या साच्यामध्ये पेळू खेचून त्याची जाडी कमी करण्यासाठी एकावर एक अशा रुळांच्या चार जोडय़ा एकापुढे एक अशा बसविलेल्या असतात. या चार रुळांच्या जोडय़ांची गती मागून पुढे अशी वाढत जाते. पेळू सर्वात मागच्या जोडीमध्ये घातला जातो आणि यामुळे प्रत्येक पेळूची जाडी जसजसा पेळू पुढे जाईल तसतशी कमी होत जाते. शेवटी सर्वात पुढच्या रूळ जोडीतून पेळू जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याची जाडी कातल्या जाणाऱ्या सुताला लागेल तेवढी कमी झालेली असते. सलगच्या दोन रुळांच्या जोडीमध्ये जे अंतर असते ते तंतूंच्या लांबीपेक्षा थोडेसे जास्त असते. यामुळे एक तंतू एकाच वेळी दोन्ही रुळांनी पकडला जात नाही व तो तुटण्याची शक्यता नसते. या रुळांच्या जोडीमधले वरचे रूळ कातडय़ाने आच्छादित केलेले असतात, त्यामुळे रुळांच्या जोडीमध्ये तंतू घट्टपणे पकडले जातात.  तळाचे म्हणजे खालच्या बाजूचे रूळ लाकडी किंवा धातूचे असतात. तंतू व्यवस्थितपणे पकडले जावेत यासाठी वरील रुळावर वजन ठेवून दोन्ही रुळांमध्ये पुरेसा दाब निर्माण केला जातो. या रुळांना खेच रूळ (ड्राफ्टिंग रोलर्स) असे संबोधले जाते.
खेच रुळांमधून बाहेर पडणारा छेडा (स्ट्रॅंड) पुढे पंखाच्या चात्यामधून बॉबिनवर गुंडाळला जातो. चाते फिरविले असता सुतास पीळ बसतो आणि त्याचवेळी हे तयार झालेले सूत बॉबिनवर गुंडाळले जाते. सर्व चात्या त्यांच्यावर बसवलेल्या कप्प्यावरून एक सामाईक पट्टा टाकून मोठय़ा चक्राच्या सहाय्याने फिरवल्या जात. ह्य़ा साच्यामध्ये अनेक चाती होती आणि त्यामुळे हा साचा माणसाने चालविणे अशक्य होते. आर्कराइटने यासाठी सुरुवातीला घोडय़ांचा वापर करून पाहिला पण ते आíथकदृष्टय़ा किफायतशीर झाले नाही. म्हणून त्याने पाण्याच्या सहाय्याने साचा फिरविला जाईल अशी योजना केली. यामध्ये जसे पाण्यापासून वीज निर्मितीमध्ये जनित्र फिरविले जाते तशी योजना केली होती. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारची शक्ती वापरून पाहून त्यामधून व्यावहारिकदृष्टय़ा योग्य आणि आíथकदृष्टय़ा किफायतशीर पद्धत अंतिमत: स्वीकारली. या यंत्रात सुताच्या पीळ देण्याच्या पद्धतीत कोणताच बदल केला गेला नव्हता.

संस्थानांची बखर: सर्वधर्मीय ‘बार भायातनी जमात’
कच्छचे महाराव लखपतजी यांची कारकीर्द इ.स.१७४१ ते १७६१ अशी झाली. त्याच्या कारकीर्दीत राज्य संपन्न बनले. त्याने पाडलेली कच्छची चलनी नाणी ‘कच्छ कोरी,’ ब्रिटिशराजच्या अस्तापर्यंत वापरली जात होती.
लखपतजी यांचा वारस मिर्झा राजा राव रायधनजी तृतीय याची कारकीर्द (इ.स.१७७८ ते १७८६) कच्छ संस्थानाच्या इतिहासात खळबळजनक झाली. राज्यारोहण केल्यावर थोडय़ाच दिवसांनी रायधनजी तृतीयला वेडाचे झटके येणे सुरू झाले. त्यातून त्याच्यात धार्मिक विक्षिप्तपणा येऊन येताजाता इस्लाम धर्माचा प्रचार करू लागला. स्वत मुस्लीम फकीर होण्याचा ध्यास घेऊन िहदूंवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सक्ती करू लागला. त्याच्या सक्तीमुळे शेकडो िहदूंनी इस्लाममध्ये धर्मातरही केले. या गोष्टी इतक्या थराला पोहोचल्या की, कच्छ संस्थानभर राजाविरुद्ध आंदोलन उभे राहिले. अंजर येथील मेघजी सेठ याच्या नेतृत्वाखाली इतर नागरिकांबरोबर राज्याच्या फौजेतील सेनाधिकारी फतेह मोहमद आणि दोसालवेन हेही धर्मातराच्या विरोधात उभे राहिले. तरीही रायधनचा विक्षिप्तपणा कमी न झाल्याने त्याला पदच्युत करून कैदेत ठेवले गेले.
राव रायधनजीला नामधारी राजेपदावर ठेऊनी मेघजी सेठने बारा जणांचे कार्यकारी मंडळ नियुक्त करून त्यांनी राज्य प्रशासन सांभाळले. या कार्यकारी मंडळाला ‘बार भायात नी जमात’ असे नाव होते. जसे पेशवाईत काही काळ नाना फडणवीसांचे ‘बारभाई’ होते, तसेच हे.. परंतु यांचा कारभार २७ वर्षे चालला.
 या बार भायातमध्ये जडेजा राजघराण्याचे तीन सदस्य, िहदू व जैन समाजातील तीन धनिक व्यावसायिक, मुस्लीम समाजाचे तीन सदस्य, मियाँ समाजाचा एक, गारा सदरचा एक आणि एक सदस्य राज्य सन्य विभागातला अशी विभागणी होती.  इ.स.१७८६ ते १८१३ या काळात कच्छचा कारभार सर्वधर्मीय स्वरूपाच्या या बार भायातनेच जमादार फतेह मोहम्मदच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रशासन देऊन पार पाडला.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com
 

Story img Loader