पुष्कळ वेळा पुरेसे पाणी वापरूनही कपडे स्वच्छ होत नाहीत. आपण त्या वेळी साबणाचा उपयोग करतो. कपडे स्वच्छ करण्यामध्ये साबण नेमकं काय करतो? आपल्या शरीरातून व केसांमधून घामाबरोबर तेलकटपणा किंवा स्निग्धांश बाहेर पडतो. शिवाय आपण तेल, व्हॅसलिन वापरतो. आपल्या खाण्यामध्ये लोणी, तूप, तेल हे पदार्थ असतातच. शरीरावरील व हवेतील मळ आपण वापरलेल्या कपडय़ांच्या धाग्यांमध्ये अडकून बसतो. तेल व पाणी यांच्या परस्परविरोधी गुणांमुळे ती एकजीव होत नाही, त्यामुळे पाण्याबरोबर तेलांश वाहून जात नाहीत. शरीर व कपडे स्वच्छ करावयाचे तर मळावर बसलेला तेलांशाचा सूक्ष्म थर काढून टाकणे आवश्यक आहे. म्हणजेच तेलांश पाण्यात मिसळला पाहिजे.
काहीशा परस्परविरोधी गुणांच्या या द्रव्यांना एकजीव करण्यासाठी एखाद्या मध्यस्थाची गरज असते. मध्यस्थाचे काम साबण करतो. पण साबण म्हणजे काय आहे? तेल किंवा चरबी सोडिअम किंवा पोटॅशिअम हायड्रॉक्साइडच्या जलीय द्रावणाबरोबर उकळली असता काबरेक्सिलिक आम्लाचे सोडिअम किंवा पोटॅशिअम क्षार तयार होतात. या क्षारांनाच ‘साबण’ असे म्हणतात. तेल किंवा चरबीच्या आम्लारीयुक्त  जलअपघटन प्रक्रियेस साबणीकरण (रंस्र्ल्ल्रऋ्रूं३्रल्ल)असे म्हणतात. साबण पाण्यात घातल्यावर पाण्याचा पृष्ठीय ताण कमी होतो. त्यामुळेच साबणाच्या पाण्यामध्ये कपडय़ाच्या प्रत्येक तंतूमध्ये पाणी प्रवेश करून कपडे लवकर भिजून ओले होतात. साबणातील रेणू म्हणजे सोडिअम किंवा पोटॅशिअम काबरेक्सिलिक आम्लाच्या मोठय़ा शृंखलेचे क्षार आहेत. साबणाच्या रेणूच्या एका टोकास हायड्रोकार्बनची शृंखला असते. म्हणजेच ते पाण्यात अद्रावणीय असून तेलात द्रावणीय आहेत. साबणाच्या दुसऱ्या टोकास काबरेझायलेट आयन असतात ते जलाकर्षक असतात. ते पाण्यात द्रावणीय असून तेलामध्ये अद्रावणीय आहेत. साबणाच्या रेणूतील लांब अध्रुवीय बंध असणारी टोके ही पृष्ठभागावरील मळ व धूळ शोषून घेण्याचे कार्य करतात. काबरेझायलेट आयनचे ध्रुव पाण्याला धूळ किंवा मळ यांपासून दूर सारण्याचे कार्य करतात. अशाप्रकारे साबणाचा रेणू मळास पाण्यामध्ये विरघळण्यास मदत करतो, त्यामुळे आपण आपले कपडे स्वच्छ धुऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोधन पर्व: संस्कृतीचा भाष्यकार – श्री. म. माटे
विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वाङ्मयीन इतिहासात श्री. म. माटे यांचे विशेष असे स्थान आहे. या कालखंडाचा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही प्रामाणिक व चिकित्सक अभ्यासकाला माटे यांचे सामाजिक काम आणि त्यांचे वैचारिक लेखन यांचा विचार करावाच लागतो. मायभूमीवर आत्यंतिक प्रेम, ती परदास्यात असल्याची खंत आणि आपल्या प्राचीन परंपरांचा डोळस अभिमान माटे यांच्याकडे होता. आयुष्यभर निरलसपणे अध्यापनाचे काम करणाऱ्या माटे यांचा उल्लेख ‘माटे मास्तर’ या शब्दांत केला जात असे. ‘आलोचना’सारख्या  मासिकाने माटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेषांक काढला होता. मूलभूत श्रद्धा आणि तत्त्वे यांच्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता माटे यांनी सामाजिक समन्वय आणि सामंजस्याची वाट धरत महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याचे काम केले. विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिरुचीची जडणघडण करण्यात आणि तिची पातळी उंचावण्यात वामन मल्हार जोशी, श्री. म. माटे आणि नरहर कुरुंदकर या तीन विचारवंतांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. ‘महाराष्ट्र सांवत्सरिक’ हे मराठीतले पहिले इयर बुक, ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ हे दलित समाजाविषयी केलेल्या कामाविषयीचे पुस्तक, शास्त्रीय विज्ञानाच्या तत्कालीन प्रगतीचे आलेख मांडणारे ‘विज्ञानबोध’ हा मोठा ग्रंथ अशी वैचारिक-ललित अशा २५ हून अधिक पुस्तकांचे लेखन माटे यांनी केले आहे. त्यांनी सहा कथासंग्रह आणि एक कादंबरी लिहिली असली तरी माटे यांच्या वैचारिक लेखनाचा आलेख आणि उंची पाहता त्यांचे सर्जनशील साहित्य फार जमेस धरता येत नाही. ‘विज्ञानबोध’ला माटे यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. ती इतकी गाजली की नंतर त्याचे ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ या नावाने स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करावे लागले.  ‘टिळकांची जाज्वल्य स्वदेशी, आगरकरांची तशीच जाज्वल्य समाजसुधारणेची कळकळ आणि सीतारामपंत देवधरांची सुसंस्कृत कर्तव्यनिष्ठा या तीन आयामांचा तोल राखत माटय़ांनी पुढची चाळीस वष्रे अनेक उपक्रम केले’ असे पत्रकार विनय हर्डीकर यांनी माटे मास्तरांच्या सामाजिक कामाविषयी लिहिले आहे.

मनमोराचा पिसारा: दस नूर बक्कल
क्लिंट ईस्टवूड, जॉन वेन, टेरेन्स हिल, फ्रँको नीरो यांच्या जुन्या वेस्टर्न हॉलीवूड चित्रपटांमध्ये सगळे सेट परिचित असतात. अस्ताव्यस्त गावातला एखादा चौक, पलीकडे लहानसं चॅपेल, अलीकडे झुलत्या अध्र्या झडपांचे दरवाजे, बाहेर बांधलेले घोडे, टळटळीत दुपार, लांब झगा घातलेल्या बऱ्याच ललना आणि तगडा नायक, शक्यतो दोन्ही हातांत पिस्तुलं, मळक्या जीन्स, झिजलेले बूट, मोठी मेक्सिकन हॅट आणि कमरेला लावलेला रुंद पट्टा आणि त्यावरचं ठसठशीत बक्कल!
या सर्व वेशभूषेमध्ये उठून दिसायचा तो चामडय़ाचा पट्टा. कधी दोन लहान पट्टे एकाखाली एक असे. त्यामध्ये विराजमान झालेलं ते ब्रासचं बक्कल!
गंमत म्हणजे, पुरुषाच्या वेशभूषेत, विशेषत: सैनिकाच्या हे बक्कल फार महत्त्वाचं. सातव्या शतकातल्या सैनिकांच्या गणवेशात त्यांचा हमखास समावेश, कारण राजाचं गौरवचिन्ह शिरस्राणावर, छातीवरच्या कवचावर आणि या बक्कलवर! इतका त्याचा इतिहास जुना आहे.
मुळात पुरुष मंडळींना ‘फॅशन’ करण्यासाठी फारसा स्कोप नसल्यामुळे वेशभूषेतल्या बारीकसारीक गोष्टींत भागवावं लागतं. त्यामुळे पुरुषांच्या कपडय़ामधील काही ‘अ‍ॅक्सेसरीज’ना विशेष महत्त्व येतं, त्यातलीच हेही एक महत्त्वाची गोष्ट.
त्याचं महत्त्व वेशभूषाकारांनी ओळखून पुरुषांच्या शरीराच्या मध्यभागी नजर खिळविण्यासाठी त्यांनी याची योजना केली. त्यामुळे टिपिकल भारतीय वेशभूषेतही कमरेला पट्टा आणि त्याच्या मध्यभागी राजाची मुद्रा स्पष्टपणे मांडली.
मुळात कमरेचा पट्टा हा शोभेकरिता नसून पोट आत खेचून घट्ट धरण्याकरिता केला जात होता. विशेषत: नाभी भागावर ताण पडू नये म्हणून कंबर घट्ट आवळण्याकरिता बेल्ट अथवा कमरपट्टय़ाची योजना केली. त्याचबरोबर पोटाच्या आतल्या आवरणामधून ‘हर्निआ’सारखे प्रकार होतात. ते वेदनाकारक असतात आणि त्यांच्यावर नीट उपचार केले नाहीत तर शस्त्रक्रियेची पाळी येत असे. या काही महत्त्वाच्या गरजेकरिता पट्टा बांधला जात असे.
मग तलवार खोचण्यासाठी म्यान, बच्र्या, खंजीर यांच्यासाठी हा पट्टा उपयोगी पडू लागला. कमरेभोवती आवळला जाणारा कापडी व नंतर चामडय़ाचा पट्टा नीट राहावा म्हणून बक्कलची योजना सुरू झाली, पण आता हाच साधा ‘डिव्हाइस फॅशन’ बनून गेला. इतिहासाच्या सर्व काळात पट्टा आणि बक्कल अबाधित राहिला. बदलली फक्त डिझाइन्स. म्हणजे, इथे म्हटल्याप्रमाणे टिपिकल काऊबॉय मंडळींचे रुंद पट्टे आणि बकलं ढालीसारखी. घोडय़ावर खेळ खेळणाऱ्या रोडिओंची बकलं तर झगमगीत आणि तीन इंच रुंद. त्यावर खडे आणि टिकल्या. परंतु काऊबॉयचं आकर्षण विरलं आणि पट्टे अरुंद झाले. नागरी वेशातले तरुण आता एक ते सव्वा इंचाचे पट्टे आणि बॉक्स टाइप बक्कल वापरतात. त्यात पुन्हा अगदी तरुण मंडळी ‘फंकी’ डिझाइन वापरतात. बक्कलवर कधी अमेरिकन स्टार आणि स्ट्राइप, तर कधी ‘अपाचे’ डिझाइन.
बेल्ट कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाहीत. जरा चोखंदळपणे बेल्ट वापरणारी मंडळी मुख्यत: काळे पट्टे वापरतात. ब्राऊन किंवा निळसर पट्टे अर्थातच त्याच रंगाच्या डार्क शेडमधील ट्राऊजरवर वापरतात.
अलीकडे स्वेटशर्ट किंवा शॉटशर्ट फक्त पुढच्या बाजूने ट््रराऊजरमध्ये खोचण्याची फॅशन आहे, त्याला फ्रंट टक म्हणतात. त्याचंही कारण खास स्टायलिश बक्कल दिसावं आणि ट्राऊजरचा पुढचा भाग उठून दिसावा म्हणून.. एक नूर आदमी, दस नूर बक्कल हेच खरं!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com