आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या गोष्टींपकी प्राणवायू, धान्य आणि पाणी या गोष्टी निसर्गानं आपल्याला मुक्तहस्तानं दिल्या आहेत. त्यातल्या धान्य आणि पाण्यावर निसर्गाने आणि माणसाने अनेक प्रकारे प्रक्रिया करून त्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. याखेरीज निसर्ग काही वस्तूंवर स्वत:च प्रक्रिया करून त्याची काही वेगळीच रसायनं निर्माण करीत असतो. ताडाच्या झाडापासून मिळणारी ताडी किंवा माडापासून तयार होणारी माडी ही उदाहरणं घेता येतील.
माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडलं जातं. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे ‘माडी’. हा
मनमोराचा पिसारा: नैना लड जइ है
प्रेमात पडण्याचा क्षण सहसा नाजूक असतो. एखाद्या जलाशयाच्या शांत पृष्ठभागावर लहानसा खडा पडून तरंग उमटावे, तशी मनात नकळत स्पंदनं उमलतात. थोडी हुरहुर, थोडी आठवण, थोडी उत्सुकता आणि अचानक चेहऱ्यावर पसरणारं आत्ममग्न स्मित. सूक्ष्म दैहिक आणि मानसिक जाणिवेतून हळूच जाणवतं. कहीं मुझे इष्क तो नहीं हुआ उनसे? मग अधिकच अस्वस्थता, ही कोमल स्पंदनं दोन्ही बाजूला जाणवताहेत की मला. फक्त मलाच? करावं का प्रेम व्यक्त? करावा का इजहार मोहब्बत का?
या सर्व हळव्या भावनांना छेद देणारं आणि प्रेमात पडण्याच्या एहसासचा जल्लोष करणारं गाणं. खूप लोकप्रिय आहे तसं. जुनंच आणि अर्थातच मनमोहक.
श्रेय भोजपुरी भाषेतल्या गाण्याचे शब्द शकील बदायुनी यांचे. केवळ शब्दच नाहीत, तर प्रेमाचा नायकावर कसा परिणाम झालाय, इम्पॅक्ट झालाय यासाठी वापरलेल्या संकल्पनाही साध्यासुध्या आणि देहाती. प्रेमाचा फटाका उडून होणारा धमाका आणि ‘फांस लगी है तो करेजवामा खटक होईबे करी.’
जणू काही नायकाच्या धुंद तऱ्हेवाईक वागण्याचा नायिका आरोप करतेय आणि नायक आपल्या अस्वस्थ वृत्तीचं समर्थन करतोय आणि आत्मसमर्थन करताना, माझेही हाल होतायेत हे तो सांगायला विसरत नाहीये म्हणजे ‘होयी गवा सारा चौपट रुजगार..’
गाण्याची मांडणी लोकगीतासारखी आहे, पण त्यातली सगळी गंमत ते दृश्यरूपात पेश करण्यात आहे.
दिलीपकुमारच्या सर्वागसुंदर अभिनयाबद्दल काय बोलावं? पण या गाण्यात युसूफसाब असे काही नाचलेत की पाहात राहावं.
नायकाचा निरागसपणा, स्वत:च्या हक्काच्या जाणिवेने आलेला खमकेपणा तर दिसतोच, पण प्रेमात पडण्याची धुंदी, बेहोशी दिलीपकुमारच्या चेहऱ्यात यथातथ्य उमटते.
लोकनृत्यातल्या दिलीपकुमार किंवा कोरसच्या हालचालीत खरं पाहता कोणत्याच अवघड स्टेप्स नाहीत. अलीकडे शाळांच्या वार्षिक कार्यक्रमात याहून बोल्ड हालचाली असतात, पण या नाचातली प्रत्येक हालचाल आणि आविर्भाव बोलका आहे, उत्स्फूर्त आहे. कोणीही असंच नाचेल असं स्वाभाविकपणं वाटतं.
नौशादमियांचा तर उत्तर प्रदेशी लोकगीत मांडण्यात जबर हातखंडा.
गाणं म्हणजे शंभर टक्के मस्त, रिलॅक्स फीलिंग, कधीही पाहावं, ऐकता ऐकता मोराचे पाय आपोआप का थिरकतात. हे अनुभवता येईल. फक्त गाण्यात शेवटी ‘दिल ले गयी धोबनिया राजा कैसा जादू डाल के. धोबन का?’
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा