फ्रान्समधल्या हवामानात सर्व ठिकाणी द्राक्षाची लागवड होते. पण त्यातल्या त्यात काही प्रांतांत द्राक्षाचं पीक गुणवत्तेच्या दृष्टीनं अधिक चांगलं होतं. बोर्दो, शाब्ली, र्बगडी, श्ॉंपेन या परगण्यातली द्राक्षे वाइन करण्यासाठी उत्तम असतात. त्याच्यातल्या टॅनिन, अॅसिड, शर्करा या घटकांचं नसíगक संतुलन योग्य प्रमाणात असल्यानं त्यांपासून होणारी वाइन दर्जेदार होते आणि मुख्य म्हणजे त्या त्या प्रांताच्या हवा-मातीचे गुण घेऊन येते. या परगण्यातनं मोठय़ा प्रमाणात वाइन बनवली जाते. मग ज्या परगण्यातली द्राक्षं असतील, त्या परगण्याचं नाव त्या ठिकाणी बनलेल्या वाइनच्या जातीला दिलं जातं. त्या त्या परगण्यातली वाइन आपापल्या द्राक्षांच्या वैशिष्टय़ांसह वेगळीच पांढरी वाइन आणि लाल वाइन असेही प्रकार आहेत.
याखेरीज काही वाइनचे प्रकार आहेत. ते म्हणजे, इतर फळांपासून बनवलेल्या वाइन. चेरी, एल्डरबरी, सफरचंद, पीच अशा निरनिराळ्या फळांपासून शिवाय मधापासून वाइन बनवल्या जातात. त्या वाइनला अपरिहार्यपणे त्या त्या फळांचा स्वाद येतो. त्या वाइन त्या त्या फळांच्या नावाने संबोधल्या जातात. जसं चेरी वाइन, एल्डरबरी वाइन आणि सफरचंदाच्या वाइनला सायडर तर मधापासून बनवलेल्या वाइनला मीड’ म्हणतात. ज्यावेळी वाइन म्हटलं जातं तेव्हा ती द्राक्षाचीच वाइन असते, फक्त त्याला रेस, व्हाईट ही विशेषणं लावतात. तसंच तिच्या चवीप्रमाणे गोड, निमगोड, अगदी अगोड असे प्रकार असतात. इंग्रजीत स्वीट आणि ड्राय असं म्हणतात. ड्राय म्हणजे ज्यात अजिबात शर्करा उरली नसलेली वाइन.
फळांनुसार वाइनचा स्वाद व घटक बदलात, पण यातील इथिल अल्कोहोलचं प्रमाण ८ ते १७ टक्क्यांपर्यंत असत. त्यामुळे उत्पादनाचे ठिकाण, द्राक्षे अथवा इतर फळे, यांच्या जाती, उत्पादनाची पद्धत, रंग, स्वाद, चव व अल्कोहोलचे प्रमाण यांवरून बाजारातील वाइनचे प्रकार ठरवले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा