पाणी मिळण्याचा नसíगक स्रोत म्हणजे पाऊस. पावसाचे पाणी खाली पडताना हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइड, अमोनिया, इ. वायू शोषून घेते. जमिनीशी संपर्क आल्यावर चुनखडी, मॅग्नेशिअम, लोह, इ. क्षार पाण्यात विरघळतात आणि ते पाणी जड होते. जितका जमिनीशी संपर्क अधिक तेवढे पाण्याचे जडत्व जास्त असे लक्षात येते. म्हणूनच नदीच्या पाण्यापेक्षा साध्या विहिरीचे पाणी जड असते. तर साध्या विहिरीपेक्षा िवधण विहिरीचे (बोअरवेल) पाणी आणखी जड असते. या पाण्याला दुष्फेन पाणी असे संबोधले जाते.
हे पाणी कापडाच्या प्रक्रियेत वापरण्यास सोयीचे नसते. रासायनिक प्रक्रियेसाठी पाण्याची वाफ पुरवणाऱ्या बॉयलरमध्ये अशा पाण्याचा वापर केल्यास बॉयलरच्या टय़ूबवर क्षारांचे थर जमा होतात; त्यामुळे बॉयलरची कार्यक्षमता खूपच घटते. त्यामुळे हे पाणी मृदू करणे आवश्यक असते. त्या पाण्याला सुफेन पाणी असे संबोधले जाते.
जड पाण्याचा वापर करून प्रक्रिया केल्यास कापडावर सौम्य डाग पडतात. रंगाई झाल्यावर ते उठून दिसतात. रंगाईची प्रक्रिया आवश्यक तेवढी परिणामकारक होत नाही. कापडाच्या धुलाईमध्ये कमीपणा राहतो. प्रक्रिया करूनसुद्धा कापड आवश्यक तेवढे पांढरे शुभ्र होत नाही. पाण्याचा जडपणा कॅल्शिअम किंवा मॅग्नेशिअम यांच्या क्लोराइड्स/ सल्फेट/ बायकाबरेनेट यांच्यामुळे असतो.
कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम बायकाबरेनेटमुळे येणारा पाण्याचा जडपणा पाणी नुसते उकळून घालवता येतो. उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे लागते. उकळण्याऐवजी चुन्याची निवळी आणि सोडा अॅशचा वापर करूनही उपरोक्त जड पाणी हलक्या पाण्यात रूपांतरित करता येते. पाण्याचा जडपणा कायमस्वरूपी घालवण्यासाठी आयन आदान-प्रदानची पद्धत वापरली जाते. पाण्यातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि लोह यांच्याबरोबर सोडिअम झिओलाइटची रासायनिक क्रिया घडवून आणतात. त्यामुळे जे झिओलाइट तयार होते ते पाण्यातून वेगळे काढले जाते. सोडिअमचे क्षार पाण्यात विद्राव्य असतात, त्यामुळे पाणी जड होत नाही.
अशा आणखीही काही पद्धतींचा वापर केला जातो. पण जड पाणी (दुष्फेन पाणी) हलके (सुफेन पाणी) केले तरच ते कापडावरील रासायनिक प्रक्रियेसाठी योग्य ठरते. असे पाणी मुंबई महानगरपालिकेकडून पूर्वीपासून पुरवले जात आहे. त्यामुळे मुंबईतील गिरण्यांत हा जास्तीचा खर्च येत नव्हता.
प्रबोधन पर्व: अशोक दा. रानडे – मर्मज्ञ संगीत समीक्षक
अशोक दा. रानडे (१९३७-२०११) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे संशोधक, वक्ता, लेखक, शिक्षक, प्रशासक असे अनेक पैलू होते. शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत, चित्रपटसंगीत, लोकसंगीत, पौर्वात्य-पाश्चात्त्य संगीत, नाटय़संगीत, लोककला या विषयांचा त्यांचा विचक्षण आणि गाढा अभ्यास होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे पहिले संचालक, अर्काईव्हज अॅण्ड रिसर्च सेंटर इन एथ्नोम्युझिकॉलजीचे पहिले साहाय्यक संचालकआणि एनसीपीएच्या ‘थिएटर अॅण्ड एथ्नोम्युझिकॉलजी’चे कार्यकारी म्हणून त्यांनी काम केले. देश-विदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये संगीताचे अध्यापन केले.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर त्यांच्याविषयी लिहितात – ‘‘रानडय़ांची शिस्त, अभ्यासातील सातत्य, आपल्या संशोधनाविषयी निष्ठा आणि प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्याकडे असलेला त्यांचा कल या गुणांबद्दल त्यांचा हेवाच वाटावा. उगीच चूष म्हणून रानडे कोणताच विषय वाचत नसत. अभ्यासासाठी वाचन, हे त्यांचे उद्दिष्ट असे. दिशाहीन असणे विचारी रानडे यांच्या बाबतीत असंभव होते.’’
रानडे यांनी ‘संगीताचे सौंदर्यशास्त्र’, ‘स्टॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र’, ‘लोकसंगीतशास्त्र’, ‘भाषणरंग’, ‘भाषण व नाटय़विषयक विचार’, ‘संगीत विचार’, ‘हिंदी चित्रपटगीत’, ‘मला भावलेले संगीतकार’ आणि ‘संगीत संगती’ या मराठीतील नऊ पुस्तकांसोबत इंग्रजीत चौदा पुस्तकांचे लेखन केले. त्याविषयी प्रसिद्ध हार्मोनियमवादक चैतन्य कुंटे म्हणतात – ‘‘मराठीतल्या आस्वादक संगीतसमीक्षेचा पाया गोविंदराव टेंबे यांनी घातला व त्याला वामनराव देशपांडे यांनी खतपाणी घातले, तर विश्लेषणात्मक संगीतसमीक्षेचे अध्वर्यू होते केशवराव भोळे आणि त्यांचा वारसा डॉ. रानडे यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेला.. विश्लेषणाच्या अनेक दिशा त्यांनी मोकळ्या केल्या, विश्लेषणाचे अनेक प्रकार हाताळले.. त्यातून संगीतशास्त्राची आणि समीक्षेची त्यांची अशी वेगळी परिभाषा बनली.’’ रानडे यांनी ‘शोनार बांगला’, ‘देवाजीने करुणा केली’, ‘एक झुंज वाऱ्याची’ या नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा