भिंत असो की मोटार गाडी, कागद असो की कापड पांढऱ्यापेक्षा इतर रंगच आपण पसंत करतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. (पांढरा रंग आवडणारी माणसे आहेतच, पण इतर रंग आवडणाऱ्याचे प्रमाण खचितच अधिक असेल.) डोळ्यांना सुखकारक, दिसायला आकर्षक एकमेकांना शोभून दिसणारे जोडीचे रंग, इत्यादी सगळ्या गोष्टी आहेतच. पण त्याचबरोबर त्या त्या वस्तूंची- इमारतीची, मोटारीची आणि कापडाची, सुरक्षितता आणि टिकाऊपणा वाढवणे, हाही एक रंग लावण्याचा उद्देश आहेच. मग अगदी गुहेतील चित्रांना दिलेले रंग असतील तरी त्याचा आस्वाद शतकानुशतके घेण्याची आस आपण बाळगत असू. तर तिथेही त्या चित्रांचा टिकाऊपणा महत्त्वाचा ठरतो, हे सत्य पूर्वीपासून मानवाला ज्ञात आहे.
िभतीला रंग देणे म्हणजे रंगद्रव्यांचे पाण्यातील किंवा तेलातील मिश्रण ठरावीक पद्धतीने भिंतीवर लावणे. यामुळे एक प्रकारचा लेप आपण त्या िभतीवर लावतो. लेड काबरेनेटचे जवसाच्या तेलातील मिश्रण हा या रंगातील सर्वात जुना ज्ञात प्रकार. नंतर व्हाíनशमध्ये वेगवेगळी रंगद्रव्ये घालून त्याचा लेप देण्याची पद्धत वापरली जाऊ लागली. त्या रंगाला ‘एनॅमल’ या नावाने ओळखले जाते. यानंतर वनस्पतीजन्य रसायने आणि ती विरघळणारे द्रवरूप माध्यम यांचा वापर सुरू झाला. या रंगांना ‘लॅकर’ या नावाने संबोधले जाते. सुरुवातीला रंग खर्चीक असत. जसजशी विविध क्षेत्रात प्रगती होऊ लागली, तसतशी रंगाच्या क्षेत्रातही बदल घडत गेले. औद्योगिक क्रांतीनंतर धातूच्या यंत्राला रंग देण्याची गरज निर्माण झाली. सुरुवातीला ठरावीक कालावधीनंतर यंत्रे पुन्हा रंगवली जात. नंतर गंजाला प्रतिबंध करणाऱ्यास रंगाची निर्मिती झाली. यंत्राबरोबर बोटीच्या पाण्यात बुडालेल्या भागाला या रंगाचे आवरण दिले जाऊ लागले.
लवकर वाळणारे, लवकर विरघळणारे, वासरहित, पाण्याने पृष्ठभाग धुतला तरी खराब न होणारे असे रंग विविध रंगछटामध्ये उपलब्ध होऊ लागले. तसेच िभतीच्या गरजा वेगळ्या, धातूच्या गरजा वेगळ्या, लाकडाच्या गरजा वेगळ्या, प्लास्टिक किंवा मानवनिर्मित तंतूच्या गरजा या वेगळ्या असतात. या सर्व गरजा भागवणारे, वेगवेगळ्या रसायनांचा वापर करणारे रंग आता तयार होतात. एकूण रसायन उद्योगात रंग उद्योगाचे एक विशेष स्थान आहे.

