आधुनिक रंगछपाई (डिजिटल प्रिंट्रिंग) या सर्वामागचे तंत्रज्ञान व रसायनशास्त्र, यातील प्रगतिशील संशोधन व त्यांनी ग्राहकाला दिलेली सोय प्रशंसनीय आहे. छपाई ही रंगकामाच्या पद्धतींचा एक अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या छपाई पद्धतीचा कल व त्या वेळेच्या प्रचलित पद्धतींचा भर टेबलावर जाळी ठेवून करण्याकडे होता. प्राचीन रंग तयार करण्याचे प्रकार व त्याकरिता आवश्यक असलेले रंगाचे स्वयंपाकघर हे आजच्याइतके सुधारित नव्हते. त्यामुळे रंगसातत्य, रंगप्रतिमा यांचा समन्वय वस्त्रामध्ये नसायचा. या बाबतीतसुद्धा टेबलाची जाळी व वर्तुळाकार चकत्यांवर (रोलर) केलेल्या कोरीव कामाने रंगप्रतिमा छपाई होत असे. याबाबतीत झालेल्या प्रगतीचा माग आपण घेणार आहोत. या सर्व क्षेत्रास अंककीय(डिजिटल) तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा झालेला फायदा आपण पाहणार आहोत.
आधुनिक फिनििशग पद्धतींची उपयुक्त माहितीपण आपण घेणार आहोत. इथे ही यंत्रे अभियांत्रिकी व ज्ञान यांचा यंत्राच्या तंत्रातील (डिजिटल व एरोडायनॅमिक यांच्या साहाय्याने) झालेली प्रगतीपण आपण तपासून पाहणार आहोत. या सर्वामुळे ग्राहकाला काय मिळाले हेही आपण माहीत करून घेणार आहोत. प्राचीन रंग-रसायने व आधुनिक छपाईची रंग-रसायने व पर्यावरण यांचे संबंध अविभाज्य आणि विचार करायला लावणारे आहेत. सक्रिय मानवी जीवनावर त्याचा होणारा परिणाम दूरगामी असल्याने त्यासंबंधात समग्र विचारमंथन या लेखमालेत असेल.
फिनििशगमध्ये प्राचीनकाळी फक्त पीठ (स्टार्च) लावून वस्त्राला कडकपणा आणत असत. त्यानंतर मऊपणा हवाहवासा वाटू लागला. त्या वेळेस सिलिकॉन फिनििशग पद्धती प्रचलित झाल्या.
कालांतराने वस्त्रप्रावरणावर चुण्या पडू नये, असा एक प्रघात आला. त्याने रेझीन पद्धतीस जन्म दिला. आता अग्निप्रबंधक फिनिश, डागप्रबंधक, जलउदासीन फिनिशेस आल्या आहेत.
या क्षेत्रातील याहीपेक्षा अनेक निरनिरीळ्या संशोधनांचा लेखाजोखा आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व संशोधन ग्राहकास केंद्रस्थानी ठेवून झाले. त्यामुळे ग्राहकाला या सर्वाची जाणीव असणे आवश्यक आहे. म्हणून ही लेखमाला सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न आहे.
मानवाव्यतिरिक्त सर्व प्राणी सृष्टिवर वा जेणेकरून पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांविषयी या लिखाणामध्ये चर्चा असेल. वस्त्रशास्त्राने पर्यावरणाच्या बाबतीत दाखवलेल्या संवेदनशीलतेची माहिती या सादरीकरणात असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा