जनावरांची दूध उत्पादनक्षमता व प्रजननक्षमता वाढवण्यासाठी त्यांची लहानपणापासूनच योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. जातिवंत वासरे स्वत:च पाळून व त्यांची योग्य निगा राखून वाढ केल्यास आपणांस उत्तम प्रतीची जनावरे कमी खर्चात घरच्या घरी उपलब्ध होतात. शुद्ध किंवा संकरित वासरांची जोपासना व संगोपन शास्त्रीय पद्धतीने केल्यास ती वयाच्या २६ ते २७ महिन्यांत दूध देण्यास सुरुवात करतात.
वासरू जन्मल्यावर त्याची पुढील नोंद ठेवण्यासाठी त्याच्यावर ओळख खूण असणे आवश्यक आहे. त्यासाठी वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तीन-चार दिवसांतच टॅटूईग यंत्रा (गोंदवण्याचे यंत्र)च्या सहाय्याने वासराच्या डाव्या कानाच्या आतील मऊ भागावर क्रमांक द्यावा.
वासरांची शिंगे जर आपण वाढू दिली, तर पुढे त्यापासून इतर जनावरांना व माणसांना उपद्रव होण्याची भीती असते. म्हणून वासराच्या िशगकळ्या जाळाव्यात. रासायनिक प्रक्रिया करून वासरांची शिंगे लहानपणीच नाहीशी करावीत. यालाच ‘शिंगे खुडणे’ असे म्हणतात. यासाठी सर्वप्रथम वासराच्या शिंगाच्या गाठीभोवती व्हॅसलिनचा जाड गोल लेप लावावा. त्यामुळे आपण जे रासायनिक द्रव्य वापरतो ते वासराच्या डोळ्यात जात नाही. रासायनिक प्रक्रियेसाठी कॉस्टिक पोटॅशची कांडी पाण्यात भिजवून वासराच्या शिंगाच्या गाठीवर फिरवून घासावी. शिंगाची गाठ लालसर होईपर्यंत तिच्यावर कांडी घासावी. ही कांडी हातात धरताना हाताला इजा होऊ नये म्हणून कांडीभोवती कापसाचे वेष्टन घालावे. अशीच क्रिया दुसऱ्या गाठीवरही करावी. यानंतर ३-४ दिवसांत वासरांच्या शिंगाच्या गाठी गळून पडतात व वासरांची िशगे नाहीशी होतात.
वासरू ओळखण्यासाठी कानातील बाळ्या, कानातील खुणा, कानात क्रमांक अथवा चौकाखाली मांडीवर क्रमांक तापलेल्या लोखंडाने अगर शाईने मारावा. कानाच्या आतल्या मऊ भागावर लहानपणी क्रमांक गोंदवणे व मोठेपणी कानात क्रमांक बसवणे या सध्या प्रचलित व सोयीच्या पद्धती आहेत.
वॉर अँड पीस स्किझोफ्रेनिया : आयुर्वेदीय उपचार भाग ३
माझ्या ४० वर्षांवरील वैद्यकीय व्यवसायात या रोगाने पछाडलेले खूप रुग्ण बघण्याची व उपचार करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक रुग्ण मला काही नवीन अनुभव देतो. रुग्णाच्या व नातेवाईकांच्या कथांमुळे मला नेहमीच विचार करायला खाद्य मिळत गेले आहे. इथे अगदी लहानपणची एक आठवण मला अजूनही खूप त्रस्त करते. पं. बाळूकाका भिडे नावाचे एक वैदिक ब्राह्मण आमच्या घरच्या महिलांच्या सणवार पूजांकरिता योगदान द्यायचे. ते स्वभावाने अत्यंत कडक. वयाच्या ऐंशी वर्षांपर्यंत त्यांनी समर्थपणे वैदिक ब्राह्मण म्हणून उत्तम काम केले. त्यानंतर एकाएकी ते वेडय़ासारखे करायला लागले. धोतर सोडून रस्त्यावर पळायला लागले. मुलगा डॉ. विद्याधरशास्त्री भिडे, संस्कृतज्ञ व सुविद्य सून दोघेही कंटाळायचे; शास्त्रीबुवांना घरात दोराने बांधून ठेवायचे. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी काही औषधे दिली. थोडा फार लाभ झाला पण रोग पूर्णपणे बरा झाला नाही.
हा आजार कोणालाही, कोणत्याही वयात, कोणत्याही व्यावसायिकाला होऊ शकतो. अलीकडे लहान बालकांच्यात हा आजार जास्त आढळतो. या रोगाची भास, भ्रम, अकारण रडणे, ओरडणे, आक्रमकता, हाणामारी आढळल्याबरोबर तत्काळ इलाज करावे. या पेशंटला विश्वासात घेऊन सायंकाळी लवकर व कमी जेवावयास सांगावे. जेवणानंतर फिरावयास न्यावे. सकाळी लवकर उठून पालकांनी सूर्यनमस्कार घालावे, दीर्घश्वसन, प्राणायाम करावा व तसेच मुलांकडून करून घ्यावे. नाकामध्ये चांगले तूप किंवा अणुतेलाचे नस्य करावे. रात्री झोपताना शतधौतघृत, चांगले तूप, घरी केलेले नारीकेल तेल वा एरंडेल तेल डोक्याला जिरवावे. लघुसूतशेखर तीन, ब्राह्मीवटी सहा दोन वेळा जेवणाअगोदर; सारस्वतारिष्ट जेवणानंतर, निद्राकरवटी रात्री सहा अशी सामान्य उपाययोजना करावी. पांडुता असल्यास चंद्रप्रभा, शंृग, सुवर्णमाक्षिकादिवटी प्र. ३ दोन वेळा घ्यावा. गर्भवती व बाळंतीण स्त्रियांनी शतावरी घृत, कल्प, चूर्णाची लापशी यांचा सहारा घ्यावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. पशुपक्ष्यांची ज्ञानेश्वरी ४
मी युद्ध केले तर पाप घडेल, या मतावर अर्जुन ठाम आहे. पुढे श्रीकृष्ण त्याला ‘‘काडीची अक्कल नाही आणि तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारतोस,’’ असे सुनावणार आहे, पण त्याआधी तो अर्जुनाला ढील देत देत बोलू देतो. माणसे मेल्यावर आपल्यात पिंड ठेवण्याची पद्धत आहे. जर मेलेल्यांच्या मनात काही राहून गेले असेल तर कावळा पिंडाला शिवत नाही, अशी कल्पना आहे. नेहमी ‘‘हे घाणेरडे कावळे,’’ असे म्हणणारे त्या वेळी कावळ्याची वाट बघतात. तो श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा भाग बाजूला ठेवू, पण अजून खालच्या इयत्तेत अर्जुन त्या कावळ्याच्या प्रतिमेशी घट्ट आहे. ओवी म्हणते-
जैसे चोहाटाचिये बळी। पाविजे सैरा काउळी।
तैसी महापापे कुळी। प्रवेशिती।।
ओवी अर्जुनाच्या तोंडी आहे. चव्हाटय़ावर ठेवलेल्या (चोहाटाचिये) बळीवर (पिंड) कावळ्यांचा थवा जमतो, तशी आमच्या कुळात पापे शिरतील, अशी एक थोडी कुरूप मेलेल्यांबद्दलच जिवंत प्रतिमा समोर उभी राहते. युद्ध हे पाप आहे, नातेवाईकांशी तर त्याहूनही वाईट.
कावळ्याच्या नंतर राजहंस अवतरतो, किंबहुना तो चिखलात लडबडतो आणि रुततो, असे चित्र ओवी उभी करते. ‘जैसा कर्दमी रुपला राजहंस’. राजहंस म्हणजे अर्जुन आणि कर्दम म्हणजे चिखल. आपटय़ांच्या संस्कृत इंग्रजी शब्दकोशात राजहंसाचा अर्थो’ं्रेल्लॠ असा दिला आहे. चिखलावर बागडणारा हा पक्षी त्यात रुतला अशी कल्पना. हा चिखल भावनांचा आहे (युद्धाचाही आहे, पण मनातल्या आहे.)ो’ं्रेल्लॠ हा एक लाल फिकट रंग असणारा मोठा देखणा पक्षी आहे. तो जिथे रुतत नाही तिथे रुतला हा विरोधाभास तीन शब्दांत ज्ञानेश्वर एका प्रतिमेच्या साहाय्याने उभा करतात. हा विरोधाभास मग इतर प्राण्यांवरही बेतला जातो. बेडूक सापाला कसा गिळेल किंवा कोल्हा सिंहाला कसा झोंबेल. इथे अर्जुन साप आणि सिंह आहे.
सांग महाफणी दुर्दुरे। गिळीजे कायी।। दुर्दुर म्हणजे बेडूक
सिंहासी झोंबे कोल्हा। ऐसा अपाडु आथि जाहला।
अपाडु म्हणजे भलतेच काही तरी. या दोन्ही गोष्टी तू आज खऱ्या केल्यास, असे श्रीकृष्ण अर्जुनाला उपहासाने म्हणतो. मग आणखी एक महाभयानक जनावर सरपटत फणा काढत येते ते म्हणजे काळसर्प. हे मोहाने भरलेले आहे. हे भरदुपारी अर्जुनाच्या हृदयाजवळ वर्माला डसते असे एक दु:स्वप्न उभे केले जाते. हे विष मग सर्वत्र शरीरभर पसरते आणि कारुण्याच्या लहरींची भरती येते. ओवी म्हणते, तो ग्रासला महामोहे। काळसर्प।
मग श्रीकृष्ण नावाचा गारुडी हे विष उतरवणार आहे. ती गोष्ट म्हणजे गीता.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत २७ जुलै
१९३९> ‘मारवा’, ‘दर्पण’, ‘निसटलेले’ हे कथासंग्रह आणि ‘भूमी’, ‘त्रिदल’ सारख्या कादंबऱ्यांसह ललितलेखन- निसर्गलेखन करणाऱ्या आशा बगे यांचा जन्म. त्यांच्या ‘भूमी’ या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला असून ‘मौज’ परंपरेतील त्या महत्त्वाच्या कथाकार मानल्या जातात. ‘चंदन’, ‘अनंत’ आणि ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ हे त्यांच्या ललितलेखांचे संग्रह, तर ‘श्रावणसरी’ हे त्यांच्या निसर्गलेखांचे पुस्तक होय.
१९५३ > लेखक, समीक्षक डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे यांचा जन्म. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. मिळवली असून ‘सूक्तसंदर्भ’, ‘गोविंदाग्रज समीक्षा’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. याखेरीज, त्यांचे सुमारे १०० समीक्षालेख विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.
१९७५> भारतीय राज्यघटनेचे मराठी भाषांतरकार मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन. स्वातंत्र्यचळवळीत सहभाग घेणाऱ्या देवगिरीकरांनी ‘गांधीजींच्या आठवणी (दोन खंड)’, ‘गांधीजींची अहिंसा’, ‘ महाराष्ट्र आणि हिंदुस्थानचा (१८१८ पासून) इतिहास’ आणि ‘फिलिपाइन्सचा इतिहास’ आदी पुस्तके लिहिली.
संजय वझरेकर