मनमोराचा पिसारा: मैं तो हर मोड पर..
गाणं तसं खूप प्रसिद्ध नाही, कदाचित बेस्ट ऑफ मुकेशच्या यादीत नसावं, ‘हमेशा जवां गीत’मध्ये लोकाग्रहास्तव म्हटलंही जात नसावं.. हो, पण त्याने काय फरक पडतो? या गाण्याची, त्यातल्या शब्दांची, लयीची खूपदा आठवण येते. काही सूर असे असतात की, आपल्या अतीतमधल्या काही दर्दभऱ्या आठवणी, कुछ जख्म ताज्या करतात.
आपलं स्वत:चं दु:ख कुरवाळत बसावं असं वाटतं. उगीचच, आत्मसमर्थन करावं. आपल्या प्रामाणिक (कदाचित एकतर्फी) प्रेमाची कहाणी स्वत:ला सांगत बसावं, असं वाटतं.
खूप आर्तपणे मन हाक मारतं स्वत:ला, मग जाणवतं आपण स्वत:ला मारलेली हाक हा प्रतिध्वनी होता. आपण आपल्या ‘सोलमेट’ला आवाज देत होतो. आपली नजर जमान्याच्या नि जगाच्या पसाऱ्यात ते दोन डोळे शोधत होती. त्या डोळ्यांची नजरभेट झाली आणि वाटलं, हेच ते आपल्या मनाशी आणि आत्म्याशी थेट संवाद करणारे डोळे. हीच नजर शोधत होतो, हमकदम, हमनवाज शोधत होतो..
त्या आतल्या आवाजाला प्रत्युत्तर मिळेल का? प्रेमाचा स्वीकार म्हणून ती पलकें झुकतील का? आणि मिटलेल्या पापण्या उघडताना इकरार की झलकी त्यात गवसेल ना?
असे अनुभव, मनाला चुभणारे, मनात आशा पल्लवीत करणारे, काही गाण्यांनी जागे होतात. गाण्यातल्या नायकाला सारे त्याच्या मोहबत्तीला दीवानगी म्हणतात. पलीकडून होकार येण्यापूर्वीच तू आपलं प्रेम देऊन बसलास; आता तुझा मार्ग काटय़ांचा! यावर तो खुशीनं म्हणतो, अरे, मी नाही विचार करीत डोक्यानं, मला कळते हृदयाची भाषा. मी सर्वस्व अर्पण करायला तयार आहे, मला आता कोणी रोखू शकत नाही.. काही क्षण मात्र तो थांबतो, मनात शंकेची पाल चुकचुकते नि म्हणतो, मी मोठय़ा आकांक्षेनं स्वप्नं पाहातोय, या आशेवर की ही स्वप्नं भंगणार नाहीत..
गाणं इथे संपतं आणि संथ लयीतलं त्याच मुखडय़ामधलं तेच गाणं पुन्हा सुरू होतं.
ते स्वप्न तुटलंय, आता जाणवतंय की, नाही मिळाली तुझी साथ, जुळले नाहीत सूर, तुझ्या घनदाट केशकलापाची ना सावली लाभली, ना तुझ्या कोमल हातांचा सहारा.
वाटलं होतं, तुझ्या पदरानं माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू टिपशील.. नाही जुळलं ते नातं. पण सखये.
मी हाक देत होतो, पदोपदी, वळणावळणावर मी तुलाच शोधत होतो. नाही ऐकलीस माझी हाक, पण मी मात्र तुझ्याच नावानं पुकारा करीत होतो.
किती मधुर गाणं, खूप खूप भिनतं मनात.. शब्द : नक्क्षलायलपुरी, संगीतकार सपन जगमोहन, चित्रपट चेतना. कलाकार : अनिल धवन, रेहाना सुलतान. १९७०  गाण्याची आशादायी आणि निराश अशी व्हर्शन आहेत.
मैं तो हर मोड पर तुझको दूंगा सदा
मेरी आवाज को दर्दके साज को, तू सुने ना सुने
मुझे देखकर कह रहे हैं सभी, मोहब्बत का हासिल है  दीवानगी
प्यार की राह में फूल भी थे मगर मैंने काटे चुने
जहाँ दिल झुका था, वहींसर झुका
मुझे कोई सजदोंसें रोकेगा क्या
काश टूटे ना वो, आरजूने मेरी ख्वाब जो हैं बुने
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
        
प्रबोधन पर्व: नरेंद्र दाभोलकर – प्रबोधनाचा कृतिशील वारसदार
नरेंद्र दाभोलकर (१९४५-२०१३) यांनी सुरुवातीला काही काळ श्याम मानव यांच्याबरोबर काम केल्यानंतर १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. या संघटनेची वैचारिक भूमिका आणि कार्यपद्धतीची चतु:सूत्री होती- १) शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, २) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, ३) कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि ४) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. या भूमिकेशी ठाम राहत समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा या विषयी प्रबोधन केले. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक राज्य सरकारने संमत करावे यासाठी गेली काही वर्षे ते सातत्याने प्रयत्नशील होते. महाराष्ट्रातील ३०० शाखांद्वारे ३० हजारांहून अधिक शिक्षक-कार्यकर्ते या संघटनेशी जोडलेले आहेत. दाभोलकरांविषयी मोहन धारिया म्हणतात- ‘‘आपले ध्येय गाठताना येणारे अडथळे, छोटे-मोठे अपयश व संकटाने कधी खचून जायचे नाही हा महत्त्वाचा गुण डॉ. दाभोलकर यांच्यामध्ये त्यांच्यातील खेळाडू वृत्तीमुळेच भिनला असावा..डॉ. दाभोलकर कृतिशील होते, प्रयोगशील होते. ते जी काही स्वप्ने पाहत असत, त्यासाठी कोणत्या दिशेने जावे हे मनाशी ठरवत, त्याविषयी चर्चा करत आणि आणि आपली पावले टाकत असत.’’
१९९८ मध्ये साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या साप्ताहिकाच्या संपादकपदाची धुरा दाभोलकरांवर सोपवण्यात आली. या साप्ताहिकाचा गुणात्मक व संख्यात्मक विकास करण्याचेही काम त्यांनी पुढील काळात कौशल्याने केले. लढाऊ संघटना आणि वैचारिक साप्ताहिक या दोन्हींचे नेतृत्व त्यांनी कौशल्याने पेलले. अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणतात – ‘‘ज्याच्याकडे द्रष्टेपणा आहे..वर्तमानासोबतच भविष्याचा वेध घेण्याची..त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता आहे..आणि परिस्थितीबद्दल काही उपाय सांगण्याची शक्यता आहे, असा माणूस मला विचारवंत वाटतो. डॉक्टर त्या अर्थाने एक विचारवंतच तर होते.’’ कृतिशील प्रबोधन करत, सनदशीर मार्गाने आंदोलने करत आणि अहिंसात्मक पद्धतीने चळवळी करत दाभोलकर यांनी समाजप्रबोधन करण्याचे काम केले.

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल