इ. स. १९३०मध्ये कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना व्यवहारापयोगी बहुवारिक बनविण्यामध्ये पहिले यश आले. त्यांनी पॉलीक्लोरोप्रीन हे बहुवारिक बनविले. ‘या बहुवारिकामध्ये रबरासारखे गुणधर्म होते. डय़ुप्रीन या नावाने ते बाजारात आले. १९३६ मध्ये ते निओप्रीन या नावाने प्रचलित झाले. हे जगातील पहिले संश्लेषित रबर आहे व आजही ते अतिशय प्रसिद्ध आहे.
१९३१ मध्ये कॅरोथर्स आणि हिल यांनी अमेरिकन केमिकल सोसायटीच्या परिसंवादामध्ये एक प्रबंध सादर केला ज्यामध्ये त्यांनी पॉलिस्टर बहुवारिकाचा महारेणू तयार केला असल्याचे आणि त्यापासून रेशमासारखे तंतू तयार केल्याचे प्रतिपादन केले, परंतु कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खूपच प्रयोग केले तरी त्यांना व्यवहारात उपयोग असा संश्लेषित तंतू तयार करता येऊ शकला नाही. प्रयोगादरम्यान जे तंतू तयार केले गेले ते एक तर कमी तापमानाला वितळत असत किंवा कुठल्या तरी क्षाराच्या द्रावणात विरघळत असत. त्यामुळे हे संशोधन १९३३ साली जवळजवळ पूर्णपणे थंडावले. हे सर्व संशोधन पॉलिस्टर बहुवारिकांवर चालले होते. या संशोधनादरम्यान त्यांनी अनेक प्रकारच्या सेंद्रिय आम्लाचा वापर करून पाहिला, पण यश आले नाही. दुर्दैवाने त्यांनी टेरिप्थालिक आम्ल वापरून पाहिले नाही. नाही तर नायलॉनऐवजी त्यांना पॉलिस्टर तंतूंचा शोध लागला असता, कारण पॉलिस्टर तंतू बनविताना टेरिप्थालिक आम्ल आणि डाय मिथाईल ग्लायकॉल यांच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये बनलेल्या ईस्टरच्या रेणूचा बहुवारिकच वापर केला जातो.
१९३० मध्ये एल्मर बोल्ट्न हा डय़ू पॉन्ट कंपनीचा संशोधन संचालक बनला आणि त्याने कॅरोथर्सला संशोधन पुढे सुरू करण्याबाबत प्रोत्साहन दिले. यामुळे कॅरोथर्सने संशोधन पुन्हा सुरू केले आणि त्याने आता नव्याने तंतूसाठी योग्य असे बहुवारिक तयार करण्यासाठी प्रयत्न चालू केले. पॉलिस्टर बहुवारिकाचे प्रयोग यशस्वी न झाल्यामुळे त्याने आता अमाइनो अॅसिडपासून बहुवारिक बनविण्यावर भर दिला. अमाइनो अॅसिडपासून बनविलेल्या या बहुवारिकास पॉली अमाइड असे म्हणतात.
संस्थानांची बखर: कपूरथाळ्याची शैक्षणिक प्रगती
कपूरथाळा संस्थानच्या शासकांनी अनेक शिक्षण संस्थांना आíथक मदत देऊन शिक्षणाला प्रोत्साहन दिले. कपूरथाळ्यातील नवाब जस्सासिंग अहलुवालिया गव्हर्मेट कॉलेजने २००६ साली आपल्या कार्याची १५० वष्रे पूर्ण केली. १८५६ साली रणधीर स्कूल या नावाने हे एक संस्कृत विद्यालय म्हणून स्थापन झाले. तत्कालीन महाराजा रणधीरसिंग यांच्या नावाने सुरू झालेले हे विद्यालय गुरू-शिष्य परंपरेने एका िपपळाच्या झाडाखाली भरत असे. १८७१ साली राजाश्रयाने छोटेखानी इमारत या विद्यालयाला मिळाल्यावर संस्कृतच्या जोडीला येथे उर्दू, पíशयन आणि इंग्लिश हे भाषाविषयांचे शिक्षण सुरू होऊन मॅट्रिक्युलेशनपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. पाठोपाठ महाविद्यालयीन शिक्षणही सुरू झाले आणि ही संस्था कलकत्ता विद्यापीठाला संलग्न करण्यात आली.१८८२ साली लाहोरात पंजाब विद्यापीठ स्थापन झाले. परंतु कपूरथाळ्याचे अहलुवालिया कॉलेज मात्र कलकत्ता विद्यापीठाला संलग्नच राहिले. या काळात महाराजा जगतजीतसिंग वयाने लहान असल्यामुळे व्हाइसरॉयने संस्थेचे प्रशासन तीन ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञांकडे सोपविले होते. या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली संस्थेच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला जाऊन विद्यार्थीसंख्या वाढली. १९०५ साली लॉर्ड कर्झनने संस्थेची सूत्रे हातात घेऊन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मनोहरलाल यांना प्राचार्यपदी नियुक्त केले. राज्यकर्ता जगतजीतसिंग आणि लॉर्ड कर्झनने येथे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून तज्ज्ञ अध्यापक आणि प्राचार्य मोठय़ा वेतनावर नियुक्त केले. १९१० साली येथे प्राचार्याचे वेतन ४०० रु. अधिक विशेष भत्ता १०० रु. तर इतर अध्यापकांचे वेतन २७५ रु. असे होते. त्या वेळी इतर खात्यांतील तत्सम पदांवरील अधिकाऱ्यांचे वेतन पुढीलप्रमाणे होते. सेशन जज- ४२५ रु., मॅजिस्ट्रेट- ३२५ रु. आणि जिल्हा पोलीस अधिकारी २५० रु. असे होते. संस्थानाची फाळणीपूर्व ६० टक्के लोकसंख्या मुस्लीम होती व त्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपकी ५० टक्के मुस्लीम होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com