या साच्यामध्ये पेळू खेचून त्याची जाडी कमी करण्यासाठी एकावर एक अशा रुळांच्या चार जोडय़ा एकापुढे एक अशा बसविलेल्या असतात. या चार रुळांच्या जोडय़ांची गती मागून पुढे अशी वाढत जाते. पेळू सर्वात मागच्या जोडीमध्ये घातला जातो आणि यामुळे प्रत्येक पेळूची जाडी जसजसा पेळू पुढे जाईल तसतशी कमी होत जाते. शेवटी सर्वात पुढच्या रूळ जोडीतून पेळू जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याची जाडी कातल्या जाणाऱ्या सुताला लागेल तेवढी कमी झालेली असते. सलगच्या दोन रुळांच्या जोडीमध्ये जे अंतर असते ते तंतूंच्या लांबीपेक्षा थोडेसे जास्त असते. यामुळे एक तंतू एकाच वेळी दोन्ही रुळांनी पकडला जात नाही व तो तुटण्याची शक्यता नसते. या रुळांच्या जोडीमधले वरचे रूळ कातडय़ाने आच्छादित केलेले असतात, त्यामुळे रुळांच्या जोडीमध्ये तंतू घट्टपणे पकडले जातात. तळाचे म्हणजे खालच्या बाजूचे रूळ लाकडी किंवा धातूचे असतात. तंतू व्यवस्थितपणे पकडले जावेत यासाठी वरील रुळावर वजन ठेवून दोन्ही रुळांमध्ये पुरेसा दाब निर्माण केला जातो. या रुळांना खेच रूळ (ड्राफ्टिंग रोलर्स) असे संबोधले जाते.
खेच रुळांमधून बाहेर पडणारा छेडा (स्ट्रॅंड) पुढे पंखाच्या चात्यामधून बॉबिनवर गुंडाळला जातो. चाते फिरविले असता सुतास पीळ बसतो आणि त्याचवेळी हे तयार झालेले सूत बॉबिनवर गुंडाळले जाते. सर्व चात्या त्यांच्यावर बसवलेल्या कप्प्यावरून एक सामाईक पट्टा टाकून मोठय़ा चक्राच्या सहाय्याने फिरवल्या जात. ह्य़ा साच्यामध्ये अनेक चाती होती आणि त्यामुळे हा साचा माणसाने चालविणे अशक्य होते. आर्कराइटने यासाठी सुरुवातीला घोडय़ांचा वापर करून पाहिला पण ते आíथकदृष्टय़ा किफायतशीर झाले नाही. म्हणून त्याने पाण्याच्या सहाय्याने साचा फिरविला जाईल अशी योजना केली. यामध्ये जसे पाण्यापासून वीज निर्मितीमध्ये जनित्र फिरविले जाते तशी योजना केली होती. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारची शक्ती वापरून पाहून त्यामधून व्यावहारिकदृष्टय़ा योग्य आणि आíथकदृष्टय़ा किफायतशीर पद्धत अंतिमत: स्वीकारली. या यंत्रात सुताच्या पीळ देण्याच्या पद्धतीत कोणताच बदल केला गेला नव्हता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा