूंचा राजा म्हटले जाते तर रेशमाला तंतूंची राणी. याचे महत्त्वाचे कारण या तंतूची तलमता, झळाळी, स्पर्श, उपयुक्तता सर्वच अतुलनीय आहेत. रेशीम हा नसíगक प्राणीजन्य तंतू आहे. तो विशिष्ट प्रकारच्या किडय़ापासून मिळतो.
रेशीम किडय़ाला स्वत:चे असे जीवनचक्र आहे. नर-मादी मीलन, अंडी, अळ्या, सुरवंट, कोश, किडा, पतंग या प्रत्येक अवस्थेतील तापमान, तुतीच्या झाडाची निगा इत्यादी तांत्रिक परिमाणांचा रेशीम धाग्यांच्या गुणवत्तेवर पूरक वा प्रतिरोधक परिणाम होतो. सुरवंटाची पूर्ण वाढ झाल्यावर त्याच्या अंगातील रेशमाचा द्राव तंतूच्या रूपात बाहेर पडतो आणि सुरवंटाभोवती रेशमाचा कोश तयार होतो. हा कोष फोडून पतंग बाहेर पडतो व जीवनचक्राचा शेवटचा टप्पा पूर्ण होतो. या जीवनचक्राच्या शेवटच्या टप्प्यात किडा स्वत:ला मुक्त करवून घेताना स्वत:ची सुटका करून बाहेर पडताना रेशमाच्या तंतूंना इजा होते, तंतू तुटतात. रेशमाच्या अखंडपणात बाधा येते. तंतूंची अखंडता तुकडय़ामध्ये परिवर्तित होते.
ही रेशमाची कोशात्मक संघटना उपयुक्ततेच्या दृष्टीने अखंड धाग्यांमध्ये आणण्यासाठी ते रिळांवर गुंडाळले जातात. याच वेळेस अखंड तंतू मिळवले जातात. हे काम कारागिराच्या कौशल्यावर अवलंबून असते. या हाताळण्याच्या प्रक्रियेमध्ये कमालीची दक्षता घ्यावी लागते; अन्यथा तयार होणारे धागे कमी ताकदीचे निर्माण होतात. त्यांचा वापर आवश्यक त्या कारणासाठी करता येत नाही. म्हणून दक्षता घेणे आणि कौशल्य असणे दोन्ही गोष्टींची गरज आहे.
 हे गुंतागुंतीचे काम करणाऱ्या कामगारांच्या क्रयशक्तीचा व्यय होतो व प्रक्रियेची निर्मितीची किंमत वाढते. रेशीम धाग्यांच्या उपयुक्ततेचा दर्जा व गुणवत्ता खालावते.
जागतिक रेशीम उत्पादनात चीन सर्वात अग्रेसर आहे तर भारताचा दुसरा नंबर लागतो. ही परिस्थिती कित्येक शतके तशीच आहे. जवळजवळ ८० ते ८५% उत्पादन या दोन देशांतच होते. भारतापुरता विचार करायचा झाल्यास सर्वाधिक उत्पन्न कर्नाटक राज्यात होते, म्हणून बंगळुरुला रेशमाची राजधानी असे म्हटले जाते. कर्नाटकनंतर आंध्र प्रदेशचा नंबर  लागतो. महाराष्ट्र या राज्यांपेक्षा खूप मागे आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रयत्न या दिशेने होत असले तरी लक्षणीय प्रगती अजूनही अनुभवास येत नाही.

संस्थानांची बखर: ओच्र्छाचे ‘राजा राम का मंदिर’
ओच्र्छा राज्याचा संस्थापक रुद्र प्रताप याने किल्ला बांधताना प्रचंड मोठी धान्याची कोठारे बांधली. चार वष्रे आतल्या धान्यावर गुजराण होऊ शकेल अशा प्रमाणात नेहमी धान्याचा साठा असल्याने हा किल्ला अजिंक्य sam05राहिला. मराठय़ांनीही हा किल्ला अनेक वेळा घेण्याचा प्रयत्न केला, पण ओच्र्छा आणि दातिया ही बुंदेलखंडातील फक्त दोनच राज्ये त्यांच्यापासून सुरक्षित राहिली.
रुद्र प्रतापने बांधलेले भव्य, सुबक ‘राजा राम का मंदिर’ हे अद्वितीय आहे.
भारतातील बाकी सर्व राम मंदिरे श्रीराम या दैवताची आहेत परंतु ओच्र्छाचे राम मंदिर हे श्रीराम या राजाचे मंदिर आहे. हे राजा राम का मंदिर म्हणजे राजा श्रीरामाचा दरबार असल्याने मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सरकारतर्फे बंदुकींनी सकाळ-संध्याकाळी सलामी दिली जाते. अशा प्रकारे सलामी दिली जाणारे हे एकच मंदिर आहे. रुद्र प्रतापने बांधलेल्या इतर मंदिरांपकी लक्ष्मीनारायण मंदिर, राजमहल, राय प्रवीण महल, लक्ष्मी मंदिर आणि फुलबाग उद्यान हे प्रसिद्ध आहेत.
हमीर सिंग या शासकाच्या कारकीर्दीत ओच्र्छा आणि दातिया राज्यांच्या संयुक्त फौजेने राणी लक्ष्मीबाईच्या झांशीवर चढाई केली. पण राणीने त्यांचा हल्ला सहज परतवून टाकला. महाराजा प्रतापसिंग याने आपली पूर्ण कारकीर्द राज्याच्या उन्नतीसाठी व्यतीत केली. त्याने पाणीपुरवठा, कालवे व तांत्रिक बाबींमध्ये स्वत: लक्ष घालून सुधारणा करून घेतल्या. १९०१ साली बुंदेलखंड एजन्सीत वर्ग झालेले ओच्र्छा संस्थान राजा बीरसिंगने १ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारतात विलीन केले.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Bed Sheet production in Solapur
सोलापूरच्या चादर व्यवसायाचे पानिपत!
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
Shakambhari Navratri festival of Tuljabhavani Devi begins in dharashiv
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना, तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ
general administration department issued a circular on national heroes anniversaries opposed by mahanubhava corporation
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…
Parn Pethe
‘जिलबी’मध्ये पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत; चित्रपटाला होकार देण्याचे कारण सांगत म्हणाली…
Story img Loader