कापसाला तंतूंचा राजा म्हटले जाते तर रेशमाला तंतूंची राणी. याचे महत्त्वाचे कारण या तंतूची तलमता, झळाळी, स्पर्श, उपयुक्तता सर्वच अतुलनीय आहेत. रेशीम हा नसíगक प्राणीजन्य तंतू आहे. तो विशिष्ट प्रकारच्या किडय़ापासून मिळतो.
रेशीम किडय़ाला स्वत:चे असे जीवनचक्र आहे. नर-मादी मीलन, अंडी, अळ्या, सुरवंट, कोश, किडा, पतंग या प्रत्येक अवस्थेतील तापमान, तुतीच्या झाडाची निगा इत्यादी तांत्रिक परिमाणांचा रेशीम धाग्यांच्या गुणवत्तेवर पूरक वा प्रतिरोधक परिणाम होतो. सुरवंटाची पूर्ण वाढ झाल्यावर त्याच्या अंगातील रेशमाचा द्राव तंतूच्या रूपात बाहेर पडतो आणि सुरवंटाभोवती रेशमाचा कोश तयार होतो. हा कोष फोडून पतंग बाहेर पडतो व जीवनचक्राचा शेवटचा टप्पा पूर्ण होतो. या जीवनचक्राच्या शेवटच्या टप्प्यात किडा स्वत:ला मुक्त करवून घेताना स्वत:ची सुटका करून बाहेर पडताना रेशमाच्या तंतूंना इजा होते, तंतू तुटतात. रेशमाच्या अखंडपणात बाधा येते. तंतूंची अखंडता तुकडय़ामध्ये परिवर्तित होते.
ही रेशमाची कोशात्मक संघटना उपयुक्ततेच्या दृष्टीने अखंड धाग्यांमध्ये आणण्यासाठी ते रिळांवर गुंडाळले जातात. याच वेळेस अखंड तंतू मिळवले जातात. हे काम कारागिराच्या कौशल्यावर अवलंबून असते. या हाताळण्याच्या प्रक्रियेमध्ये कमालीची दक्षता घ्यावी लागते; अन्यथा तयार होणारे धागे कमी ताकदीचे निर्माण होतात. त्यांचा वापर आवश्यक त्या कारणासाठी करता येत नाही. म्हणून दक्षता घेणे आणि कौशल्य असणे दोन्ही गोष्टींची गरज आहे.
हे गुंतागुंतीचे काम करणाऱ्या कामगारांच्या क्रयशक्तीचा व्यय होतो व प्रक्रियेची निर्मितीची किंमत वाढते. रेशीम धाग्यांच्या उपयुक्ततेचा दर्जा व गुणवत्ता खालावते.
जागतिक रेशीम उत्पादनात चीन सर्वात अग्रेसर आहे तर भारताचा दुसरा नंबर लागतो. ही परिस्थिती कित्येक शतके तशीच आहे. जवळजवळ ८० ते ८५% उत्पादन या दोन देशांतच होते. भारतापुरता विचार करायचा झाल्यास सर्वाधिक उत्पन्न कर्नाटक राज्यात होते, म्हणून बंगळुरुला रेशमाची राजधानी असे म्हटले जाते. कर्नाटकनंतर आंध्र प्रदेशचा नंबर लागतो. महाराष्ट्र या राज्यांपेक्षा खूप मागे आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रयत्न या दिशेने होत असले तरी लक्षणीय प्रगती अजूनही अनुभवास येत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा