रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम आपण दात स्वच्छ करतो. दातांच्या फटींत व तोंडात इतरत्र अन्नाचे कण तसेच राहू दिले, तर लाळ व उष्णता यांमुळे ते कुजू लागतात. रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो. पिष्टमय आणि गोड पदार्थाचे तोंडात राहिलेले कण आणि तोंडातील बॅक्टेरिया यापासून लॅक्टिक आम्ल तयार  होते व त्याने दंतवल्कावर (एनॅमलावर) अनिष्ट परिणाम घडतो. एनॅमलमध्ये कॅल्शियम फॉस्फेट हे क्षार असतात. लॅक्टिक आम्लामुळे दातांवरील कॅल्शियम फॉस्फेटचे आवरण नाहीसे होते. यातूनच दात किडणे, हिरडय़ांतून रक्त किंवा पू येणे, तोंडाला व श्वासाला घाण वास येणे इ. व्याधी उद्भवतात. दात स्वच्छ करण्यासाठी फार पूर्वीपासून दंतमंजन वापरले जात असे. दात स्वच्छ करण्यासाठी दातांवर घासण्याकरिता बनविलेल्या मिश्रणास ‘दंतमंजन’ म्हणतात.
पूर्वी दात स्वच्छ करण्यासाठी कडुिनबांच्या काडय़ांचा वापर करत असतं. कडुिनब हे जंतुनाशक आहे. कडुिनबाव्यतिरिक्त खैर, करंज, अक्रोड  इ. तुरट चवीच्या झाडांच्या मृदू काडय़ा वापरत असतं. या झाडांच्या सालीत टॅनिन नावाचे जे द्रव्य असते त्याने हिरडय़ा आकसतात व कुंचल्यामुळे दातांच्या फटींतील अन्नकण निघून येतात. हिरडा, बेहेडा, आवळा (त्रिफळा चूर्ण) इत्यादींचे चूर्ण मधात मिसळून त्याने दात घासण्याची पद्धत होती. हिरडय़ांमध्ये गॅलिक आम्ल, चेबुलिनिक आम्ल, टॅनिक आम्ल असते. आवळ्यात अँसकॉर्बकि आम्ल आणि बेहडामधे चेबुलॅजिक, गॅलिक, ऑक्झ्ॉलिक आम्ल असतात. त्रिफळा चूर्णात तिन्ही फळांच्या एकत्रित रसायनांमुळे तोंडातील जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध होतो.
वनस्पतींशिवाय कोळसा आणि समुद्रफेस (एक प्राणिज औषधिद्रव्य) यांच्या चूर्णाचाही वापर दंतमंजन म्हणून पूर्वी केला जात असे. कोळसा, भाताचे तूस किंवा गोवऱ्या जाळून मिळणारी राख याचाही वापर केला जात असे. तंबाखू जाळून केलेली पूड (मशेरी) आजही वापरली जाते. तंबाखूत निकोटिन हे रसायन असते, ज्यामुळे रक्तदाब वाढणे यासारखे आजार होऊ शकतात, म्हणून ते न वापरणंच योग्य.

प्रबोधन पर्व ज्यांना आत्मिनदा रुचत नाही..
‘‘.. सुधारणा ही स्थिर वस्तु नाहीं; ती पुढें चालेल किंवा मागें सरेल! आमची सुधारणा क्षणक निश्चल होऊन मग तिची पीछेहाट होऊं लागली असावी असें मानिल्याखेरीज ज्यांस आम्ही रानटी म्हणत होतों तीं राष्ट्रें दोन हजार वर्षांच्या अवकाशांत आम्हांपुढें इतकीं कशीं गेलीं याचा उलगडा होत नाहीं. सुधाणेरच्या शर्यतींत जे एकदां आमच्या फार पाठीमागें होते, त्यांनीं आम्हांस गांठले इतकेंच नाहीं, तर पाठीमागें टाकलें, असें आपल्या स्थितीवरून कबूल करावें लागलें यांत आमच्या मतें प्रतिष्ठा मारण्यासारखें कांहीं नाहीं. म्हणे ‘दुसरे लोक रानटी होते तेव्हां आम्ही फार सुधारलेले होतों!’ असाल कदाचित्. पुन पुन गत गोष्टीबद्दल मिटक्या मारीत बसण्यांत काय अर्थ आहे? आम्हांस तर असल्या निरुपयोगी प्रतिष्ठेचा मनापासून कंटाळा येतो. असल्या प्रतिष्ठेमुळें स्वदोष दिसेनासे होतात इतकेंच नाहीं, तर आपण सर्वगुणसंपन्न आहों, आपणांस कशाचीही उणीव नाहीं, असें वाटूं लागून उद्योग करण्याची हौस नाहींशी होते, मानसिक व शारीरिक श्रमाचा तिरस्कार येऊं लागतो, नुसत्या बढाईखोर गप्पा मारीत बसण्यांत मोठा आनंद वाटतो, आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दारिद्रय़ाचा व आपत्तीचा परिहार करण्याचा विचार देखील मनांत येईनासा होतो! ’’
सामाजिक सुधारणांना समाज अनुकूल होण्यासाठी काय करावे लागेल, या संदर्भात आत्मटीकेचा मार्ग सांगताना ‘सुधारक’कार आगरकर म्हणतात, ‘‘जी गोष्ट उघडपणें बोलून न दाखविणें म्हणजे आजमितीस मोठा अपराध करणें असें आम्हांस वाटतें, ती बोलून टाकल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं, याला आमचा काय इलाज आहे? ज्या लोकांना आमची ही आत्मिनदा रुचत नाहीं, त्यांनीं आम्हांस आत्मस्तुति करण्यासारखें आम्हीं गेल्या दोन हजार वर्षांत काय केलें आहे हें दाखविण्याची कृपा करावी.’’

मनमोराचा पिसारा आहे तशी स्वीकार!
बस इथे माझ्यासमोर, बोलायचंय मला तुझ्याशी! तुला कधी वेळ नसतो. नुस्तं काम करायचं, जेवायचं, झोपायचं, नाही तर त्या वॉटसॅपवर न हसविणारे जोक्स वाचायचे. हे बघ, तू तुझ्या वेळेचं काय करायचं, ते तू ठरव, पण माझ्याकरिता तुला वेळ काढलाच पाहिजे. मला नाही आवडत, तुझं वागणं. तुला ना हे कोणीतरी सांगितलंच पाहिजे आणि मी सोडून कोणाचं ऐकशील असं वाटत नाही. बघ, घेतलास तो मोबाइल हातात. हा मोबाइल हातात आल्यापासनं तू सगळ्या गोष्टींकडे हाती असलेल्या खेळण्यासारखं पाहतोस. कधीही उचललं, टाइमपास केलास आणि दिलं टाकून. मला नाही आवडत माझ्याकडे असं टाइमपास म्हणून पाहिलेलं. तुला ना वाईट सवयी लागल्या आहेत. आम्ही लावल्या म्हण ना. म्हणजे मी नाही त्या येडपट, शेपूट हलव्या कुकूरनं.
तू कसाही वागलास तरी तो येतोच तुझ्याकडे मुंडी खाली घालून. जवळ बसायचं, पाय चाटायचे आणि ओशाळं हसायचं. मी तशी नाहीये आणि अपेक्षाच करू नकोस. मी माझ्या स्वभावानं वागते आणि जगते.
आम्ही दोघे सारखे नाही. कोणीही अगदी सारखं सारखं नसतं. अशी कोणीचीही कधी तुलना करायची नसते. अशा तुलनेमधून एकाला कमी दर्जा आणि दुसरा वरचढ ठरतो. अशी प्रेमाकरिता नाहक स्पर्धा आमच्यात लावू नकोस. सांगून ठेवते..
बोकीनं मला दमात घेऊन सांगितलं. मी जरा सर्दी-पडशानं त्रस्त होऊन आराम करीत होतो तेव्हा कुकूर आणि बोकी दोघेही मला कंपनी देत शेजारी बसून असायचे.
बोकी दुपारी डोळे मिटून गुर्र्र आवाज करीत डुलक्या काढायची, तर कुकूर थोडं अंतर राखून स्वस्थ असायचा. म्हणून मी त्याला जवळ घेऊन थोपटत असे. बोकी बिछान्याजवळ यायची नाही, पण अधूनमधून लक्ष ठेवून असायची. मी तिला कुरवाळलं नाही म्हणून बोकी रुसली असावी, असं वाटलं.
मी नाही रुसलेले, ती डोळे किलकिले करून म्हणाली, मी फार अंगचटी जात नाही, पण मी म्हटलं ना ते लक्षात ठेव हं. बोकीनं पाय लांब करून आळस दिला आणि म्हणाली.
हे बघ, तो कुकूर अनकंडिशनल प्रेम करतो ना म्हणून तुला आयतंच प्रेम मिळतं. तुला विनाअट प्रेम हवं असतं, पण तू करतोस का रे तसं प्रेम? विनाअट प्रेम वगैरे म्हणणं सोप्पंय, पण तसं प्रेम करणं कठीण आहे. तू अजून हा धडा शिकलेला नाहीस. माझ्यावर तू विनाअट प्रेम करणार आहेस की नाही सांग! हे बघ. इतकं काही इम्पॉसिबल नसतं, तसं निव्र्याज प्रेम. अरे, ज्याच्यावर प्रेम करायचं त्याला तो किंवा ती असेल तसं स्वीकारायचं. त्याच्या गुणदोषांसकट, त्याच्या स्वभावासकट! इतकं साधं आहे!! त्यासाठी दोन व्यक्तींची तुलना करण्याचं सोडून बघ..
बोकीनं पाठ उंच करून आळस दिला आणि म्हणाली, ‘बघ मी सारखी डुलक्या काढते.. तशीच राहणार.. होय. गं! बोके. कश्शी बोलते गं. माझी लाडकी माऊ. देअर इज रिअली नो वन लाइक यू.. बोकीनं खूश होऊन जांभई दिली आणि ताणून दिली. माझी लाडकी बोकी.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

Story img Loader